Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

एसटी कर्मचार्यांची पगार कपात? कर्मचारी-अधिकारीवर्गात घबराट

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड एसटी आगारातील कर्मचार्‍यांच्या पगारात कपात करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने कर्मचार्‍यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.  मुरूड आगारातील एसटी कर्मचार्‍यांना डिसेंबरचा पगार जानेवारीत त्यांच्या खात्यात जमा झाल्यावर एकूण पगाराच्या 70 टक्के पगारच जमा झाल्याचे निदर्शनास आले आहे.  30 टक्के पगार हा आगार तोट्यात असल्याचे कारण देत कमी …

Read More »

शिक्षकांनी घेतले ‘निष्ठा’चे धडे

म्हसळा : प्रतिनिधी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा तालुक्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिकविणार्‍या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसाठी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यात तीन सत्रांत तालुक्यात 253 जणांना प्रशिक्षण देण्यात आले. म्हसळ्यातील न्यू इंग्लिश …

Read More »

रेवदंड्यात पक्षीमित्र संमेलनास प्रारंभ

अलिबाग, रेवदंडा ः प्रतिनिधी  अलिबाग तालुक्यातील निसर्गरम्य अशा रेवदंडा समुद्रकिनारी 33व्या राज्यस्तरीय पक्षीमित्र संमेलनास शनिवारपासून (दि. 11) प्रारंभ झाला. डॉ. राजू कसंबे हे संमेलनाचे अध्यक्ष असून राज्यभरातील 300हून अधिक पक्षीमित्र संमेलनात सहभागी झाले आहेत. दोन दिवस चालणार्‍या संमेलनात विविध विषयांवरील परिसंवाद, चर्चासत्र याबरोबरच पक्षीनिरीक्षणाचा अनुभवही पक्षीप्रेमींना मिळणार आहे.पक्षीमित्र संघटना अ‍ॅमेझिंग …

Read More »

महाराष्ट्रच्या पहिल्या डावात 5 बाद 227 धावा

नागोठणेच्या रिलायन्स मैदानावर रणजी सामन्यास प्रारंभ नागोठणे : प्रतिनिधीरिलायन्सच्या मैदानावर शनिवारी (दि. 11) महाराष्ट्र आणि झारखंड यांच्यातील रणजी सामना सुरू झाला. या वेळी महाराष्ट्राच्या संघाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय काहीसा फसला असल्याचे दिसून आले होते. महाराष्ट्राचे पाच फलंदाज अवघ्या 88 धावांतच तंबूत परतले असतानाच आझीम काझी याच्या जोडीला …

Read More »

खगोल अभ्यासक सोमणांनी घडवली खोपोलीकरांना चंद्राची सफर

खोपोली : प्रतिनिधी आजपर्यंत चंद्र आपण कथा, कविता, कादंबर्‍या या सगळ्यांमध्ये वाचला, संगीतामधून ऐकला, परंतु  कल्पनेतून चंद्रावर जाण्याचा अनुभव खोपोली करांना काल आला. तो योग ज्येष्ठ खगोल अभ्यासक व पंचांग कर्ते दा. कृ. सोमण यांनी खोपोली करांना आणून दिला. खोपोली करांना दीड तासात मनाच्या भरारीने ते चंद्रावर घेऊन गेले आणि …

Read More »

पिंपळोली येथे आधार कार्ड नोंदणी शिबिर

कर्जत : बातमीदार महेश भगत फाउंडेशनच्या माध्यमातून फाउंडेशनचे अध्यक्ष महेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 10) पिंपळोली (ता. कर्जत) ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांसाठी आधार कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आले. त्यात 150 हून अधिक ग्रामस्थांनी आधार कार्ड नोंदणी केली.  ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या या शिबिराचे उदघाटन सरपंच चंद्रकांत निर्गुडा यांच्या हस्ते झाले. …

Read More »

पेण शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला प्रारंभ

पेण : प्रतिनिधी नगर परिषदेच्या विविध प्रभागात रस्त्यांच्या कामाला प्रारंभ झाला असून, शहरातील कुंभारआळी (प्रभाग क्रमांक 1) येथील रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरूवात झाली आहे. नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिक का. रा. पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. भाजप कोकण विभाग कामगार संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, हितेश पाटील, …

Read More »

म्हसळ्यातील शिक्षकांनी घेतले केंद्र सरकारचे ‘निष्ठा‘चे धडे

म्हसळा : प्रतिनिधी केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा तालुक्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीत शिकविणार्‍या शिक्षकांसह मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांसाठी निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यात तीन सत्रांत तालुक्यात 253 जणाना प्रशिक्षण देण्यात आले. म्हसळ्यातील न्यू इंग्लीश …

Read More »

जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेटी लेबर कॉलनीत दोन गटांत हाणामारी

13 जणांवर गुन्हा दाखल पेण ़: प्रतिनिधी पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेटी लेबर कॉलनीत दोन गटात हाणामारी होऊन त्यामध्ये एका गटातील दोन व दुसर्‍या गटातील एक असे एकूण तीन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात परस्पराविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी एका गटातील पाच व …

Read More »

आज नागोठण्यात अय्यप्पा महोत्सव

नागोठणे : प्रतिनिधी येथील श्री अय्यपा सेवा मंडळाच्या वतीने 23 वा अय्यपा महोत्सव आज रविवारी (दि. 12) साजरा करण्यात येत आहे. नागोठणे प्रभुआळीतील कायस्थ प्रभू समाजाच्या रामेश्वर मंदिर परिसरात कुनत्तूमना शशिकुमार नंबुद्री यांच्या हस्ते हा पूजा महोत्सव संपन्न होणार आहे. पहाटे पाच वाजता महागणपती होमाने या धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ केला …

Read More »