Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

नागरिकांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर फवारा कक्ष

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने ग्राहक व आपल्या कर्मचारीवर्गाच्या सुरक्षेसाठी संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच माणगाव पोलीस ठाणे येथे प्रवेशद्वाराजवळ पोलिसांच्या व या ठिकाणी येणार्‍या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 11) सॅनिटायझर फवारा कक्ष उभारला. पतसंस्थेने काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे माणगाव नगर पंचायतीला डास फवारणी मशिनही …

Read More »

मजुरांची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे प्रतिपादन अलिबाग ः जिमाका कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासन मिळून अहोरात्र विविध उपाययोजना राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनही सुरू आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी निराश्रित, मजूर, कामगारवर्गही अडकला आहे, मात्र त्यांची काळजी घेण्यास, त्यांच्यापैकी एकही मजूर उपाशी राहणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, …

Read More »

श्वसनमार्गाचे आजार

आपल्या कुटुंबातील लहान बाळ म्हणजे एक आनंदाचा व चैतन्याचा झरा असतो. साहजिकच असे बाळ आजारी झाले की त्याचा सर्व कुटुंबावर परिणाम होतो. त्यात बाळ वारंवार आजारी होऊ लागले की आईवडिलांच्या चिंतेला पारावर उरत नाही. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे जंतुसंसर्ग, विषाणूसंसर्ग लवकर होतो. त्यांच्या श्वसनमार्गाचा आकार लहान असल्याने जंतुसंसर्ग …

Read More »

ग्रामीण भागातील लोकसंख्येत वाढ

मुरूडमधील नियोजन ढासळले; पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुरूड ः प्रतिनिधी मुरूडमधील बहुसंख्य लोक कामानिमित्त मुंबई, ठाणे, दहिसर, भांडूप, बोरिवली, कल्याण, विरार व पनवेल परिसरात आहेत, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनमुळे लोकांना काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे घरी बसून दिवस काढण्यापेक्षा लोकांनी आपल्या मूळ गावी येणे पसंत केले. रेल्वे व …

Read More »

महाड तालुक्यात गारांचा पाऊस

दासगाव, सापे गावात वादळी पावसाने मोठे नुकसान महाड : प्रतिनिधी एकीकडे कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच महाड तालुक्यात आलेल्या गारांसह वादळी पावसाने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दासगाव आणि सापे गावात वादळी पाऊस झाल्याने घरांचे नुकसान झाले आहे. तर विजेचे पोल देखील कोलमडून पडल्याने दासगावमधील वीज पुरवठा देखील खंडित झाला …

Read More »

कोरोना बदलापूरपर्यंत आल्याने रायगड हद्द बंद करण्याची मागणी

कर्जत ः बातमीदार कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करून रायगड जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या जिल्हा हद्दीवर चौकी बसवण्यात आली आहे, मात्र असे असतानाही मोठ्या प्रमाणात वाहने कर्जत तालुक्यात येत असून, कोरोना शेजारच्या बदलापूरमध्ये पोहचला आहे. त्यामुळे जिल्हा हद्द बंद करण्याची वेळ आली असून कोरोनापासून कर्जत तालुक्याला वाचविण्यासाठी प्रशासनाने जिल्हा …

Read More »

चिमुकलीची गोरगरिबांना मदत

कर्जत ः बातमीदार  – कर्जत शहरातील दिनेश कडू यांची कन्या ध्रुवी तिसरीत शिकत असून तिने पालकांनी खाऊसाठी दिलेले पैसे सायकल घेण्यासाठी पिग्मी बँकेत ठेवले होते. ते पैसे या लहानशा मुलीने कोरोनामुळे संकटात सापडलेल्या गोरगरीब जनतेला बिस्किटे घेण्यासाठी खर्च केले आहेत. आपली पिग्मी बँक फोडून ध्रुवी सायकल घेणार होती, मात्र कोरोनामुळे …

Read More »

मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून मदतीचा हात

माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी माणगावमधील सेवाभावी संघटना मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून अध्यक्ष मौलाना सरफराज जालगावकर, मुस्लिम समाज नेते अस्लमभाई राऊत, इकबाल धनसे, मोर्बा गाव मुस्लिम समाज अध्यक्ष नजीर धनसे यांनी मुस्लिम समाजाच्या पवित्र दिवशी शुक्रवारी (दि. 10) मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता एक लाखाचा धनादेश तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांच्याकडे …

Read More »

नागोठण्यात आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

नागोठणे ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने सर्व कामधंदे ठप्प झाले आहेत. आदिवासी बांधवांना सध्या रोजगार उपलब्ध नसल्याने पेण-सुधागड मतदारसंघाचे भाजपचे स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांच्या वतीने विभागातील चिकणी आदिवासीवाडी, वासगाव, धनगरवाडी, ढोकवाडी, पिंपळवाडी, लाव्याची वाडी, कातळवाडी, पायरवाडी, एकलघर, भपक्याची वाडी या आदिवासी वाड्यांवर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात …

Read More »

कोतवालवाडी स्थापनादिनी 3000 मास्कची निर्मिती

महिला विकास केंद्राचा उपक्रम कर्जत ः बातमीदार – देश पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी नेरळ-ममदापूर भागातील 50 एकर जागा खरेदी केली आणि त्या ठिकाणी हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्मृतींना चालना देण्यासाठी कोतवालवाडी ट्रस्टची स्थापना केली. त्या कोतवालवाडी ट्रस्टचा 10 एप्रिल हा स्थापना दिवस होता आणि या दिवशी तेथील महिला …

Read More »