श्रीवर्धन : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीवर्धन शहरामध्ये विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलीस अधिक्षक बाबुराव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरपालिका शाळा क्र. 1 येथे नगर परिषदेचे शिक्षण सभापती शबिस्ता सरखोत यांनी ध्वजारोहण केले. र. ना. राऊत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात श्रीवर्धन तालुका शिक्षण प्रसारक …
Read More »मुरूड तालुक्यात ठिकठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना
मुरुड : प्रतिनिधी भारतीय प्रजासत्ताक दिन रविवारी (दि. 26) म्हसळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये, विविध शाळा, महाविद्यालयांत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. मुरुड नगर परिषदच्या प्रांगणात उपनगराध्यक्षा नौसिन दरोगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, मुख्याधिकारी अमित पंडीत यांच्यासह सर्व नगरसेवक व कर्मचारी …
Read More »प्रजासत्ताक दिना निमित्त कर्जतमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम
कर्जत : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिना निमित्त कर्जत तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी मनोरंजनाचा लाभ घेतला व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तालुक्यातील प्राथमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण उत्साहात करण्यात आले. यंदा बहुतांश ठिकाणी ध्वजारोहणा पुर्वी संविधानाच्या उद्देशिकेचे …
Read More »अलिबागेत पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिन सोहळा
अलिबाग : प्रतिनिधी भारताचा 71वा प्रजासत्ताकदिन रविवारी (दि 26) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकिय सोहळा पार पडला. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलाने संचलन केले. यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कार्य केलेल्या व्यक्ती व संस्थांना गौरविण्यात …
Read More »गगनगिरी महाराज समाधी सोहळा भक्तिमय वातावरणात
खोपोलीत हजारो भाविकांनी घेतले दर्शन खोपोली : प्रतिनिधी पूज्य गगनगिरी महाराज यांचा 12 वा समाधी सोहळा मंगळवार व बुधवारी खोपोली येथील गगनगिरी महाराज मठात विविध सामाजिक उपक्रम व हजारो भाविकांच्या दर्शनाने संपन्न झाला. मठाचे मुख्य आशिष भाई महाराज यांच्या देखरेखीखाली हा समाधी सोहळा पार पडला. नगरपालिकेकडूनही आवश्यक सुविधा या निमित्ताने …
Read More »मुरूडमध्ये युवा स्पंदन स्पर्धा उत्साहात
मुरूड : प्रतिनिधी कोंकण उन्नती मित्र मंडळ संचालित वसंतराव नाईक महाविद्यालयाने नुकताच युवा स्पंदन 2020 हा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुभाष महाडिक यांच्या हस्ते झाले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. मधुकर वेदपाठक यांनी प्रास्ताविक केले. नजीरभाई चोगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला वासंतीताई …
Read More »अखेर ‘तो पट्टा’ पेव्हर ब्लॉकने भरला
कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील अनेक रस्त्यांच्या कामाचा ठेका घेतलेला ठेकेदार एका रस्त्याचे काम सोडून दुसर्या ठिकाणी काम करत असल्याने रस्त्यावरील किरकोळ कामे अर्धवट अवस्थेत तशीच राहिली होती. त्याने शहरातील कन्याशाळेसमोरील रस्त्याच्या पट्ट्यातील एक साईटमध्ये पेव्हर ब्लॉक बसवले तर दुसरी बाजू तशीच सोडली होती, त्यामुळे या ठिकाणी काही वाहनांची …
Read More »पेणमध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत महिलांची भव्य रॅली
पेण : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानांतर्गत पेण येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प सेवा योजना विभागाच्या वतीने शहरात महिलांची भव्य रॅली काढण्यात आली होती. रॅलीत महिलांनी बॅनर हातात घेऊन बेटी बचाओ बेटी पढाओच्या घोषणा देत महिलांच्या सक्षमीकरणाविषयी जनजागृती केली.या रॅलीची सुरूवात पेण नगर परिषद कार्यालयापासून करण्यात आली. …
Read More »आता करणार साखळीऐवजी आमरण उपोषण
रस्ता दुरुस्तीसाठी कर्जतमधील आंदोलनकर्ते आक्रमक कर्जत ़: बातमीदार अनेक वर्षांपासून नादुरूस्त असलेल्या पिंपळोली-गुडवण फाटा या रस्त्याचे तातडीने करावे, या मागणीची तड लावण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी कर्जतच्या लोकमान्य टिळक चौकात गुरूवारी (दि. 23) साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र संबंधीत विषयावर कोणताही तोडगा निघत नाही, हे लक्षात घेऊन या आंदोलनकर्त्यांनी शुक्रवारी दुसर्या …
Read More »निवृत्त कर्मचार्यांचे खोपोली नगरपालिकेसमोर उपोषण
खोपोली : प्रतिनिधी येथील नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी पी. के. देवदासन व अशोक गायकवाड यांनी निवृत्तीनंतरचा पगार व फायदे मिळावे यासाठी खोपोली नगरपालिका कार्यालयासमोर शुक्रवार (दि. 24)पासून आमरण उपोषण सुरु केले आहे. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर 7 महिने झाले तरी सातव्या आयोगापोटी मिळणारी थकबाकी, रजेचा पगार, ग्रॅज्युइटीची थकबाकी, पेन्शन विक्रीची रक्कम अद्याप मिळाली …
Read More »