परतीच्या प्रवासाचा एसटीवर ताण अलिबाग : प्रतिनिधी : चौथा शनिवार, रविवार त्यामुळे पर्यटकांची अलिबाग आणि परिसरातील पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी झाली होती. मात्र रविवारपासून (दि 26) मांडवा – गेटवे जलवाहतूक सेवा बंद झाल्याने मुंबईकडे जाण्यासाठी निघालेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात हाल झाले. त्याचा ताण एसटीवर पडला. जलवाहतूक सेवा बंद झाल्याने मुंबई-ठाण्याकडे …
Read More »आमदार जयंत पाटील यांच्या निषेधार्थ रायगडातील पत्रकारांचा उद्या मोर्चा
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग येथील ‘लोकसत्ता’चे पत्रकार हर्षद कशाळकर यांना शेकापचे आमदार जयंत पाटील आणि आमदार पंडित पाटील यांनी लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून मारहाण केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांकडून सोमवारी (दि. 27) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी 10.30 …
Read More »पॅरासेलिंग करताना पडून मुलाचा मृत्यू, एक गंभीर; मेरीटाइम बोर्डाचे दुर्लक्ष
मुरूड ः प्रतिनिधी पुण्यातील कसबा पेठ येथील सात जणांचा समूह मुरूड समुद्रकिनारी फिरण्यासाठी आला असता एका दुर्दैवी अपघातात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पर्यटक गणेश पवार (40) आणि त्यांचा मुलगा वेदांत पवार (15) पॅरासेलिंग करताना आकाशात उडाले. या वेळी पॅराशूट आकाशात उडताच अगदी काही मिनिटांतच …
Read More »मस्को सानयो कंपनीने केले लौजी रेल्वेस्थानक चकाचक
लौजी रेल्वेस्थानक चकाचक खोपोली : प्रतिनिधी कर्जत खोपोली रेल्वे मार्गावरील लौजी स्थानकावर शुक्रवारी (दि. 24) अचानक स्वच्छतादूत अवतरले व त्यांनी सर्व रेल्वेस्थानक काही वेळातच चकाचक केले. या मोहिमेचे प्रवाशांनी स्वागत केले आहे. लौजी स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुधारणा केल्या जात आहेत, पण स्वच्छता कर्मचारी नेमला नसल्याने फलाटांवर रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, …
Read More »माथेरानमध्ये महायुतीकडून जल्लोष
नेरळ : बातमीदार खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात विजय मिळविल्याने माथेरान शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निवडणुकीचे निकाल झाल्यानंतर माथेरानमध्ये शिवसेना, भाजप आणि आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते माथेरानमधील श्रीराम चौकात जमले आणि त्यांनी विजयाचा जल्लोष केला. त्यावेळी भाजप शहर अध्यक्ष विलास पाटील, आरपीआय आठवले गटाचे शहर अध्यक्ष अनिल …
Read More »मुरूड-जंजिराच्या परिसराचे नयनरम्य क्षण
मुरूड : मुंबईतील फोटोग्राफीकल सोसायटी ऑफ इंडियाच्या छायाचित्रकांनी निसर्गरम्य मुरूड-जंजिराच्या परिसराचे नयनरम्य क्षण टिपले. (छाया : सुधीर नाझरे)
Read More »रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा अजिंक्यपद आणि राज्य निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 07 ते 09 जूनपर्यंत करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील बॅडमिंटनपटूंसाठी सुवर्णसंधी असलेली ही स्पर्धा 11, 13, 15, …
Read More »वडवली परिसरात सात गुरे दगावली
विषप्रयोग झाल्याचा शेतकर्यांचा आरोप कर्जत : बातमीदार तालुक्यातील वडवली परिसरामधील नाल्याच्या बाजूला शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी सहा-सात गुरे दगावल्याचे समोर आले. ही गुरे नेमकी कशी दगावली आहेत, याची माहिती मिळाली नसली तरी विषप्रयोग झाला असल्याचा संशय शेतकरी आणि स्थानिकांनी केला आहे. कर्जत पंचायत समितीचे अधिकारी आणि पोलिसांनी या घटनेची पाहणी …
Read More »खासदार बारणे यांच्या विजयाची नेरळमध्ये मिरवणूक
कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विजयी झाले असून, त्या निमित्ताने नेरळमध्ये विजयी जल्लोष करण्यात आला. शहरातील शिवाजी महाराज चौकातून बाजारपेठ भागात मिरवणूक काढून आणि व्यापार्यांना लाडू वाटून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आंनद साजरा केला. नेरळमध्ये श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी मिळाली. त्याचा जल्लोष नेरळमध्ये साजरा करण्यात …
Read More »शेलू रेल्वे स्थानकात पादचारी पूल आणि निवारा शेडचे काम वेगाने सुरू
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मुंबई-कर्जत मार्गावरील शेलू स्थानक विकसित करण्यात येत आहे. या स्थानकात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहेत. दरम्यान, नवीन पादचारी पूल आणि निवारा शेडची कामे अंतिम टप्प्यात आली असून, पावसाळ्यापूर्वी दोन्ही कामे पूर्ण केली जातील असे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत बाजूकडील …
Read More »