Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पोलादपूरची शहीद परंपरा

रायगड जिल्ह्याच्या शहीद परंपरेची सुरुवात पोलादपूर तालुक्यातील दुसर्‍या महायुध्दातील पहिले शहीद खडपी येथील सयाजी जाधव यांच्यापासून झाली असून त्यानंतर कोंढवीचे अनाजी चव्हाण, भरत मोरे, लक्ष्मण निकम, चिखलीचे तानाजी बांदल, परसुलेचे बाबूराम जाधव, लोहारे पवारवाडीतील सुरेश भोसले, वाकण धामणेचीवाडीतील देऊ सकपाळ, पार्लेतील लक्ष्मण गमरे, तुर्भे खोंडा येथील गणपत पार्टे, आडावळे येरंडवाडीतील …

Read More »

सरकारच्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा सुनील तटकरेंचा डाव भाजप नेते कृष्णा कोबनाक यांचा हल्लाबोल

म्हसळा : रामप्रहर वृत्त रक्षाबंधन पर्व- नारी शक्ती सन्मान महोत्सवानिमित्त म्हसळा तालुका भाजप महिला मोर्चाच्या वतीने मंगळवारी (दि. 13) येथील  कुणबी समाज सभागृहात महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात म्हसळा तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भाजप सरकारने सुरू केलेल्या महिला बचत गट, बेटी बचाव बेटी पढाव, सुकन्या योजना, मातृ …

Read More »

कोंडरान गावाजवळ झालेल्या भूस्खलनाने ; शेतीचे नुकसान; 48 जनावरे दगावली

महाड : प्रतिनिधी तालुक्यात गेली दोन आठवडे मुसळधार पाऊस होत होता. मात्र 6 ऑगस्ट रोजी किल्ले रायगड परिसरात झालेल्या अतिवृष्टीने जागोजागी भूस्खलन झाले आहे. त्याचे भयाण रूप कोंडरान आणि कोंझर गावादरम्यान दिसून येत आहे. याठिकाणी आलेल्या मातीने शेकडो एकर भात शेतीचे नुकसान झाले आहे. संपूर्ण शेत जमिनीत माती, झाडांच्या फांद्या, …

Read More »

मुंबई-पंढरपूर एसटी बसला खालापुरात अपघात

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी समोरून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने हुलकावणी दिल्याने एसटी बसचालकाने तत्काळ ब्रेक दाबला. त्यामुळे बस रस्त्यावरून घसरून अपघात झाला. ही दुर्घटना मंगळवारी (दि. 13) सकाळी वांवढळ (ता. खालापूर) गावाच्या हद्दीत कमल हॉटेलजवळ घडली. सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. ही बस (एमएच-14,बीएल-9389) मंगळवारी सकाळी मुंबई सेंट्रल येथून …

Read More »

रायगडातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ, अलिबागमधील डॉक्टरांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख रुपये

अलिबाग : प्रतिनिधी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) अलिबागच्या वतीने सांगली, कोल्हापूर येथे पूरग्रस्त भागात कपडे, औषधे, खाण्याच्या वस्तू, भांडी ही वस्तूरूपी मदत पाठविण्यात आली आहे, तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक लाख रुपयांची मदत चेकद्वारे देण्यात आली आहे. आयएमए अलिबाग शाखेतर्फे डॉक्टरांनी पूरग्रस्त भागात पाठविण्यासाठी कपडे, खाण्याच्या वस्तू, भांडी, औषधे गोळा …

Read More »

रायगड जिल्हा रुग्णालयात लवकरच बोट अ‍ॅम्ब्युलन्सची सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी येथील रायगड जिल्हा शासकीय रुग्णालयात लवकरच रुग्णवाहिका सागरी बोटीची (बोट अ‍ॅम्ब्युलन्स) सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा शासकीय रुग्णालयाने शासनाकडे पाठविला आहे. ही सुविधा उपलब्ध झाल्यास रुग्णांना मुंबईत योग्य वेळेत चांगले उपचार मिळू शकतील. जिल्ह्याच्या विविध भागांतून रुग्ण अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. …

Read More »

एक हात मदतीचा…

पायरीचीवाडी, कासारवाडी ग्रामस्थ सरसावले पाली : प्रतिनिधी कोल्हापूर, सांगलीतील महापुराने हाहाकार माजवला आहे. तेथील पूरग्रस्त व आपत्तीग्रस्तांसाठी सर्व स्तरातून मदतीचा हात दिला जात आहे. सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी व कासारवाडी या गावातील ग्रामस्थांनी शिक्षक कुणाल पवार यांच्या  आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येक घरातून धान्य, डाळी व कपड्यांचे संकलन केले. हे साहित्य ते …

Read More »

पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अधिकार्यांना आदेश

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी (दि. 11) पुनर्आढावा घेतला. या वेळी त्यांनी नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. राजस्व सभागृहात आयोजित आढावा बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी …

Read More »

पेणमध्ये गॅस टँकरची एसटी बसला धडक ; दोन प्रवाशांचा मृत्यू, 42 जण जखमी

पेण : प्रतिनिधी खोपोलीकडून पेणकडे येणार्‍या एसटी बसला गागोदेजवळ समोरून येणार्‍या टँकरने धडक दिल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू, तर चालक-वाहकासह 42 जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. 11) सकाळी सातच्या सुमारास घडला. खोपोलीहून एसटी बस (एमएच 20-बीएल 0547) पेणकडे येत होती. ही बस गागोदेजवळील वळणावर आली असता तिला समोरून …

Read More »

भारतीय संस्कृती ‘लयभारी’

चिवे सुधागडमध्ये घडले संस्कृती व सणांचे दर्शन पाली ः वार्ताहर आपल्या अमूल्य संस्कृती व सणांना पुनरुज्जीवित करण्यासाठी व त्यांचे महत्त्व जनमानसात प्रभावीरीत्या पोहचावे आणि भावी पिढीला देखील आपली संस्कृती व सण यांची मौलिकता समजावी यासाठी लयभारी आदिवासी सामाजिक विकास संस्था चिवे सुधागड यांच्या वतीने नुकताच आपली संस्कृती व सणांचे दर्शन …

Read More »