अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस आघाडीचे राजेंद्र उर्फ राजाभाऊ ठाकूर यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर केला. तत्पूर्वी राजाभाऊ ठाकूर यांनी शितोळे देवीचे दर्शन घेतले, तसेच वडील मधुकर ठाकूर आणि ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद घेतले.
Read More »विनोद घोसाळकर यांचा अर्ज दाखल ; श्रीवर्धनमध्ये शिवसेना, भाजप महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन
श्रीवर्धन, म्हसळा : प्रतिनिधी शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी गुरुवारी (दि. 3) आपला उमेदवारी अर्ज श्रीवर्धन विधान मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे दाखल केला. तत्पूर्वी महायुतीने श्रीवर्धनमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गुरुवारी सकाळी उमेदवार विनोद घोसाळकर यांनी शहरातील सोमजाई मातेचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पटांगणापासून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी श्रीवर्धन नगर …
Read More »अलिबागमधून महेंद्र दळवी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी गुरुवारी (दि. 3) भव्य मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विलास चावरी, सहसंपर्कप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, भाजप अलिबाग- मुरूड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय कवळे, मानसी …
Read More »‘विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा’ पेणमधून रविशेठ पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलण्याची वेळ आता आली असून, विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असे काम महायुतीच्या कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी गुरुवारी (दि. 3) पेण येथे केले. भाजप-शिवसेना-आरपीआय-रासप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी गुरुवारी माजी आमदार अनिलभाऊ तटकरे, ज्येष्ठ नेते …
Read More »वीजपुरवठा 20 तास खंडित; कर्जत शहरात ‘महावितरण’विरोधात संताप
कर्जत : बातमीदार शहराचा वीज पुरवठा 1 ऑक्टोबर रोजी पहाटे खंडित झाला होता. तो पूर्ववत होण्यासाठी तब्बल 20 तास लागले. तोपर्यंत कर्जत शहर अंधारात बुडाले होते. ऐन नवरात्र उत्सव आणि निवडणूक काळात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत असून, अर्धा दिवस बिघाड शोधण्यात गेल्याने महावितरणच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण …
Read More »धामोते गावची भवानी माता
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील नेरळजवळील धामोते गावाच्या हद्दीत स्वयंभू भवानी मातेचे स्थान आहे. पंचक्रोशीचे रक्षण करणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेली ही भवानी माता एका झाडाखाली निवास करून आहे. नेरळ-कळंब रस्त्यावर भवानी मातेचे मंदिर असून केवळ धामोते गावाचे नाही तर परिसराचे श्रध्दास्थान म्हणून या स्वयंभू देवीची प्रचिती आहे. धामोते गावातील …
Read More »स्वच्छतेसाठी मानिवलीवासीय रस्त्यावर
कर्जत : बातमीदार तालुक्यातील मानिवली ग्रुप ग्रामपंचायतीने प्लास्टिकबंदीचे स्वागत केले असून, ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व पाच गावे आणि एका आदिवासी वाडीमध्ये जाऊन ग्रामपंचायत आणि शालेय विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. गोळा झालेल्या सहा बॅग प्लास्टिक पिशव्या एका खड्ड्यात गाडण्यात आल्या. मानिवली ग्रुप ग्रामपंचायतीने माझं गाव सुंदर गाव, प्लास्टिकबंदी आणि गाव स्वच्छता मोहीम …
Read More »शेणवईत कृषिदूतांकडून स्वच्छता मोहीम
रोहा : प्रतिनिधी दापोली कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण विकास कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत किल्ला रोहा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली शेणवई गावात स्वच्छता व प्लास्टिकमुक्तीसंदर्भात जनजागृती केली. शेणवई प्राथमिक शाळेत महात्मा गांधी जयंती साजरी करून विद्यार्थ्यांसह प्रभात फेरी काढून प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यात आला. या वेळी गटप्रमुख आशुतोष माने, हृषीकेश गोडसे, हेमंत …
Read More »जय भवानी मित्र मंडळातर्फे स्वच्छतेचा जागर
अलिबाग ़: प्रतिनिधी महात्मा गांधी जयंतीनिमित्त अलिबाग गोंधळपाडा येथील जय भवानी मित्र मंडळातर्फे बुधवारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. गोंधळपाडा येथील समाजमंदिर येथे मंडळाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला. गोंधळपाडा समाजमंदिर, अंगणवाडी, व्यायामशाळा, गावदेवी मंदिर, शाळा परिसर, मुख्य …
Read More »ध्यास स्वच्छतेचा अन् प्लास्टिकबंदीचा ; खोपोली नगरपालिकेत प्लास्टिकमुक्तीची शपथ
खोपोली : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. 2) खोपोली नगरपालिका कार्यालयात महात्मा गांधी व शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. या वेळी प्लास्टिकमुक्तीसाठी सामूहिक शपथ घेण्यात आली. नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्षा विनिता कांबळी, आरोग्य सभापती प्रमिला सुर्वे, मुख्याधिकारी गणेश शेटे यांसह …
Read More »