Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मुरूड येथे पिकअप टेम्पो पलटी; 21 जण जखमी

मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील केळकर येथे किक्रेट मॅच खेळून महालोर गावातील मुले शनिवारी (दि. 11) रात्री 8 वाजता पिकअप  टेम्पो (एमएच 06, बीजी 2145)तून घरी परत येत होती. काही अंतर गेल्यानंतर एका चढावावरील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पलटी होऊन 21 जण जखमी झाले. त्यातील सहा जण गंभीर जखमी आहे. …

Read More »

माणगावजवळ वॅगनरची टेम्पोला धडक

माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टेमपाले गावच्या हद्दीत रविवारी (दि. 12) सकाळी वॅगनर कारने टेम्पोला समोरासमोर ठोकर दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, चारजण जखमी झाले आहेत. चालक अखिलेश मंगेश बोंबाडे (वय 22, रा. रत्नागिरी) हा त्याच्या ताब्यातील टाटा एस कंपनीचा टेम्पो (एमएच 08, एपी 1748) या गाडीत …

Read More »

वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर डोलवी गावाजवळ शुक्रवारी (दि. 11) पहाटे 2.15 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाची धडक बसून पादचारी जखमी होऊन मृत पावल्याची घटना घडली आहे. सुरेंद्र नगिना चौरसिया (रा. डोलवी) असे या मृत पादचार्‍याचे नाव असून तो मुंबई-गोवा महामार्गावरुन पायी चालत जात होता. या अपघाताची खबर न देताच ट्रक …

Read More »

माणगावजवळ इनोव्हा-स्कॉर्पिओ ठोकर

प्रवासी महिलेचा मृत्यू; चार जखमी माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगावजवळ कळमजे गावच्या हद्दीत रविवार (दि. 12) पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कार व स्कॉर्पिओ यांच्यात समोरासमोर जोरदार ठोकर झाली. या अपघातात इनोव्हामधील महिलेचा मृत्यू झाला असून, चारजण जखमी झाले आहेत. त्यांना माणगाव उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …

Read More »

पेणमधून 50 हजार इकोफ्रेंडली गणेशमूर्ती राज्याबाहेर रवाना

पेण ः प्रतिनिधी यंदाचा गणेशोत्सव 2 सप्टेंबर रोजी लवकर सुरू होत असल्याने पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळेत इकोफ्रेंडली गणेशमूर्तींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यावरणपूरक अशा छोट्या आणि मध्यम उंचीच्या बाप्पांच्या मूर्तींची सर्वत्र विखुरलेल्या गणेशभक्तांकडून मागणी होत असल्यामुळे परराज्यातील मागणीनुसार या गणेशमूर्तींचे वितरण पावसाळ्याआधी त्या त्या राज्यांत करण्याकडे मूर्तिकारांचा कल आहे. पेणमधून …

Read More »

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पाठ्यपुस्तके

दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना होणार लाभ अलिबाग ः प्रतिनिधी शासनाच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत देण्यात येणार्‍या मोफत पुस्तक सुविधेचा रायगड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या दोन लाख 30 हजार 741 विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. यंदा 11 लाख 35 हजार 119 पाठ्यपुस्तक वाटपाचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी …

Read More »

कर भरल्यास मोफत दळण

महाड तालुक्यातील खर्डी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम महाड : प्रतिनिधी ग्रामपंचायतीचा थकीत कर भरणा करा आणि वर्षभर मोफत दळण दळून घ्या, असा अभिनव उपक्रम महाड तालुक्यातील खर्डी ग्रामपंचायतीने सुरु केला आहे. कायम वादासाठी प्रसिद्ध राहिलेल्या या ग्रामपंचायतीने हा उपक्रम सुरु केल्याने कौतुक व्यक्त केले जात आहेच शिवाय विकासाच्या नवीन वाटचालीस ही …

Read More »

‘सदाचार-संस्कृतीचे जतन होणे काळाची गरज’

पाली : प्रतिनिधी मानवी कल्याणासह राष्ट्र उत्कर्षासाठी सदाचार व संस्कृतीचे जतन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत चंद्रानन सागर मुनी महाराज यांनी शनिवारी (दि. 11) पाली येथे केले. राष्ट्रसंत चंद्रानन सागर मुनी महाराज सध्या रायगड जिल्हा दौर्‍यावर असून, शनिवारी पालीतील आराधना भवनात एका कार्यक्रमात ते बोलत होते. अमुल्य असलेल्या मानवी …

Read More »

कर्जतच्या जलकुंभाला अस्वच्छतेचा गराडा

कर्जत : बातमीदार शहराला पाणी पुरवठा करणार्‍या जलकुंभाचा परिसर अस्वच्छतेच्या गराड्यात आहे. सर्वत्र धूम्रपान बंदी आहे, पण या पाणी साठवण टाकीच्या परिसरात धूम्रपान करणारे मनसोक्तपणे मजा लुटत असल्याचे सिद्ध होत आहे. दरम्यान, कर्जत नळपाणी योजनेच्या या टाकीजवळ असलेली अस्वच्छता ही रोगराई पसरविण्यास कारणीभूत ठरू शकते. कर्जत शहराला पाणी पुरवठा करणारी …

Read More »

ऑईल रस्त्यावर पडल्याने अनेक जण जखमी

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटातील टाटा कंपनी कॉलनी ते शिंग्रोबा मंदिर मार्गावर अज्ञात वाहनाच्या इंधन टाकीतून शनिवारी (दि. 11) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऑइल गळती झाली. त्यामुळे रस्ता निसरडा होऊन 10 ते12 मोटारसायकल घसरून  पडल्या. त्यात किमान 10 जणांना किरकोळ स्वरुपात जखमा झाल्या. या बाबतची माहिती मिळताच खोपोलीतील सामाजिक …

Read More »