Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पक्षनेतृत्वाचे आदेश शिरसावंद्य

विनोद घोसाळकरांचे काम करणार -कृष्णा कोबनाक माणगाव : प्रतिनिधी पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसार श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील भाजप, सेना महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांचे काम प्रामाणिकपणे करून त्यांना निवडून आणणार असल्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन मतदारसंघाचे भाजप अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी श्रीवर्धन येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांनी गुरुवारी …

Read More »

सुधागड किल्ल्यावरील भोराई देवी

पाली : प्रतिनिधी सुधागड किल्ल्यावरील श्री भोराई देवी  तालुक्याचे शक्तिपीठ मानण्यात येते. अश्विन नवरात्रीमध्ये तालुक्यातील भाविक देवीच्या दर्शनासाठी किल्ल्यावर गर्दी करतात. सध्या त्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.  सुधागड किल्ल्यावर प्राचीन काळातील श्री भोराई देवीचे मंदिर आहे. या देवीची स्थापना भृगऋषींनी केली आहे. म्हणून या देवीला भृगअंबा, भोरंबा, भोराई अशी नावे …

Read More »

आम्ही प्लास्टिक वापरणार नाही, गावातही वापरू देणार नाही

मेंदडी गावात प्लास्टिकबंदी जनजागृती फेरी म्हसळा : प्रतिनिधी आम्ही प्लॉस्टिक वापरणार नाही आणि गावातही वापरू देणार नाही, अशा घोषणांनी मेंदडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावात फेरी काढून  प्लास्टिकबंदीविषयी जनजागृती केली. या वेळी मुलांनी चौक सभा घेऊन प्लास्टिक आपल्या गावाकडील वातावरणाला कसे घातक आहे, ते सांगितले. या वेळी स्वच्छतेची व …

Read More »

चांदोरे बौद्धवाडीत एकास मारहाण

आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माणगाव : प्रतिनिधी किरकोळ कारणावरून चांदोरे बौध्दवाडी (ता. माणगाव)मधील एका इसमाला तिघा जणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि. 2) संध्याकाळी घडली. या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदोरे बौद्धवाडी येथील फिर्यादी अनंत तुळशीराम तांबे (40) यांनी मंगळवारी (दि. …

Read More »

धुळीत हरवला नागोठणे-वाकण मार्ग

Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी  मुंबई-गोवा महामार्गाच्या नागोठणे ते वाकण या तीन किलोमीटर अंतरात पावसाळ्यात चिखलातून वाट काढत जाणार्‍या वाहनांना आता रस्त्यावर होणार्‍या धुळीला सामोरे जाऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. याबाबत संबंधित कामाच्या ठेकेदार कंपनीचे एक अधिकारी एस. एम. स्वामी यांना विचारले असता, या रस्त्यावर दररोज पाणी मारून रस्ता ओला ठेवण्याचा …

Read More »

लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी

मुरूड : प्रतिनिधी नांदगाव परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुरूड पोलिसांनी योगेश यशवंत तळेकर याला अटक करून मुरूड न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. अंगणामध्ये काही लहान मुली खेळत असताना योगेश  तळेकर याने एका मुलीस जबरदस्तीने एकांतात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, …

Read More »

जिल्ह्यातील कुपोषण कमी करायचे आहे -जिल्हाधिकारी

कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात कुपोषण आहे. ते कमी करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे. कर्जतप्रमाणेच इतरत्रही कुपोषित बालकांसाठी उपचार केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी येथे केले. जिल्हा नियोजन मंडळाने दिलेल्या निधीमधून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरू …

Read More »

अलिबागमध्ये काँग्रेसकडून दोन उमेदवार

राजेंद्र ठाकूरांपाठोपाठ अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर यांचा अर्ज अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाकडून उमेवारी मिळवण्यावरून ठाकूर कुटुंबात सुरू असलेले वाद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसने अधिकृत उमेदवार म्हणून रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर यांना उमेदवारी दिली.  शुक्रवारी (दि. 4) त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी …

Read More »

मिनीट्रेन सुरू करावी; अन्यथा रेल रोको! माथेरानकरांचा इशारा

कर्जत : बातमीदार माथेरानची राणी म्हणून ओळखली जाणारी मिनीट्रेन बंद असल्याने येथील नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. ही मिनीट्रेन लवकरात लवकर सुरू न केल्यास नेरळ येथे रेल रोको करण्याचा इशारा माथेरानमधील नागरिकांनी दिला आहे. अतिवृष्टीमुळे जागोजागी दरडी पडल्यामुळे व काही भागात रेल्वे रुळाखालील जमीन वाहून गेल्यामुळे मिनीट्रेन बंद झाल्यानंतर पर्यटकांची …

Read More »

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कल्पक उपक्रम राबवावेत; जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन

अलिबाग : जिमाका जिल्हास्तरीय स्वीप कोअर समितीची बैठक गुरुवारी (दि. 3) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात घेण्यात आली. या वेळी रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप कोअर समिती सदस्यांनी कल्पक उपक्रम राबवावेत, असे आवाहन समितीचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. मतदार जागृती कार्यक्रमाची  …

Read More »