Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्षपदी दीपाली जाधव

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या आदेशाने तालुका महिला मोर्चा अध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी माणगाव शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी माणगाव येथील सक्रिय कार्यकर्त्या दीपाली जाधव यांची नियुक्ती घोषित केली. बुधवारी (दि. 15) पक्ष कार्यालय माणगाव येथे दीपाली जाधव यांची नियुक्ती घोषित करण्यात आली. तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे …

Read More »

कर्जत तालुक्यात कडकडीत बंद; पोलिसांचा पहारा; तिन्ही जिल्हा सीमा केल्या बंद

कर्जत ः बातमीदार रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने रायगड जिल्हाधिकार्‍यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाला आहे. त्या अनुषंगाने कर्जत तालुक्यात येणार्‍या तिन्ही जिल्हा सीमा पोलिसांकडून बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील दोन मोठ्या आणि चार लहान अशा सर्व बाजारपेठा बंद असून गुरुवारी (दि. 16) सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. लॉकडाऊनच्या …

Read More »

रायगडात लॉकडाऊन वाढवला

जिल्ह्याधिकार्‍यांकडून अधिसूचना जारी; नागरिक संभ्रमात अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 24 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता, मात्र जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना जारी करीत हा लॉकडाऊन 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक संभ्रमात पडले आहेत.रायगडच्या पालकमंत्री आदिती …

Read More »

पोलीस भरतीविषयक ऑनलाइन मार्गदर्शन

अलिबाग ः प्रतिनिधी महाराष्ट्रात लवकरच मोठी पोलीस भरती होणार असून, या भरती प्रक्रियेविषयक मार्गदर्शन व्हावे, प्रत्येक बारकावे समजून घ्यावेत यासाठी कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी मोफत ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पहिल्यांदाच पोलीस भरती ऑनलाइन (फेसबुक लाइव्ह) मार्गदर्शनपर संवाद कार्यक्रम होणार असून, या …

Read More »

आवास भगतआळीत खारफुटीची कत्तल

अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील आवास भगतआळीमध्ये खारफुटीची कत्तल होत आहे, तसेच खाडीकिनारी बेकायदा भराव केला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेकायदा भराव करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी भगतआळीतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. आवास ग्रामपंचायतीच्या हद्दीत भगतआळी येथे खारफुटीची कत्तल तसेच भरावदेखील केला जात आहे. ही जागा हडप करण्याचा प्रयत्न …

Read More »

खारआंबोली धरण ओसंडून वाहू लागले

मुरूड ः मुरूडजवळील खारआंबोली धरण ओसंडून वाहू लागले आहे, मात्र लॉकडाऊनमुळे पर्यटकांना धबधब्याचा आनंद घेता येणार नाही. (छाया ः सुधीर नाझरे)

Read More »

गतिमंद बालिकेच्या पालकांचा शोध सुरू

कर्जत ः बातमीदार अंदाजे 16 ते 18 दरम्यान वय असलेली एक गतिमंद-मतिमंद बालिका मौजे चारफाटा, कर्जत येथे सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल भालीवले यांना 28 जून रोजी आढळली आहे. या बालिकेबाबत सर्व ठिकाणी विचारपूस केली असता ती कोणाच्याही ओळखीची नसल्याचे आढळून आले. याबाबत स्वप्नील भालीवले यांनी कर्जत पोलीस ठाणे यांना कळविले असून …

Read More »

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाजांस तूर्तास स्थगिती

अलिबाग ः जिमाका रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात 15 जुलैच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 26 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा अध्यादेश बजावला आहे. त्या अनुषंगाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे जनतेची गर्दी कमी करणे आवश्यक असल्याने …

Read More »

संधिवातापासून मिळवा सुटका

आरोग्य प्रहर संधिवात कोणत्याही वयात होतो. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यात प्रामुख्याने गुडघेदुखीची मोठी समस्या आहे. या आजारातून सुटका करून घ्यायची असेल तर काही गोष्टींची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. संधिवात झाला तर हाडे कमजोर होऊन सांधेदुखीची समस्या डोके वर काढते. सांधा म्हणजे गुडघा. हासुद्धा तीन हाडे, गुडघ्यांची वाटी …

Read More »

माणगाव तालुक्यात 19 कोरोनाबाधित

माणगाव ः प्रतिनिधी जगभरात हाहाकार माजवणार्‍या कोरोना महामारीने रायगड जिल्ह्यातही धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण आढळले असून जिल्हा प्रशासनाची धावाधाव झाली आहे. कोरोना महामारीने माणगाव तालुक्यात कहरच केला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या चांगली असली तरी तेवढ्याच प्रमाणात तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाबरोबरच तालुक्यातील जनतेची …

Read More »