Breaking News

क्रीडा

प्रिआ स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा

मोहोपाडा : प्रतिनिधीयेथील प्रिआ स्कूलच्या मैदानावर सात दिवसीय वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात झाली. विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला व सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत वैयक्तिक खेळांमध्ये 100 मीटर धावणे, बकेट बॉल, बास्केट बॉल, तीन पायांची शर्यत, बुक बॅलन्सिंग, बिस्कीट रेस, सॅक रेस, दोरी …

Read More »

जागतिक रॅपिड बुद्धिबळचे कोनेरू हम्पीला विजेतेपद

मॉस्को : वृत्तसंस्थाभारताच्या कोनेरू हम्पीने रशियातील मॉस्को येथे झालेल्या महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. हम्पीने चीनच्या लेई टिंगजीचा टाय ब्रेकरमध्ये पराभव केला. महिला गटात भारताच्या हम्पीने, तर पुरुष गटात नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने विजेतपद मिळवले.या स्पर्धेतील प्रत्येक फेरीत हम्पीने नऊ गुण मिळवल्याने ती टिंगजीसह बरोबरीत राहिली. दोघींचे गुण …

Read More »

‘यंग इंडिया’ सुसाऽऽट!

भारतीय युवा संघाचा आफ्रिकेवर सलग दुसरा विजय लंडन : वृत्तसंस्थावयाची 18 वर्षे पूर्ण करणारा मुंबईचा उदयोन्मुख खेळाडू यशस्वी जैस्वालने (नाबाद 89 धावा आणि 4 बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर 19 वर्षांखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला दुसर्‍या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आठ गडी आणि 202 चेंडू राखून पराभूत केले. या विजयासह भारताने …

Read More »

गोवठणे येथे प्रशांत स्पोर्ट्स चषक 2019

उरण : वार्ताहरगोवठणे येथे प्रशांत स्पोर्ट्सचे संचालक मनोज अशोक पाटील  यांच्या सौजन्याने मर्यादित षटकांची दोनदिवसीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 28) झाले.या वेळी भाजपचे उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, युवा अध्यक्ष सुरज म्हात्रे, संतोष वर्तक, रवी …

Read More »

पेणमधील सहा जलतरणपटू ‘बेस्ट ऑफ इंडिया’साठी सज्ज

पेण : प्रतिनिधीयेथील नगर परिषदेच्या कै. मामा वासकर जलतरण तलावात सराव करणारे पेण तालुक्यातील सहा जलतरणपटू धरमतर ते एलिफंटा आयलँड असे सहा वेळा म्हणजेच 233 किलोमीटर अंतर रिले पद्धतीने सलग चार दिवस व तीन रात्री पोहून जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. भावेश निलेश कडू, मधुरा गिरीश पाटील, नील योगेश वैद्य (12), …

Read More »

बुद्धिबळ स्पर्धेस पनवेलमध्ये प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तकाळण समाज, कवी रामदास शिंदे सार्वजनिक वाचनालय आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या 16व्या वर्धापन दिनानिमित खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा काळण समाज मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 165 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या हस्ते करण्यात …

Read More »

मेरीची निखतवर लीलया मात

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापुढील वर्षी होणार्‍या ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी आयोजित महिलांच्या बॉक्सिंग चाचणीत भारताच्या मेरी कोमने निखत झरीनला पराभूत करत आपले स्थान पक्क केले आहे. माजी ज्युनियर जागतिक विजेती निखत झरीन आणि सहा वेळा जगज्जेतेपद पटकाविणारी मेरी कोम ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी आयोजित महिलांच्या बॉक्सिंग चाचणीत शनिवारी (दि. 28) आमनेसामने आल्या होत्या. झरीनने …

Read More »

महेंद्रसिंह धोनीच फेव्हरेट कर्णधार

आयसीसीने विचारलेल्या प्रश्नास चाहत्यांचा प्रतिसाद नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने क्रिकेट चाहत्यांना या दशकातील सर्वांत आवडत्या कर्णधाराची निवड करण्यास सांगितले आहे. आयसीसीने ट्विटरवरून चाहत्यांना हा प्रश्न विचारला. या प्रश्नावर चाहत्यांनी त्यांची उत्तरे दिली आहेत. यामणध्ये सर्वाधिक चाहत्यांनी कर्णधार म्हणून भारतीय खेळाडूंची निवड केली आहे. क्रिकेटमधील या दशकातील सर्वांत आवडता …

Read More »

फुंडे हायस्कूलचे क्रीडा-वक्तृत्व स्पर्धेत सुयश

पनवेल ः रामप्रहर वृत्तसेवारयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथील विद्यार्थ्यांनी द्रोणगिरी स्पोर्ट्स उरण आयोजित क्रीडा आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी करून उज्ज्वल यश संपादन केले आहे.द्रोणगिरी स्पोर्ट्स उरण आयोजित पाच दिवसीय विविध स्पर्धांमध्ये फुंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. 20 डिसेंबर ते 25 डिसेंबरअखेर कला, …

Read More »

बीसीसीआयचा दणका

आशिया संघातून पाक खेळाडूंची गच्छंती? नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाबीसीसीआय आणि पाक क्रिकेट बोर्डातील वादाचा फटका आता पाकिस्तानी खेळाडूंना बसणार आहे. बांगलादेशचे दिवंगत नेते शेख मुजीबुर रेहमान यांच्या जयंतीनिमित्त बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयोजित केलेल्या टी-20 संघात पाकिस्तानी खेळाडूंना संधी मिळणार नसल्याचे समजते. आयसीसीने या दोन्ही टी-20 सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा दिला …

Read More »