आरोपीविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वडखळ येथील अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी वाजे (ता. पनवेल) येथील आरोपीविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सदर पीडित मुलीबरोबर ऑक्टोबर 2019मध्ये फेसबुकद्वारे बोलून तिच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर तिला वडखळ येथे बोलावून घेतले …
Read More »म्हसळ्यात सीएए व एनआरसी समर्थनार्थ रॅली
म्हसळा : प्रतिनिधी सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) कायद्याच्या समर्थनार्थ गुरुवारी (दि. 27)म्हसळा शहरात हिंदू संघटनांतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विविध राजकीय पक्षांचे नेते, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते. केंद्र शासनाने पारित केलेल्या या दोन्ही कायद्यांच्या समर्थनार्थ निवेदन देण्यात आले. सीएए व एनआरसी …
Read More »रायगडमध्ये मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाबाबत सरकारची अनास्था
अॅड. निरंजन डावखरे यांना मंत्र्यांचे संदिग्ध उत्तर अलिबाग ः प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील रासायनिक व अन्य कारखान्यांमध्ये दुर्घटना घडल्यानंतर जखमी रुग्णांवर उपचारासाठी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या प्रश्नाबाबत राज्य सरकारने संदिग्ध भूमिका घेतली आहे. यासंदर्भात विधान परिषदेतील भाजपचे सदस्य अॅड. निरंजन डावखरे, नागोराव गाणार आणि डॉ. परिणय फुके यांनी तारांकित प्रश्न उपस्थित …
Read More »‘त्या’ नराधमावर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल
कर्जत : बातमीदार तालुक्यातील धोत्रे गावात राहणार्या अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी कृष्णा नामा आगीवले याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्जत तालुक्यातील धोत्रे गावातील 13 वर्षीय पीडित मुलीच्या घरात तिची आई आणि लहान बहिणीशिवाय कोणीही पुरुष मंडळी नाही, ही …
Read More »मराठी ही ज्ञानभाषा व्हावी -प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण
मुरुड : प्रतिनिधी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील मराठी विभागामार्फत गुरुवारी मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हिंदी राष्ट्रभाषा असली तरी मराठी ही राजभाषा आहे. तिला ज्ञानभाषा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. चव्हाण यांनी …
Read More »धाटावमध्ये मराठी भाषा गौरव दिन
रोहे : प्रतिनिधी एम. बी. मोरे फाऊंडेशनच्या धाटाव येथील महिला महाविद्यालयात गुरुवारी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी फाऊडेशनचे संचालक अशोक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेचे सुखद राणे यांनी, कविवर्य कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील योगदान व मराठी भाषेतून स्वतःचे करिअर घडविण्यासाठी उपलब्ध असणारी संधी, या …
Read More »म्हसळ्यात मराठी भाषेबाबत प्रतिज्ञा
म्हसळा : प्रतिनिधी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त म्हसळा सार्वजनिक वाचनालयात गुरूवारी (दि. 27) ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यीक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मराठी भाषेबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच शाळा नं.1च्या विद्याथ्यार्ंना 50 पुस्तकांचा संच देऊन साखळी वाचनालयाचे सदस्य करून घेतले. यावेळी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. मशाळे यांनी …
Read More »मराठी भाषा दिन : नेरळ रेल्वेस्थानकात रांगोळीतून शुभेच्छा; गाण्यांचीही मेजवानी
कर्जत : बातमीदार मराठी भाषा दिनानिमित्त नेरळ रेल्वे स्थानकात गुरुवारी (दि. 27) मराठी भाषेबद्दल माहिती देणार्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. राजमुद्रा आणि मराठी आमुची मायबोली असा मजकूर असलेल्या या रांगोळ्यांच्या माध्यमातून सर्व प्रवाशांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न मनसे रेल्वे कामगार युनिटच्या माध्यमातून करण्यात आला होता. तसेच या रेल्वे स्थानकात दिवसभर मराठी …
Read More »पेण तालुका रास्त भाव दुकानदार संघटना आक्रमक
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील दादर व सोनखार येथील रास्तभाव दुकानदारांवर गैरविश्वास दाखवून, पुरवठा उपायुक्तांनी त्यांच्या उपजिविकेचे साधन कायमचे बंद केल्याने संतप्त झालेल्या पेण तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांनी संघटनेचे अध्यक्ष मोहनशेठ वेखंडे व जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र शंकर झिंजे यांच्या नेतृत्वाखाली तालुका पुरवठा अधिकारी शशिकांत वाघमारे यांना घेराव घालून निवेदन दिले. पुरवठा विभागाचे …
Read More »राजपुरी-मुंबई एसटी बस रविवारपासून होणार सुरू
मुरुड : प्रतिनिधी प्रवाशी संघटना व राजपुरी ग्रामपंचायत यांच्या मागणीनुसार येत्या रविवार (1मार्च) पासून राजपुरी – मुंबई बससेवा पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळाचे मुरुड आगर व्यवस्थापक सनील वाकचौरे यांनी बुधवारी जाहीर केले. मुरुडहुन पहाटे 5 वाजता सुटणारी डोंगरी (दर्शना) मार्गे मुंबई ही एसटी बस गेल्या अनेक दिवसांपासून …
Read More »