Breaking News

क्रीडा

भारताला अद्यापही फायनलची संधी

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा नवी दिल्ली : वृत्तसंस्थाविराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला चेन्नई कसोटी सामन्यात इंग्लंडकडून मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवासाह भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) गुणतालिकेतील अव्वल स्थान गमाविले. गुणतालिकेत टीम इंडियाची पहिल्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे भारतावर मोठा …

Read More »

सचिन, सेहवाग, लारा, मुरलीधरन पुन्हा उतरणार मैदानात

मुंबई : प्रतिनिधीइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताच्या पराभवाने निराश झालेल्या क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानावर फटकेबाजी करताना दिसणार आहे. पुढील महिन्यात सुरू होणार्‍या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज क्रिकेट स्पर्धेत सचिन खेळणार आहे. त्याच्यासह वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा आणि मुथय्या मुरलीधरन हे दिग्गजही …

Read More »

टीम इंडियाचे विमान जमिनीवर!

पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून दारुण पराभव चेन्नई : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर मायदेशात पहिलीच कसोटी मालिका खेळणार्‍या टीम इंडियाचे विमान जमिनीवर आले. इंग्लंड संघाने यजमान भारतावर 227 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 420 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा चौथा डाव 192 धावांवर आटोपला. कर्णधार विराट …

Read More »

चेन्नई कसोटी रंगतदार स्थितीत; भारताला विजयासाठी 381 धावांची, तर इंग्लंडला नऊ बळींची गरज

चेन्नई : वृत्तसंस्था इंग्लंडने दिलेल्या 420 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाखेर भारतीय संघाने एका गड्याच्या मोबदल्यात 39 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघाला शेवटच्या पाचव्या दिवशी विजयासाठी 381 धावांची गरज आहे, तर इंग्लंड संघाला ऐतिहासिक नऊ गडी बाद करावे लागतील. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल …

Read More »

कपडा व्यापार्‍याने तयार केलीय चेन्नईची खेळपट्टी

चेन्नई : वृत्तसंस्था भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातून 43 वर्षीय व्यक्तिचेही पदार्पण झाले आहे. 2021 वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात व्ही. रमेश कुमार यांना तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून कॉल गेला… इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीसाठीच्या खेळपट्टीच्या क्युरेटरची जबाबदारी स्वीकाराल का, असे त्यांना विचारण्यात आले. रमेश यांनाही हे आश्चर्यकारक वाटले. यापूर्वी त्यांनी कधीच …

Read More »

आयपीएल 2021 : स्मिथ-मॅक्सवेलसह 13 खेळाडूंची बेस प्राइज सर्वाधिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेच्या 2021च्या हंगामासाठी 18 फेब्रुवारी रोजी लिलाव होणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलसह 13 खेळाडूंची मूळ किंमत सर्वाधिक दोन कोटी रुपये आहे. प्रत्येक संघात कमाल 25 खेळाडूंना स्थान देता येते. लिलावात 814 भारतीय आणि 283 परदेशी खेळाडूंचा …

Read More »

मोठ्या आव्हानापुढे टीम इंडिया ढेपाळली; पुजारा-पंतने सावरले; मात्र संघ अद्याप 321 धावांनी पिछाडीवर

चेन्नई : वृत्तसंस्था इंग्लंड संघाने दिलेल्या 579 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना तिसर्‍या दिवसाखेर भारतीय संघाने सहा गड्यांच्या मोबदल्यात 257 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघ अद्याप 321 धावांनी पिछाडीवर आहे. तिसर्‍या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वॉशिंगटन सुंदर (33) आणि आर. अश्विन (8) नाबाद होते. दिग्गज फलंदाज झटपट माघारी परल्यामुळे भारतीय …

Read More »

स्टेडियम वेधतेय क्रीडारसिकांचे लक्ष

बलुचिस्तान : वृत्तसंस्थाक्रिकेटचे मैदान सहसा अशा एखाद्या ठिकाणी असते जिथून काही अफलातून दृश्य पाहता येतात. जगभरात अशी अनेक क्रिकेटची मैदाने आहेत. भारतातही धरमशाला येथील क्रिकेट स्टेडियम, मरिन ड्राईव्हपाशी असणारं मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियम ही त्यापैकीच काही नावे. तिथे क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉर्ड्सलाही विसरून चालणार नाही. आता याच यादीमध्ये …

Read More »

अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या लिलावात

मुंबई : प्रतिनिधीआयपीएलच्या 14व्या हंगामासाठी 18 फेब्रुवारीला लिलाव प्रक्रिया होणार आहे. या वेळी अनेक नवोदित खेळाडूंनी नोंदणी केली आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनचाही या लिलावात समावेश आहे. 20 लाख रुपये त्याची मूळ किंमत आहे.लिलावासाठी 814 भारतीय आणि 283 परदेशी खेळाडूंचा यात समावेश आहे. यात वेस्ट …

Read More »

रूटचे द्विशतक; इंग्लंडचा धावांचा डोंगर

चेन्नई : वृत्तसंस्थाभारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने दुसर्‍या दिवसअखेर 8 बाद 555 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार जो रूटचे दमदार द्विशतक आणि डॉम सिबली, बेन स्टोक्स यांची अर्धशतके यांच्या जोरावर इंग्लंडने धावांचा डोंगर उभारला. दिवसातील पहिल्या दोन सत्रांवर इंग्लंडने पूर्णपणे वर्चस्व राखल्यानंतर शेवटच्या सत्रात भारतीय गोलंदाजांना काहीसे यश मिळाले, पण …

Read More »