पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यात स्वातंत्र्यदिनासोबत रक्षाबंधनाचा दुहेरी आनंद गावागावांतून पाहण्यास मिळाला. भोगाव खुर्द ग्रामपंचायतीत सरपंच राकेश उतेकर यांनी ध्वजारोहणाचा मान यंदा भारतीय सैन्यातील जवानास देऊन आगळावेगळा पायंडा पाडला, तर गोळेगणी शाळेने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सर्व माजी सैनिकांचा गौरव केला. तालुक्यातील राजकीय स्थित्यंतराने गाजलेली ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्द येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय …
Read More »रायगड जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायतीला लाल कार्ड नाही
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अशुद्ध होण्याचे प्रमाण घटले आहे. पिण्याच्या पाण्याचे धोकादायक स्त्रोत मिळाल्यामुळे दिले जाणारे लालकार्ड यंदा एकाही ग्रामपंचायतीला मिळालेले नाही. 62 ग्रामपंचायतीमध्ये मध्यम जोखमीचे स्त्रोत आढळले, त्यांना पिवळे कार्ड देण्यात आले. सुरक्षित स्त्रोत असलेल्या 746 ग्रामपंचायतीना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. जनतेला शुद्ध व …
Read More »पोलादपुरात सोनसाखळी चोरट्यास अटक
पोलादपूर : प्रतिनिधी मुंबईला जाण्यासाठी महामार्गावर उभ्या असलेल्या प्रवाशाची सोन्याची चेन चोरून पसार झालेल्या चोरट्याला पोलादपूर पोलिसांनी केवळ तीन तासात गजाआड केले. पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खुर्द गोळयांचीवाडी येथील मनोहर बाबाजी सुर्वे हे शनिवारी सकाळी मुंबई येथे जाण्यासाठी पोलादपूर एसटी स्थानकाबाहेर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उभे होते. त्यावेळी तेथे आलेल्या मोटारसायकलस्वाराने तो …
Read More »कोलाड ज्वेलर्स असोसिएशनतर्फे पूरग्रस्तांना 400 ब्लँकेट्स
रोहा : कोलाड ज्वेलर्स असोसिएशनतर्फे पूरग्रस्तांना देण्यासाठी 400 ब्लँकेट्स तहसीलदार कविता जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राकेश जैन, भरत जैन, मनोज जैन, सतीश जैन, विकी जैन, उज्ज्वल कारेकर, किरण लाडगे, नायब तहसीलदार राजेश थोरे या वेळी उपस्थित होते.
Read More »निवृत्ती माधव महाराज यांना पुरस्कार जाहीर
श्रीवर्धन : प्रतिनिधी नामदेव शिंपी समाज युवक संघातर्फे दिला जाणारा हुतात्मा हिरवे गुरुजी समाज भूषण पुरस्कार शिंपी समाजातील ह.भ.प. निवृत्ती माधव महाराज नामदास यांना जाहीर झाला असून, गुरुवारी (दि. 15) सकाळी पनवेलमध्ये होणार्या कार्यक्रमात तो प्रदान करण्यात येणार आहे. गोवा मुक्तिसंग्रामात तुळशीराम बाळकृष्ण उर्फ हिरवे गुरुजी शहीद झाले. हु. हिरवे …
Read More »कर्जतची सरकारी कार्यालये प्लास्टिकच्या वेष्टनाखाली
कर्जत : बातमीदार तालुक्यातील शासकीय कार्यालयांच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात या सर्व इमारतींवर प्लास्टिक आच्छादने टाकावी लागतात. त्यासाठी यावर्षी तब्बल 1800 चौरस मीटर प्लास्टिक कापड आणण्यात आले आहे. कर्जत तहसील कार्यालय परिसरातील सर्व इमारती ब्रिटिशकालीन असून, त्यांच्या छपराला छिद्रे पडली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती …
Read More »खोपोली-पनवेल बसला अपघात
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरून चाललेल्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पाठीमागून येणारी एसटी बस ट्रकवर आदळली. विणेगाव (ता. खालापूर) हद्दीत बुधवारी (दि. 14) सकाळी झालेल्या या अपघातात बस चालकासह एकूण 15 लोक जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बस (एमएच-20, बीएल-2232) बुधवारी सकाळी खोपोलीहून पनवेलला जात होती. …
Read More »पेण पालिकेतर्फे विकासकामांचा धूमधडाका
रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण पेण : प्रतिनिधी पेण नगर परिषदेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण बुधवारी (दि. 14) पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत उभारण्यात आलेल्या आंबेगाव …
Read More »अलिबागेत नारळी पौर्णिमा उत्साहात
अलिबाग : प्रतिनिधी सन् आयलाय गो, आयलाय गो… नारली पूनवचा… मनी आनंदू मावना कोल्यांचे दुनियेचा… या गीताची आठवण करून देणारा नारळी पौर्णिमेचा सण बुधवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सणाचे पारंपरिक स्वरूप काही प्रमाणात बदलले असले तरी उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळाले. श्रावण महिना सुरू झाला की सुरुवात होते …
Read More »समानीकरणाच्या शाळा होणार खुल्या
साखळी पद्धतीने विस्थापित राज्यभरातील शिक्षकांना दिलासा अलिबाग : प्रतिनिधी शासन निर्णयाप्रमाणे राज्यात संगणकीय बदली प्रकिया राबवण्यात आली होती. 2018 व 2018-19 मध्ये राज्यभरातील हजारो शिक्षक साखळी पद्धतीमुळे विस्थापित झाले होते. या शिक्षकांना येत्या 20 ते 22 ऑगस्टदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी पातळीवर समानीकरणाच्या शाळा खुल्या करून आणि समुपदेशन पद्धतीने बदली प्रकिया …
Read More »