आमदार भरत गोगावले यांचे प्रतिपादन महाड : प्रतिनिधी किल्ले रायगड संवर्धन आणि रायगड विभागाचा सर्वांगीण विकास केवळ शिवसेना, भाजप, आरपीआय युतीच्या सरकारनेच केला आहे. त्यामुळे नाते रायगड विभागातून महायुतीचे उमेदवार गीतेंना चार हजारचे मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला. तर पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर मोदींना …
Read More »रायगडचे राजकीय रण तापले
म्हसळ्यात तटकरेंच्या भ्रष्टाचारावर जहरी टीका म्हसळा : प्रतिनिधी महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी म्हसळा येथील श्री धावीरदेव पटांगणात झालेल्या सभेत गीतेंसह सर्वच वक्त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुनिल तटकरे यांच्यावर जहरी टिका केली. या निवडणुकीत भ्रष्टाचारी सापाला रायगडचा मतदार ठेचणार असल्याचा गीते यांनी सांगितले. या वेळी कृष्णा कोबनाक, नाविद अंतुले, सुलतान …
Read More »जगाच्या नेतृत्वाची मोदींमध्ये क्षमता
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन पाली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ आपल्या देशाचे नव्हे; तर संपूर्ण जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेले सक्षम नेते असल्याचे खणखणीत प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे काढले. ते महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ आयोजित संवाद बैठकीत बोलत होते. रायगड लोकसभा मतदारसंघातील …
Read More »बेकायदेशीर रासायनिक साठा महाड एमआयडीसीत जप्त
महाड : प्रतिनिधी : महाड एमआयडीसीमधील श्री हरी केमिकल्स कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेमध्ये घातक रसायनाने भरलेले सुमारे एक हजारपेक्षा अधिक ड्रमचा साठा असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळाताच त्वरित कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एका इसमाला अटक करण्यात आली असल्याचे महाड प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी सागर औटी यांनी …
Read More »कर्जतला भाजप संघटन स्थापना दिवस साजरा
कर्जत : बातमीदार : भारतीय जनता पक्षाचा संघटन स्थापना दिवस निमित्त शनिवारी (दि. 6) कर्जत तालुका भाजप कार्यालयात मान्यवरांना अभिवादन करून साजरा करण्यात आला. भाजप संघटन स्थापना दिनानिमित्त कर्जत तालुका पक्ष कार्यालयात भारतीय जनता पक्षाची स्थापना करणारे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या …
Read More »चला झाडे खिळे मुक्त करू या!
खोपोली सहज सेवा फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम खोपोली : प्रतिनिधी : येथील सहज सेवा फाऊंडेशनच्या सदस्यांनी खोपोली गावातील व आजूबाजूच्या परिसरात असणारी झाडे खिळे मुक्त करण्याचा संकल्प करून, शुभारंभ केला. शहरातील लक्ष्मीनगर रोडवर असलेल्या झाडाला सदस्यांनी प्रथम बॅनरपासून मुक्त केले. त्यानंतर त्या झाडावर असणार्या स्टेपलरच्या पिना व खिळे काढून टाकण्यात आले. …
Read More »रोह्यातील मिनीडोअर चालकाने दाखविला प्रामाणिकपणा
रोहे ः प्रतिनिधी : येथील मिनीडोअर चालक विक्रांत विलास राणे यांना रस्त्यावर पिशवीत सापडलेले 29100 रुपये त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने मूळ मालकाला परत केल्याने त्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रोहा तालुक्यातील इंदरदेव ठाकूरवाडी येथील गोविंद भाग्या शिद याला घरकुलचे 29100 रुपये मिळाले होते. ते पैसे बुधवारी (दि. 3) हरवले. …
Read More »नागोठणे ग्रामपंचायतीची धडक कारवाई
इमारतीचा पाणीपुरवठा केला तात्पुरता बंद नागोठणे : प्रतिनिधी : पाण्याच्या उधळपट्टीबद्दल वारंवार सूचना देऊनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणार्या नागोठण्यातील एका इमारतीचा पाणीपुरवठा ग्रामपंचायतीने तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतला असून, दंडाची रक्कम भरल्यानंतरच या इमारतीचा पाणीपुरवठा पूर्ववत चालू करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. नागोठण्यातील …
Read More »वैकल्पिक वाद निवारण केंद्रामुळे सर्वसामान्यांना लाभ -न्यायमूर्ती छागला
अलिबाग : प्रतिनिधी : अलिबाग येथे वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नव्या इमारतीचे कोनशिला अनावरण आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगड-अलिबागचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते. अलिबाग येथील विधी सेवा प्राधिकरण येथे …
Read More »वळके येथे गुढीपाडवा शोभायात्रा
मुरुड : प्रतिनिधी जगद्गुरू श्री नरेंद्रचार्य महाराज दक्षिण पीठ नाणीज धाम येथील दक्षिण रायगड विभागातर्फे वळके येथे गुढी पाडव्या निमित्ताने हिंदू नववर्षाच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.आज सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी वळके हायस्कूल येथून जगद्गुरू श्री नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नाम गाजराचा जयघोष करून मिरवणुकीस सुरुवात …
Read More »