Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पेण-वडखळ रस्ता पूर्ववत न केल्यास रास्ता रोको; भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांचा इशारा

पेण ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून महामार्गावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे येत्या 10 दिवसांत पेण-वडखळ रस्ता पूर्ववत करण्यात यावा, अन्यथा आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-गोवा महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा पेण भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी …

Read More »

खोळंबलेल्या शेतीकामांना वेग; पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावले; तालुक्यातील सरासरी मात्र जेमतेमच

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात जुलै महिन्यात तब्बल 20 दिवस पावसाने उघडीप घेतली होती. त्यामुळे तालुक्यातील उंचावर असलेल्या भागातील व कशेळेपासून पुढे माळरानावर असलेल्या जमिनीवरील भातलावणी पाण्याअभावी अर्धवट राहिली होती. दरम्यान, मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसाच्या सरींनी शेतीची कामे पुन्हा नव्या जोमाने शेतकर्‍यांनी सुरू केली आहेत, मात्र तालुक्यातील पावसाची सरासरी मागील …

Read More »

वादळी पावसामुळे रायगडात नुकसान

अनेक ठिकाणी बत्ती गूल पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 5) झालेल्या वादळी पावसाचा नागरिकांना फटका बसला आहे. काही भागांमध्ये पाणी शिरल्याने, तसेच छपरे उडून व झाडे उन्मळून नुकसान झाले आहे. दुसरीकडे विद्युतसेवेवरही याचा परिणाम होऊन अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झालेला आहे. हवामान खात्याने 4 ते 6 ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीचा …

Read More »

रायगडात 212 नवे कोरोना रुग्ण; सहा जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (दि. 4) 212 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 355 रुग्ण बरे झाले आहेत. पनवेल तालुक्यात 122, खालापूर 21, अलिबाग 18, उरण 11, कर्जत, पेण, रोहा प्रत्येकी आठ, माणगाव सात, महाड चार, तळा व श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि …

Read More »

मुसळधार पावसाने रायगडला झोडपले; जनजीवन विस्कळीत

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. महाडमधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शहरात पुराचे पाणी घुसले. दरम्यान, पुढील दोन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रायगड जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळपर्यंत संपलेल्या 24 तासांमध्ये …

Read More »

‘त्या’ कर्मचार्यांचे निलंबन अखेर मागे

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग आगारातील निलंबित 31 कर्मचार्‍यांसाठी दिलासादायक बातमी आहे. या सर्व कर्मचार्‍यांचे निलंबन आता मागे घेण्यात येणार असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांची ने-आण करण्यासाठी अलिबाग आगारातील कर्मचार्‍यांना अलिबाग ते दादर व दादर-पनवेल अशा मार्गावर ड्युटी लावण्यात आल्या होत्या, परंतु या मार्गावर काम करण्यास कर्मचार्‍यांनी …

Read More »

नागोठण्यात पूरसदृश परिस्थिती

नागोठणे : प्रतिनिधी – सोमवारी रात्रीपासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे अंबा नदीने मंगळवारी (दि. 4) सकाळी आपले पात्र ओलांडून परिसरात पुराचे पाणी भरावयास प्रारंभ केल्याने नागोठणे शहरात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. दुपारी दोनच्या सुमारास नागोठणे एसटी बसस्थानक, नागोठणे-रोहे जुना रस्ता तसेच इतर सखल भागात पुराचे शिरले होते. पावसाचा जोर असाच …

Read More »

नारळी पौर्णिमेसह रक्षाबंधन साधेपणाने साजरे

अलिबाग : प्रतिनिधीनारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सण एकाच दिवशी साजरे करण्याचा दुग्धशर्करा योग सोमवारी (दि. 3) जुळून आला, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही सण साधेपणाने साजरे झाले. बर्‍याचदा नारळी पौर्णिमा झाल्यावर दुसर्‍या दिवशी रक्षाबंधन साजरे होते. सलग दोन दिवस येणार्‍या सणांमुळे त्याचे वेगळेपणही दिसून येते. लहान-थोरांमध्ये त्याचा उत्साह असतो. या …

Read More »

उपजिल्हा रुग्णालयात होणार कोविडची चाचणी; रुग्णांना दिलासा

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शासनाकडून रॅपिड अँटीजन किटची सुविधा उपलब्ध झाल्याने आता या ठिकाणी कोविड विषाणूची चाचणी होऊन रुग्णाचा अर्ध्या तासात अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी प्रसारमाध्यमांना दिली.  रायगडात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून माणगाव तालुक्यात सातत्याने कोरोना रुग्ण …

Read More »

बेशिस्त वाहनचालकांना दणका; सात महिन्यांत कोट्यवधींचा दंड वसूल; लाखो जणांवर कारवाई

अलिबाग ः प्रतिनिधी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत एक लाख 15 हजार 601 वाहनचालकांवर कारवाई करीत दोन कोटी 89 लाख 99 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये लायसन्स नसलेल्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात …

Read More »