पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल चेस असोसिएशन आणि काळण समाज कवी रामदास शिंदे सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बुधवारी (दि. 25) पनवेलच्या काळण समाज हॉलमध्येे सकाळी 9.30 वाजता सुरू होेईल. बुद्धिबळ स्पर्धा फक्त एकाच खुल्या गटात खेळविण्यात येईल. खुल्या गटात प्रथम …
Read More »एमएनएम विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे (एमएनएम) विद्यालय व तुकाराम नारायण घरत (टीएनजी) कनिष्ठ महविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली आहे. अरुणशेठ भगत यांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभास वसंतशेठ पाटील, अजय भगत, हेमलता भगत, विजय घरत, …
Read More »विंडीजविरुद्ध विराटचा डंका
तडाखेबंद खेळीने अनेक विक्रमांना गवसणी मुंबई : प्रतिनिधी वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका भारताने मोठ्या दिमाखात जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुलच्या स्फोटक फलंदाजीचा मोठा वाटा होता. विराटने आपल्या धमाकेदार खेळीत दोन विक्रम आपल्या नावे केले आहेत. विराट कोहलीने तिसर्या विकेटसाठी के. एल. राहुलसोबत 50 …
Read More »दारावे संघ आमदार चषकाचा मानकरी
पनवेल : रामप्रहर वृत्तहावमा एज्युकेशन अॅण्ड सोशियल असोसिएशन आणि स्टार क्रिकेट क्लब ओवे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आमदार प्रशांत ठाकूर चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद दारावे येथील मच्छिंद्र स्मृती संघाने पटकाविले. या संघाला दोन लाख रुपये व भव्य चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला प्रमुख मान्यवर म्हणून आमदार …
Read More »बास्केटबॉलपटू सतनाम निलंबित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (एनबीए) लीगमध्ये सहभागी झालेला भारताचा पहिला बास्केटबॉलपटू हा बहुमान मिळवणारा सतनाम सिंग भामरा उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे. त्यामुळे उत्तेजक द्रव्य प्रतिबंधात्मक संस्थेतर्फे (नाडा) त्याच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात बंगळुरू येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सराव शिबिरादरम्यान …
Read More »दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा भारताचे पदकांचे द्विशतक
काठमांडू : वृत्तसंस्था भारताने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पदकांच्या सुवर्णशतकासह द्विशतकाचा टप्पा ओलांडला आहे. जलतरण आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांमधील वर्चस्वाच्या बळावर भारताने सहाव्या दिवशी ही किमया साधली. कुस्तीपटूंनी ‘सॅफ’ अभियानाला शानदार प्रारंभ करताना चार सुवर्णपदकांची कमाई केली. सत्यवर्त कडियान (पुरुष 97 किलो फ्री स्टाइल), सुमित मलिक (पुरुष 125 किलो …
Read More »‘आरटीआयएससी’च्या रक्षा कंदसामीला राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक
पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मध्ये प्रशिक्षण घेणारी बॅडमिंटनपटू रक्षा कंदसामी हिने ऑल इंडिया सब ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकाविले आहे. ही स्पर्धा नुकतीच बिहारमधील भागलपूर येथे झाली. 12 वर्षीय रक्षा ही नेरूळ येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. तिने महाराष्ट्राकडून खेळताना ऑल …
Read More »कराटेत इंगळे भावा-बहिणीचे सुयश
कर्जत : बातमीदार किमुरा शोकोकाई कराटे इंटरनॅशनल इंडियाच्या वतीने डोंबिवली येथील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अजिंक्य इंगळे आणि अस्मिता इंगळे या बहीण-भावंडाने पदके पटकाविली. त्यांचे कौतुक होत आहे. या स्पर्धेत सुमारे 255 खेळाडूंनी सहभाग घेतला. यात टिटवाळा शहरातील विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन येथे प्रशिक्षण …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून कुस्तीपटूंना शुभेच्छा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयातील तसेच पनवेल परिसरातील कुस्तीपटूंची विविध आंतरराष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व खेळाडूंचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी अभिनंदन केले आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सीकेटी महाविद्यालयातील कुस्ती प्रशिक्षक रूपेश …
Read More »पोलिसांनो, तुम्हाला सलाम!, हैदराबाद इन्काऊंटवर सायनाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया
हैदराबाद : वृत्तसंस्था सध्या चर्चेत असलेल्या हैदराबाद बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी रात्री पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. भारताची फुलराणी सायना नेहवाल हिने पोलिसांच्या या कृत्याला पाठिंबा दिला आहे. तुम्ही उत्तम काम केलंत. हैदराबाद पोलीस, तुम्हाला सलाम, असे ट्विट करीत तिने पोलिसांचे समर्थन केले. बहुचर्चित प्रकरणातील चार आरोपींनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper