Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

‘पालीवाला’त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

पाली ः प्रतिनिधी ग्रामीण व शहरी भागातील मुलांना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन राष्ट्रसेवा करण्याकरिता प्रोत्साहन देण्याच्या उदात्त  हेतूने पालीवाला महाविद्यालयाने पुढाकार घेतला आहे. पाली सुधागडचे तहसीलदार दिलीप रायन्नावर यांच्या संकल्पनेतून आणि महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महाजन यांच्या प्रयत्नातून नुकताच पालीवाला महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांसंदर्भात …

Read More »

माणगावातील बांधकामे नियमित करा

बिल्डर्स असोसिएशनचे पालकमंत्र्यांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी माणगावमधील बांधकामे शासनाने नियमित करावीत, असेे निवेदन माणगाव बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांना दिले आहे. माणगाव येथील बांधकामाबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. याकामी उपविभागीय अधिकारी माणगाव यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून त्यासोबत साधारणपणे सन 2010-11 या …

Read More »

बचतगटांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील

पेण ः प्रतिनिधी बचतगटांच्या प्रगतीसाठी व त्यांचा आर्थिक स्तर वाढावा यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केले. पेण नगर परिषद व माविम यांच्या वतीने शहरातील स्थापन केलेल्या सर्व महिला बचतगटांच्या नावीन्यपूर्ण उद्योग संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी दीनदयाळ अंत्योदय योजना-नागरी उपजीविका अभियान …

Read More »

माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचे निधन

महाड : प्रतिनिधी येथील शिवसेना नेते आणि माजी ग्रामविकास व गृहराज्यमंत्री प्रभाकर मोरे यांचे शनिवारी (दि. 14) सकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर रविवारी सकाळी 10 वाजता महाड शहरात अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रभाकर मोरे यांनी महाड विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार व मंत्री म्हणून प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी …

Read More »

पेणमध्ये साकारणार रिंगरोड प्रकल्प

पेण : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या बाह्यरस्ते विकास योजनेंतर्गत पेण नगर परिषद हद्दीतील रिंगरोड प्रकल्पाचे भूमिपूजन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 12) करण्यात आले. या कार्यक्रमास माजी मंत्री रविशेठ पाटील, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, जि. प.चे माजी विरोधी …

Read More »

खालापुरात 15 जुगारींना अटक

खोपोली : प्रतिनिधी रमी जुगार खेळणार्‍या 15 जणांना खालापूर पोलीस पथकाने छापा टाकून रंगेहाथ  पकडले असून त्यांच्याकडून 47 हजार 100 रुपये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. खालापूर हद्दीतील मिरकूटवाडी येथील रोहिदास काशिनाथ पाटील यांच्या स्वामी समर्थ ट्रान्स्पोर्ट ऑफिसमध्ये काही जण  जुगार खेळत असल्याची खबर खालापूरचे पोलीस निरिक्षक विश्वजीत …

Read More »

लाडक्या गणरायाला भक्तांचा भावपूर्ण निरोप

10 दिवस चाललेल्या चैतन्य सोहळ्याची सांगता अलिबाग : प्रतिनिधी आपल्या लाडक्या गणरायाला 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गुरुवारी भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला. समुद्रकिनारे, नदी, तलाव अशा विसर्जन घाटांवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. टाळ-मृदंगाचा नाद, घुमणार्‍या आरत्या, सुगंधाचा दरवळ आणि भारावलेले वातावरण अशा चैतन्य सोहळ्याची गुरुवारी सांगता झाली. या …

Read More »

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 243 मूर्तींचे श्रीसदस्यांनी केले पुन्हा विसर्जन

मुरूड : प्रतिनिधी पाण्यात विरघळत नसल्याने भरतीबरोबर मुरूड समुद्र किनारी वाहून आलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या 243 गणेशमूर्तीचे श्रीसदस्यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा खोल समुद्रात विसर्जन केले. मुरूड तालुक्यात गुरुवारी 10 दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले होते, मात्र दुसर्‍याच दिवशी पहाटे समुद्र किनार्‍यावर शेकड्याने मूर्ती वाहून आल्या होत्या. धर्माधिकारी प्रतिष्ठनच्या मुरूड तालुक्यातील …

Read More »

धुमाळ पितापुत्रांचा भाजपमध्ये प्रवेश

अलिबाग भाजपत इनकमिंग सुरूच अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यात भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सल्लागार प्रकाश धुमाळ आणि अलिबाग तालुकाध्यक्ष मनोज धुमाळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शुक्रवारी (दि. 13) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. अलिबागच्या पीएनपी नाट्यगृहात पार पडलेल्या या …

Read More »

महाडमधील जुगार अड्ड्यांवर धाड

लॉज चालकासह 14 जणांना अटक महाड : प्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन करून एका घरात आणि नामांकित लॉजमध्ये चालविल्या जाणार्‍या जुगार अड्ड्यांवर महाड शहर पोलिसांनी बुधवारी (दि. 11) धडक कारवाई करीत लॉज चालक आणि नगरसेवकासह 14 जणांना अटक केली आहे. या कारवाईमुळे जुगार खेळणार्‍यांना धडकी भरली आहे. महाड शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांना …

Read More »