Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

भिवपुरी कॅम्प ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

स्मृती शशिकांत पै यांची सरपंचपदी बिनविरोध निवड कडाव : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील भिवपुरी कॅम्प ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शुक्रवारी (दि. 13) भाजपच्या स्मृती शशिकांत पै यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वैशाली विलास नवले यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी भिवपुरी ग्रामपंचायतीच्या सभागृहात अध्याशी अधिकारी अरुण बळीराम विशे यांच्या …

Read More »

‘मेगाभरती’ने भाजपला बळकटी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन; सुधागडात विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन पाली : प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  प्रभावी व सक्षम नेतृत्वाखाली सर्व समाजघटकांचा सर्वांगीण विकास घडवून आणला जात आहे. त्यामुळेच होत असलेल्या मेगाभरतीने पक्षसंघटना अधिक बळकट होत असल्याचे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी …

Read More »

सावरोलीत सर्पदंशाने आदिवासी तरुणाचा मृत्यू

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात सावरोली आदिवासी वाडीतील तरुण पातळगंगा नदीवर मासेमारी करण्यासाठी गेला असताना विषारी साप चावल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 11) घडली. परशुराम कृष्णा पवार असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून, सर्पदंश झाल्यानंतर त्याच्यावर गावठी व पारंपरिक विष उतरविण्याचे उपचार करण्यात आले. यादरम्यान त्याचा मृत्यू झाला …

Read More »

महाडमध्ये हुतात्मा दिन साजरा

महाड : प्रतिनिधी येथील क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठानतर्फे 1942मध्ये काढण्यात आलेल्या किसान मोर्चाचा 77वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या वेळी शहरातील सर्व हुतात्म्यांच्या आहुतीस्थळांच्या ठिकाणी जाऊन प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले, तसेच महाडमधील नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संदेश दिला. क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठान, महाड नगर …

Read More »

महाडमधील नाल्यात आढळले मृत मासे ; पावसाच्या पाण्याआड कारखान्यांचे प्रदूषित पाणी

महाड : प्रतिनिधी     येथील औद्योगिक क्षेत्रातील नाल्यात गेल्या दोन दिवसांपासून मृत मासे दिसून येत आहेत. सातत्याने पडणार्‍या पावसाचा फायदा घेऊन रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्याने हे मासे मृत पावले असावेत, असा प्राथमिक अंदाज प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाड आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. गणेश विसर्जनानंतर हे …

Read More »

माथेरानमध्ये ऐन गणेशोत्सवात गढूळ पाण्याचे भयंकर विघ्न

कर्जत : बातमीदार ऐन गणेशोत्सवात माथेरानमध्ये सर्वत्र नळाद्वारे लाल रंगाचे गढूळ पाणी येत असून, ते बघून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शुद्ध पाणी देण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना सद्बुद्धी दे, असे साकडे काही नागरिकांनी गणरायाला घातले आहे. दरम्यान, नगरपालिकेने क्लोरिनच्या बाटल्या घराघरांत पोहोच केल्या आहेत, पण त्याची मात्रा माहीत नसल्याने …

Read More »

पेणमध्ये 53 कोटी रुपयांची विकासकामे; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज उद्घाटन

पेण : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीत रिंगरोड उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून 53 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातून करण्यात येणार्‍या 11 विकासकामांचे भूमिपूजन गुरुवारी (दि. 12) रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आयोजित केले आहे. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रविशेठ …

Read More »

नानवेल दीपगृह बंद; रात्री दिशा समजत नसल्याने होड्या भरकटल्या

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यात कोर्लईजवळ मणेरी तर दिघी गावानजीक नानवेल ही दोन दीपगृहे आहेत. त्यातील नानवेल येथील दीपगृह गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त आहे. तेथील दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी मच्छीमारांच्या होड्या भलत्याच ठिकाणी भरकटल्या जात आहेत. खोल समुद्रात जाणार्‍या बोटींना दिशा दाखविण्यासाठी दीपगृह मार्गदर्शक ठरतात. रात्रीच्या वेळी दीपगृहातील दिवे …

Read More »

अतिरिक्त कर आकारणीला खोपोलीत विरोध

खोपोली : प्रतिनिधी  येथील नगर परिषदेने चालू वर्षीच्या मालमत्ता कर मागणी पावतीमध्ये कचरा संकलन या नावाने 480 रुपये अतिरिक्त कर आकारणी केली आहे. हा अतिरिक्त कर कशासाठी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, या अतिरिक्त कराला खोपोली शहरातून विरोध वाढत आहे. खोपोली नगर परिषदेकडून मालमत्ता करामध्ये यापूर्वीच वृक्षकर, शिक्षण कर, स्वच्छता …

Read More »

राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष मनोज धुमाळ यांचा राजीनामा

अलिबाग : प्रतिनिधी  रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती सुरूच आहे. राष्ट्रवादीचे अलिबाग तालुका अध्यक्ष मनोज धुमाळ आणि त्यांचे वडील राष्ट्रवादीचे जिल्हा सल्लागार प्रकाश धुमाळ या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर मनोज धुमाळ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार अशी चर्चा सुरू होती, मात्र काही दिवस त्यांनी वेट अँड …

Read More »