Breaking News

Ankit Shah

मच्छीमार उद्ध्वस्त!

मासेमारीला कोरोनाचा फटका; शासकीय मदतीची अपेक्षा श्रीवर्धन ः प्रतिनिधी – गतवर्षीचे चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यांच्या नुकसानातून उठत नाही, तोच मच्छीमारांना कोरोनामुळे झालेल्या अतोनात नुकसानाला सामोरे जावे लागले आहे. मासळी विक्रीला परवानगी देण्यात आली असली तरी ग्राहकांअभावी बहुतांश बांधवांचा खिसा रिकामाच राहिला आहे. त्यात महाराष्ट्र सरकारकडून 140 कोटी रुपयांचा डिझेल परतावा …

Read More »

नागोठणे येथे फेस शिल्डचे वाटप

नागोठणे : प्रतिनिधी – नागोठणे येथील सुभाष ओटरमल जैन यांनी कोरोनाच्या लढाईत आपल्या प्राणाची बाजी लावून काम करणारी पोलीस यंत्रणा तसेच आरोग्य पथक आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांना फेस शिल्डचे वाटप करून आपली कृतज्ञता व्यक्त केली.  जैन यांनी साहित्याचा संच पोलीस ठाणे, ग्रामपंचायत कार्यालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी जावून …

Read More »

परराज्यात जाण्याची माहिती देण्यासाठी तहसील कार्यालयांबाहेर गर्दी

अलिबाग ः प्रतिनिधी – परराज्यातील रायगड जिल्ह्यात अडकलेले जे नागरिक आपल्या राज्यात परत जाऊ इच्छितात त्यांची माहिती जमा केली जात आहे. प्रत्येक तहसील कार्यालयात परराज्यातील नागरिकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे. आपली माहिती देण्याकरिता तहसील कार्यालयांत हे नागरिक गर्दी करू लागले आहेत. राज्यात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी …

Read More »

विदेशी दारू विक्री करणारा अटकेत

नवी मुंबई पोलिसांची कारवाई उरण : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर – जगभरात कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढत असतांना पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत नवी मुंबई ऐरोली येथे विदेशी दारू विक्रीसाठी आलेल्या इसमास नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने रंगेहात पकडून मुद्देमुलासह अटक केली आहे. पोलीस सूत्रांकडून …

Read More »

वाशीच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात अफवेमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

परराज्यात जाण्यासाठी एकच गर्दी नवी मुंबई : बातमीदार – कोरोनाने हाहाकार माजवलेला असतानाच अफवेच्या पिकांना देखील उत आलेला आहे. याचा प्रत्यय शनिवारी (दि. 2) नवी मुंबईत आला नि वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात अर्ज करण्यासाठी नागरिकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. मात्र यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. परराज्यात जाण्यासाठी नवी मुंबई …

Read More »

सोडिअम हायफोक्लोराईड फवारणीसंदर्भात बैठक

खारघर : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण काळुराम पाटील यांनी पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी भगवान पाटील (प्रभाग समिती अ), आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे (प्रभाग समिती अ), आरोग्य निरीक्षक खारघर विभाग जितेंद्र मढवी यांच्या सोबत शनिवारी (दि. 2) सोडिअम हायफोक्लोराईड फवारणीसंदर्भात एक आढावा बैठक घेतली.  दिवसेंदिवस खारघरमधील …

Read More »

खांदा कॉलनीतील कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने करण्यात यावी -गणेश पाटील

कळंबोली : प्रतिनिधी – पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खांदा कॉलनी वसाहतीतील नाले, गटारे सफाई, रस्त्यांची डागडुगी तसेच फुटपाथची दुरूस्ती पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी सिडको प्रशासनाकडे केली आहे. ही सर्व कामे प्रकल्पग्रस्त करत आले आहेत पण यावर्षी कोरोना महामारीचा फायदा उठवत सिडको अधिकार्‍यांनी त्यांच्यावर अन्याय केला …

Read More »

तीन महिन्यांचा मालमत्ता, पाणी कर माफ करा

आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार – कोरोना व्हायरसमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेला आहे. उद्योग, व्यवसाय आणि रोजगार-स्वयंरोजगार ठप्प झाल्याने विविध शासकीय देयके भरताना नाकीनऊ येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि लघु उद्योजकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने तीन महिन्यांचा मालमत्ता व पाणी कर माफ करावा, …

Read More »

कम्युनिटी किचनसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त – श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि खारघर भाजप यांच्या वतीने अन्नछत्र (कम्युनिटी किचन) सुरु करण्यात आले आहे. या अनुषंगाने नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवारी (दि. 2) अनेक जणांनी आर्थिक मदत केली. यामध्ये ईश्वर नारायण पटेल 10,000 रुपये, दुर्गादास महाजन …

Read More »

गावागावांत जनता कर्फ्यूची हाक

पनवेल : बातमीदार – नवी मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या सर्वांच्या चिंतेचे कारण ठरली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील गावागावांत स्वयंघोषित जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात येत आहे. घणसोली गावात सलग सहा दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले असून मंगळवारपासून गावात हा कर्फ्यू लागला आहे. त्यामुळे गावातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. कोपरखैरणेतील …

Read More »