Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

विद्यार्थ्यांच्या आहारात गोमाशी प्राथमिक शाळेच्या परसबागेतील भाज्या

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील गोमाशी गावातील प्राथमिक शाळेत परसबाग उपक्रम राबविण्यात आला आहे. या परसबागेतील विविध भाज्या विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात वापरल्या जातात. तसेच शाळा परिसरात विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांना त्यांची नावे दिली असून, या झाडांचे संगोपन विद्यार्थी करत आहेत. ही झाडे विद्यार्थ्यांनी दत्तक घेतली आहेत. विद्यार्थी व गोमाशी शाळा व्यवस्थापन …

Read More »

जाहिरातबाजीसाठी वृक्षतोड; रस्ते विकास महामंडळाचा प्रताप; ‘काम बंद’चे आदेश

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील कि मी.42 जवळ होर्डिंग, बोर्ड लावण्यासाठी कुठल्याही खात्याची परवानगी न घेता वृक्षांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार खोपोलीतील पर्यावरण प्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणला आहे. खुद्द महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वृक्षतोड करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.  वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पार …

Read More »

खोपोलीत थांबली रस्त्यांची कामे; निधी मंजूर असूनही नगर परिषद प्रशासनाचा कानाडोळा

खोपोली : प्रतिनिधी शहरातील शास्त्रीनगर भागामधील रस्त्यांच्या कामांना मागील महिन्यात सुरुवात करण्यात आली, त्यावेळी टप्याटप्याने शहरातील सर्वच रस्त्यांची डागडुजी व डांबरीकरण होईल, असे खोपोली नगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र येथील एकाच रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर यंत्रणा गायब झाली. त्यामुळे या भागातील अन्य रस्त्यांचे काय? शहरातील अन्य रस्त्यांची  कामे होणार …

Read More »

बालसंस्कार विद्यामंदिरने ठेवला वेगळा आदर्श -महेश शिंदे

महाड : प्रतिनिधी आजच्या युगात शिक्षण हा व्यवसाय झाला असून, या बाजारात  बाल संस्कार विद्या मंदिर या संस्थेने कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचा वेगळा आदर्श जगासमोर ठेवला असल्याचे मत पत्रकार महेश शिंदे यांनी मंगळवार (दि. 11) येथे व्यक्त केले. महाड तालुक्यातील कोकरे येथील बालसंस्कार विद्या मंदिर या शाळेतील …

Read More »

खारपाडा येथे स्वच्छता अभियान

पेण : प्रतिनिधी सीएफआय, बीएनवाय व एम्पॉवर तसेच खारपाडा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने खारपाडा गावात नुकताच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी एकूण 49 किलो प्लास्टिक गोळा करून गावात स्वच्छता व प्लास्टिक बंदी विषयी जनजागृती करण्यात आली. आयबीएनच्या चेअरपर्सन हेगे मॅग्नुस्सेन, मुख्य कार्यकारी अधिकारी कॅमिला स्कॅरे, छायाचित्रकार हल्लवर जोहोन्सन, सीएफआयचे मुख्यकार्यकारी …

Read More »

नेरळच्या धरणावरील पूल कधी? रायगड जिल्हा परिषदेकडून ग्रामस्थांची सातत्याने दिशाभूल

कर्जत ़़: बातमीदार नेरळ ग्रामपंचायत हद्दीत असलेला पूल 2018 मध्ये कोसळला आहे. येथील ब्रिटिशकालीन धरणाच्या खाली असलेल्या या पुलाच्या बांधकामाबद्दल रायगड जिल्हा परिषद सातत्याने चुकीची माहिती देत आहे. दरम्यान, नेरळमधील पूल कोसळून दोन वर्षे पूर्ण होत आली तरी पुलाचे बांधकाम सुरु झाले नाही, त्यामुळे सलग तिसरा पावसाळादेखील पुलाअभावी जाण्याची शक्यता …

Read More »

ऑनलाइन बदल्यांच्या पोर्टलवर रिक्त पदे दिसावीत, अवघड क्षेत्र निश्चित करावे

निरंजन डावखरे यांची मागणी अलिबाग : प्रतिनिधी जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांच्या प्रक्रियेत पोर्टलवर फक्त रिक्त पदे दिसण्याबरोबरच याच पदांवर बदल्या करण्याची कार्यवाही करावी, तसेच अवघड क्षेत्र ठरविण्याचे नियम शासननिर्णयात स्पष्ट करावेत, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवारी केली. जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाइन पद्धतीने होणार्‍या …

Read More »

रेल्वेच्या पळसदरी तलावात मगर आणि कासवाचा मृत्यू

विषबाधा झाल्याचा संशय; आणखी मगरी असल्याची माहिती कर्जत : बातमीदार तालुक्यातील पळसदरी येथे असलेल्या रेल्वेच्या तलावात मंगळवारी (दि. 11) सायंकाळी मगर आणि कासव यांचे मृतदेह आढळले. वन विभागाने मृत मगरीचे अवशेष जाळून टाकले. दरम्यान, त्या तलावात आणखी तीन मगरी असल्याचे स्थानिक आदिवासींचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या मगरी शोधण्याचे काम वन …

Read More »

हिंगणघाटच्या आरोपीला कठोर शिक्षा द्या

कर्जतमधील डिकसळ ग्रामस्थांची एकमुखी मागणी कर्जत : बातमीदार हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जाळणार्‍या नराधमालाही पेट्रोल टाकून जाळले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया डिकसळ येथील श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली. कर्जत तालुक्यातील डिकसळ ग्रामस्थांनी कँडल मार्च काढून या प्रकरणी आपल्या भावना व्यक्त केल्या. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून हल्ला करण्यात आला …

Read More »

अतिवृष्टीचा पांढर्या कांद्याच्या उत्पादनावर परिणाम

शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडणार अलिबाग : प्रतिनिधी अतिवृष्टी, अवेळी पाऊस आणि बुरशी रोग यामुळे यंदा अलिबागच्या पांढर्‍या कांद्याच्या उत्पादनात घट होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडणार  आहे. पांढर्‍या कांद्याची लागवड राज्याच्या काही भागात केली जाते, परंतु अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा आणि इतर ठिकाणचा पांढरा कांदा यांच्या चवीमध्ये फरक आहे, तसेच अलिबागचा …

Read More »