Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जतमध्ये एकच व्हेंटिलेटर

शासनाच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची होतेय गैरसोय कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या तीनशेचा आकडा गाठायला गेली आहे.अशा परिस्थितीत येथील एकमेव कोविड केअर सेंटरमध्ये सर्व सुविधा उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांना तेथे पोहोचल्यानंतर अन्यत्र हलवण्याची सूचना केली जात आहे. दरम्यान, एकमेव व्हेंटिलेटर असलेल्या रायगड हॉस्पिटलमधील शासनाच्या कोविड केअर सेंटरमध्येही …

Read More »

रायगड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 10 दिवसांसाठी निर्णय लागू अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 15 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 24 जुलैच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत टाळेबंदी (लॉकडाऊन) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार …

Read More »

रायगडात सात कोरोना बळी; 342 नवे रुग्ण

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे सात जणांच्या मृत्यूची नोंद सोमवारी (दि. 13) झाली असून, 342 नवे रुग्ण आढळले आहेत. मृतांमध्ये उरण तालुक्यातील तीन आणि खालापूर, कर्जत, अलिबाग व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण पनवेल तालुका 205 (महापालिका 146, ग्रामीण 59), उरण 35, पेण 33, अलिबाग …

Read More »

भाजप नेते विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

धाटाव : प्रतिनिधी नवनिर्वाचित भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोहा तालुक्यात रायगड जिल्ह्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग यांच्या माध्यमातून गरिब व गरजूंना मेणबत्ती, मच्छर मोस्किटो, आयुर्वेदिक अर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या, सॅनिटायझर फवारणी व वृक्षारोपण करण्यात आले. रोहा तालुक्यातील धोंडखार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील …

Read More »

सुरक्षा रक्षकांची ऑनलाइन नोंदणी पारदर्शकच; रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा दावा

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पारदर्शकच असल्याचा दावा रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने केला आहे. रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळास सुरक्षा रक्षकांची प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी मंडळाने मा. उच्च न्यायालयांच्या आदेशानुसार शासनाने नियुक्त केलेल्या मे. सेराईज टेक सोल्युशन्स प्रा. लि. या …

Read More »

भारतीय बौध्द महासभेच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षपदी अनिल मोरे

पोलादपूर : प्रतिनिधी बुध्दिस्ट सोसायटी ऑॅफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभेच्या दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षपदी पोलादपूर येथील साप्ताहिक रायगड वैभवचे संपादक अनिल बाबू मोरे यांची निवड जाहीर झाली आहे.  या वेळी म्हसळा येथील संतोष जाधव यांची सरचिटणीसपदी आणि माणगांव येथील विजय बा. जाधव यांची कोषाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. …

Read More »

अवैध दारूविक्री करणार्यांना अटक

महाड ः प्रतिनिधी – महाड शहरातून अवैध दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची खबर महाड शहर पोलिसांना मिळाल्यानंतर शहरातील गांधारी नाका येथे पोलिसांनी धडक कारवाई केली. या वेळी पोलिसांनी वाहनासह दारू जप्त केली असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. महाड शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून रविवार (दि. 12) गांधारी नाका परिसरात …

Read More »

कोरोनामुळे पावसाळी पर्यटनाला फटका; धबधबे पडले ओस

माणगाव ः प्रतिनिधी – पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते डोंगरदर्‍यांतील धबधब्यांचे. अनेक जण पावसाळी विरंगुळा व हौस म्हणून धबधब्यांना जवळ करतात व मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतात. यंदा मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे पर्यटन बंद असल्याने व साथीच्या भीतीने ताम्हिणी घाटातील धबधबे ओस पडले असून यानिमित्ताने होणारा …

Read More »

रोहा तालुक्यात कोरोनाचा फैलाव

दोन दिवसांत 40 पॉझिटिव्ह; पाच जणांची संसर्गावर मात रोहे ः प्रतिनिधी – रोहा तालुक्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. शहरासह ग्रामीण भागात रोज कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सोमवारी (दि. 13) 13 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची माहिती रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी दिली. त्यामुळे रोहा तालुक्यात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 106वर पोहचली …

Read More »

रायगडात तब्बल 432 नवे रुग्ण; सात जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात आतापर्यंतच्या एका दिवसातील सर्वाधिक 432 रुग्णांची रविवारी (दि. 12) नोंद झाली असून, सात जणांचा बळी गेला आहे. दुसरीकडे 174 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 194 (महापालिका हद्द 154, ग्रामीण 40), पेण  67, अलिबाग 37, रोहा 27, खालापूर 25, माणगाव 21, म्हसळा 15, कर्जत …

Read More »