Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

कृष्णा कोबनाक व जनसंकल्प प्रतिष्ठानचे आयोजन; विद्यार्थ्यांचा गुणगौरव म्हसळा ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा भाजप अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि. 10) म्हसळा येथे जनसंकल्प प्रतिष्ठानमार्फत 10वी, 12वी व पदवीधर विद्यार्थी यांच्याकरिता स्पर्धा परीक्षा फ्री सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमप्रसंगी देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री …

Read More »

पेण बँक संघर्ष समितीकडून खासदार बारणेंचे आभार

खोपोली ः वार्ताहर बुडीत पेण को. अर्बन बँक आर्थिक घोटाळा व ठेवीदारांच्या थकीत देणीबाबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देशाचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या लोकसभेत दोन वेळा चर्चा घडवून आणली. या चर्चेत संबंधित विभागाच्या मंत्रालयाने सकारात्मक कार्यवाही करून लवकरात लवकवर ठेवीदारांना त्यांची थकीत देणी देण्याचे आश्वासन दिले. खासदार बारणे यांच्या या …

Read More »

कर्जतमध्ये भाजपच्या आढावा बैठका सुरू

कर्जत ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भारतीय जनता पार्टीचे शक्तिकेंद्र प्रमुख व बूथप्रमुख आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी कर्जत मंडळातील कळंब, पिंपळोली, दहिवली, खांडपे, वेणगाव या ठिकाणी आढावा बैठकांचे आयोजन कर्जत विधानसभेचे अध्यक्ष देवेंद्र साटम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत …

Read More »

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खोपोली, खालापूरकर सरसावले

खोपोली ः प्रतिनिधी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापूर आला. तेथील रहिवाशांचे पाण्यात सर्वस्व वाहून गेले. शासनाने या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शिळफाटा, बाजारपेठ अशा विविध भागातून मदत फेरी काढण्यात आली. खोपोलीतील सर्वसामान्य नागरिक, दुकानदार ते मोठे व्यापारी यांनी भरभरून विविध वस्तूरूपात साहाय्य केले. लायन्स क्लब, रोटरी …

Read More »

रेल्वे प्रशासनाकडून माथेरानमध्ये पाहणी

कर्जत : बातमीदार रेल्वे प्रशासनाच्या अधिकारीवर्गाने अमन लॉज ते माथेरान रेल्वेमार्गाची पाहणी करीत माथेरान स्थानक गाठले. या वेळी त्यांनी नेरळ-माथेरान रेल्वेमार्गाचे काम येणार्‍या दोन-चार महिन्यांत युद्धपातळीवर पूर्ण करून लवकरच मिनीट्रेनची सेवा सुरळीत केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले. त्याचप्रमाणे शटल सेवा सुरू करण्याकरिता कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचा आढावा घेतला. …

Read More »

शासन आपल्या पाठीशी

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची ग्वाही; शिहू विभागातील पूरग्रस्तांची घेतली भेट पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील पूरग्रस्तांची रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी (दि. 11) भेट घेतली. शासन आपल्या पाठीशी असून, सर्वतोपरी मदत केली जाईल, असा दिलासा त्यांनी पूरग्रस्तांना या वेळी दिला. मुसळधार पावसाने पेण तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांमध्ये …

Read More »

देशातील दुसरा टेली मेडिसिन दवाखाना नेरळच्या सगुणा बागेत

कर्जत ः बातमीदार उद्योजक डॉ. संकेत बर्‍हाळे यांनी पुणे येथे फिग एमडी ही संस्था स्थापन केली असून त्या संस्थेच्या वतीने टेली मेडिसिन दवाखान्याची संकल्पना राबविली जात आहे. अशी संकल्पना राबविणारी फिग एमडी ही देशातील पहिलीच संस्था असून देशातील दुसरा टेली मेडिसिन दवाखाना नेरळजवळील सगुणा बाग या कृषी पर्यटन केंद्रात सुरू …

Read More »

वाकण पाली मार्गावर जिवंत विद्युत वाहिन्या पडल्या

पाली ः  वार्ताहर वाकण पाली राज्य महामार्गावर वझरोली गावाजवळ विद्युत वाहिन्यांवर झाड कोसळून विजेचा खांब कोसळला. यामुळे विजेच्या जिवंत वाहिन्या रस्त्यावर आडव्या येऊन लोंबकळत होत्या. परिणामी येथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वीज वाहिन्यांवर रस्त्याच्या शेजारील शेतात असलेले झाड उन्मळून कोसळले. त्यावेळी येथून एक कार जात होती. सुदैवाने कार …

Read More »

रायगडातील पूरस्थिती आली नियंत्रणात

अलिबाग : जिमाका कोकण विभागात मागील चार-पाच दिवसांपूर्वी पूरस्थिती निर्माण झाली होती. सध्या पाऊस बंद आहे. या भागातील पूरस्थिती नियंत्रणात असून त्यांना आवश्यक ते मदतकार्य करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील पूरस्थिती सध्या नियंत्रणात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 500 व्यक्ती, रत्नागिरी जिल्ह्यातील 757, तर रायगड जिल्ह्यातील तीन हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले होते. …

Read More »

कर्जत-लोणावळादरम्यान दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात

कर्जत ः बातमीदार जुलै महिन्यात कर्जत-लोणावळा मार्गावर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे मेन लाइनवरील दक्षिण-मध्य मार्गावर वाहतूक थांबवून दुरुस्तीची कामे केली जात आहेत.दरम्यान, मध्य रेल्वेच्या या कामांमुळे बोरघाट अधिक सुरक्षित होत असून त्या कामाची पाहणी मध्य रेल्वेचे मुंबई येथील वरिष्ठ अधिकारीवर्गाने केली आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक …

Read More »