अलिबाग : मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्याचा निकाल 84.97 टक्के लागला. उत्तीर्ण होण्यात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 80.05 टक्के मुले तर 90.63 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बारावीच्या परीक्षेला 14 हजार 338 मुली बसल्या होत्या, त्यातील 12 हजार 994 मुली उत्तीर्ण झाल्या. 90.63 टक्के मुली …
Read More »पद्मदुर्गावर लोकवर्गणीतून दोन तोफगाडे ; सह्याद्री प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
मुरूड ः प्रतिनिधी मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्या पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ल्यात जवळपास 41 तोफा असून, त्यातील काही तोफांची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. त्यापैकी दोन मोठ्या तोफा सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 26) तीनचाकी आणि चारचाकी लाकडी गाड्यांवर बसविण्यात आल्या आहेत. पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ल्यातील तोफांचे संवर्धन करण्याच्या हेतूने सह्याद्री प्रतिष्ठानने …
Read More »आमदार जयंत पाटील यांच्यावर कारवाई करा ; रायगडातील पत्रकारांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग येथील ‘लोकसत्ता’चे पत्रकार हर्षद कशाळकर यांना मारहाण करणारे शेकापचे आमदार जयंत पाटील व आमदार पंडित पाटील यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांकडून सोमवारी (दि. 27) रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात बेकायदा घुसून शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील …
Read More »पाणदिवे येथे करिअर गाईडन्सचे आयोजन
उरण : बातमीदार दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर आज अनेक प्रश्न उभे आहेत. त्यात दहावी, बारावीनंतर काय करावे, पुढे कोणती शाखा, क्षेत्र निवडावे, कोणते करिअर करावे, असे अनेक प्रश्न निकाल लागल्यावर पडतात. विद्यार्थ्यांप्रमाणे हाच प्रश्न त्यांच्या आई-वडिलांनाही सतावत असतो. त्या अनुषंगाने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्याच्या मनातील भीती दूर करून, त्यांचे गैरसमज …
Read More »उद्धर येथे नागाला जीवदान
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील उद्धर येथील जयंत गोडबोले यांच्या घरात रविवारी (दि.26) रात्री मोठा नाग आढळून आला. येथील सर्पमित्र तुषार केळकर यांनी या नागाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले. उंदरांच्या शोधात व गारवा मिळविण्यासाठी सध्या साप घरांमध्ये घुसण्याचे प्रमाण वाढत आहेत. असाच एक नाग रविवारी रात्री गोडबोले यांच्या घरात शिरला. …
Read More »कळंब जिल्हा परिषद गटात पोटनिवडणूक जाहीर
कर्जत : बातमीदार तालुक्यातील कळंब जिल्हा परिषद गटाचे सदस्य सुदाम पेमारे यांचे 28मे 2018 मध्ये निधन झाले होते. राज्य निवडणूक आयोगाने या गटाची पोटनिवडणूक जाहीर केली असून, येत्या 23 जून रोजी या जागेसाठी पोटनिवडणुक होणार आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये पाषाणे, मानिवली, पोशिर, साळोख, कळंब, वारे, ओलमण, नांदगाव, अंभेरपाडा, खांडस …
Read More »बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पाली : प्रतिनिधी सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे पालीत बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. शनिवार, रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी तर मोठ्या प्रमाणात भाविक पालीत दाखल होतात. या भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे रविवारी (दि. 26) पालीत वाहतूक कोंडी झाली होती. सोमवारीही नागरिकांना वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागले. उन्हाळी सुट्ट्यात …
Read More »माणगाव सणसवाडीत घरफोडी
माणगांव : प्रतिनिधी तालुक्यातील सणसवाडी येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने पाच लाख 90 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना 24 मे रोजी सायंकाळी 4 ते 25 मे रोजी सायंकायळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली. राजेंद्र बाबासाहेब नलावडे (वय 62) यांच्या सणसवाडी (ता. माणगांव) येथील घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा …
Read More »निजामपुरात पाण्यासाठी भटकंती
बंधारा पडला कोरडा; कोशिंबळे धरणही आटले, ग्रामस्थ तहानलेलेच माणगाव : सलिम शेख निजामपूर ग्रामपंचायत हद्दीतील काळ नदीवर उभारलेला विरोधा येथील बंधारा दोन महिन्यापुर्वीच कोरडा पडला असून, याच नदीवर असणारे कोशिंबळे धरणही आटल्याने निजामपूर व परिसरातील अनेक गावे आणि वाड्यांतील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. माणगाव तालुक्यातील निजामपूर तसेच परिसरातील …
Read More »नेमबाजी विश्वचषकात अपूर्वीचा ‘सुवर्ण’वेध
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या अपूर्वी चंदेला हिने सोनेरी लय कायम ठेवताना जर्मनीच्या म्युनिच येथे सुरू असलेल्या वर्षातील तिसर्या आयएसएसएफ रायफल पिस्तूल विश्वचषक स्पर्धेत रविवारी चुरशीच्या लढतीत महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. जयपूरच्या या नेमबाजाने अंतिम फेरीमध्ये एकूण 251 गुण नोंदवले. तिच्या वर्चस्वापुढे चीनच्या वांग लुयाओ 205.8 गुणांसह …
Read More »