Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

महाडच्या शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर हलविण्यास भाजपचा विरोध

महाड : प्रतिनिधी – महाड तालुक्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठीचे महाड येथील शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटर एमआयडीसीमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. या निर्णयाला महाड भाजपने कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. आमचा एमआयडीसीमधील कोविड सेंटरला विरोध नसून नाते, दासगाव, खाडीपट्टा, विन्हेरे विभाग आणि महाड …

Read More »

रायगडात 12 कोरोना बळी; 358 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रायगड जिल्ह्यात 12 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 10) झाली असून, 385 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे दिवसभरात 365 रुग्ण बरे झाले आहे. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील पाच, उरण तीन आणि खालापूर, पेण, अलिबाग व रोह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह रुग्ण पनवेल (महापालिका 169, ग्रामीण …

Read More »

गोपाळकाला आणि गणेश विसर्जन मिरवणूक रद्द; शांतता कमिटीच्या बैठकीत निर्णय

श्रीवर्धन ः प्रतिनिधी श्रीवर्धन शांतता कमिटीची बैठक नुकतीच मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथील सभागृहात पार पडली. ही बैठक श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदारांनी आयोजित केली होती. बैठकीसाठी प्रत्येक गावातील गोविंदा मंडळाचे दोन सदस्य उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. या बैठकीत गोविंदा आणि गणेश विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेण्यात …

Read More »

रेवदंडा पोलिसांमुळे मायलेकाची भेट; बीट मार्शल-दामिनी पथकाची संयुक्त कामगिरी

रेवदंडा ः प्रतिनिधी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने प्रत्येक पोलीस ठाण्यात बीट मार्शल व दामिनी पथक तैनात करण्यात आले आहे. रेवदंड्यातील बीट मार्शल व दामिनी पथकाच्या भरारीने एका प्रसंगात ताटातूट झालेल्या मायलेकाची भेट घडवून आणली. रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील मुरूड तालुक्यातील मांडळा ग्रामपंचायत हद्दीत मांडळा गावात 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच …

Read More »

पेण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

पेण ः प्रतिनिधी मागील सहा महिन्यांपासून जगभरात कोरोनामुळे लाखो लोक मृत्यू पावले आहेत. त्यातच पेण तालुक्यात पहिले दोन महिने एकही पॉझिटिव्ह व्यक्ती आढळला नव्हता, परंतु तिसर्‍या लॉकडाऊनपासून पेणमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यूची श्रृंखला सुरू झाली. आता तर पेण तालुक्यात दररोज एखाद-दुसर्‍या मृत्यूची नोंद होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत …

Read More »

आदर्श शिक्षक पुरस्कारात संशयकल्लोळ

खोपोली ः प्रतिनिधी सन 2020-21साठी प्राथमिक गटातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी खालापूर पंचायत समितीकडे जमा तीन फायलींपैकी जिल्हा परिषदेकडे एकच विशिष्ट फाइल पोहचल्याने निवड प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याची खंत व्यक्त होत आहे. खालापूर तालुक्यात 400 प्राथमिक शिक्षक आहेत. दरवर्षी प्राथमिक आणि माध्यमिक गटातून तालुक्यातून दोन शिक्षकांची निवड केली जाते. जिल्ह्यातून होणार्‍या …

Read More »

तांबडी अत्याचार प्रकरणावर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

धाटाव : प्रतिनिधीरोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार व खून  प्रकरणासंदर्भात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला असून, राज्यभरातील समन्वयकांनी सोमवारी (दि. 11) रोहा येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घटनास्थळी अद्याप भेट दिली नसल्याने या वेळी उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली, तर तपासात दिरंगाई, …

Read More »

हुतात्मा चौकात व्यवसायाचा प्रयत्न; स्मारक समिती आक्रमक

कर्जत ः बातमीदार कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या माथेरान नाका येथील हुतात्मा चौकात हातगाडी लावून व्यवसाय करण्याचा प्रयत्न 9 ऑगस्टच्या रात्री झाला होता. एकीकडे ऑगस्ट क्रांतिदिवस साजरा होत असताना हातगाडी लावण्यात आली होती, मात्र स्मारक समितीने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नेरळ पोलीस स्टेशनकडून हस्तक्षेप करण्यात आला आणि हातगाडी रात्रीच तेथून काढण्यात आली. …

Read More »

वादळग्रस्त नुकसानभरपाईपासून वंचित; ‘96 टक्के मदत वाटपाचा प्रशासनाचा दावा खोटा’

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या 96 टक्के वादळग्रस्तांना नुकसानभरपाईची रक्कम वाटप केल्याचा माणगाव तहसीलदारांनी केलेला दावा खोटा असल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार यांनी सांगितले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्ञानदेव पवार यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. ज्ञानदेव पवार यांनी सांगितले …

Read More »

ऑनलाइन मखर, पूजापाठ साहित्याला ग्राहकांची पसंती

पेण ः प्रतिनिधी यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असला तरी काही दिवसांत विराजमान होणार्‍या गणरायाच्या स्वागतासाठी भक्तगणांत उत्साहाचे वातावरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य ऑनलाइन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पसंती असून दुकानदारांनी घरपोच सेवाही सुरू केली आहे.   गणरायाच्या सजावटीसाठी ऑनलाइन मखरविक्री होत असून याबरोबर गणेशपूजनासाठी धूप, अगरबत्ती, दिवे, माळा …

Read More »