अलिबाग : प्रतिनिधी जागतिक आदिवासी दिन शुक्रवारी (दि. 9) रायगड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. आलिबाग शहरात आदिवासींनी मिरवणूक काढली होती. पारंपरिक वेश परिधान केलेल्या महिला व पुरुष या मिरवणुकीत सहभागी झाले होते. आदिवासी बांधवांसाठी भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आदिवासी बांधवांनी आपली पारंपरिक हत्यारे घेऊन, तसेच …
Read More »जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; कर्जतमध्ये संघटनेच्या वतीने बाईक रॅली
कर्जत : बातमीदार आदिवासी दिनानिमित्त कर्जत तालुका आदिवासी संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. 9) बाईक रॅली काढण्यात आली होती. नेरळ येथे सुरुवात झालेली ही आदिवासी रॅली कर्जत शहर मार्गे कशेळे येथे पोहचली. वाटेत सर्व ठिकाणी आदिवासी समाजाने आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन करीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. कर्जत तालुक्यात ठाकूर-कातकरी आदिवासी संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय …
Read More »भाजप नागोठणे शहर अध्यक्षपदी सचिन मोदी
नागोठणे : प्रतिनिधी येथील प्रथितयश व्यावसायिक तथा भाजपचे निष्ठावंत युवा कार्यकर्ते सचिन मोदी यांची भारतीय जनता पक्षाच्या नागोठणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यासंबंधीचे नियुक्तीपत्र पेण येथील कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मोदी यांना देण्यात आले. सचिन मोदी यांचा जनसंपर्क सर्वोत्तम असून नागोठणेसह विभागात तळागाळापर्यंत पोहोचवून भाजप …
Read More »नेरळ आणि कर्जत येथे हुतात्म्यांना आदरांजली
कर्जत : बातमीदार ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शुक्रवारी कर्जतमधील आमराई परिसरात असलेल्या क्रांती स्तंभाला नगर परिषदेच्या वतीने, तर नेरळच्या माथेरान नाक्यावर या असलेल्या हुतात्मा चौकात ग्रामपंचायत आणि आदिवासी संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. कर्जत नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांनी आमराई परिसरातील हुतात्मा स्तंभाला पुष्पहार घालून …
Read More »शूरा मी वंदिले..! स्वातंत्र्यवीरांना अभिवादन ; मानिवली हुतात्मा स्मारकात क्रांती दिन साजरा
कर्जत : बातमीदार ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कर्जत पंचायत समिती आणि मानिवली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 9) मानिवली येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारकात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला. कर्जत पं. स. सभापती राहुल विशे यांच्या हस्ते हुतात्मा हिराजी पाटील …
Read More »पाली व जांभूळपाडा येथील अंबा नदी पुलांची पुन्हा दैना ; नव्याने बसविलेले संरक्षक कठडे व रेलिंग गेले वाहून
पाली : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे अंबा नदी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या 15 दिवसांत अंबा नदी पुलावरून 5 ते 6 वेळा पाणी गेले आहे. मागील आठवड्यात पुलावरील सिमेंटचे व लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) वाहून गेले होते. एमएसआरडीसी प्रशासनाने तेथे नवीन सिमेंटचे कठडे व लोखंडी रेलिंग बसविल्या होत्या, मात्र शनिवार ते …
Read More »महसूल विभागाच्या नेरळमधील गोदामाचे वादळी वार्याने नुकसान
कर्जत : बातमीदार नेरळ भागातील रेशन दुकानांचे धान्य साठवण केल्या जाणार्या येथील गोदामाचे पत्रे गुरुवारी (दि. 8) सायंकाळी वादळी वार्याने उडून गेले. या वेळी पाऊस नव्हता, त्यामुळे गोदामातील 4000 गोण्यांमधील धान्य भिजता भिजता वाचले. दरम्यान, महसूल विभागाने हे सर्व धान्य नेरळमधील अन्य गोदामात हलविले आहे. नेरळमधील खांडा भागात महसूल विभागाची …
Read More »आमदार प्रवीण दरेकरांनी केली पूरपरिस्थितीची पाहणी
महाड : प्रतिनिधी अतिवृष्टी आणि पुरामुळे महाड आणि पोलादपूर तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी (दि. 8) महाड बाजारपेठेतील नुकसानीची पाहणी केली. पोलादपूर येथील कोतवाल रस्त्याचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या दालनात बैठक घेऊन, नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. मुसळधार पावसाने …
Read More »पूर : महाड, पोलादपूर, माणगावमधून 404 जणांना सुरक्षितस्थळी हलविले
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, दक्षिण रायगडला पावसाने झोडपून काढले. महाड शहरात बुधवारीही (दि. 7) पूरस्थिती होती. महाड, माणगाव व पोलादपूर तालुक्यातील एकूण 404 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. येत्या 24 तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर रायगडात पावसाचा …
Read More »कलम 370 रद्द करण्यास विरोध करणार्यांची कीव येते
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून समाचार पेण : प्रतिनिधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव मांडून एक ऐतिहासिक निर्णय घेतला. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तो बहुमताने पारित झाला. जनमानसातूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. असे असताना या निर्णयाला विरोध करणार्यांची कीव येते, अशा …
Read More »