Breaking News

Ankit Shah

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

पनवेल ः रामप्रहर वृत्त 63वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पनवेल आणि कामोठे येथे मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी अशोका विजयादशमी दिवशी बौद्ध धर्माची …

Read More »

भाजपमध्ये जोरात इनकमिंग

खांडसगाव, उमरोलीत राष्ट्रवादी, शेकापला खिंडार पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरूच आहे. त्याअंतर्गत कर्जत तालुक्यातील खांडसगावातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तसेच पनवेल तालुक्यातील उमरोली गावातील शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये सोमवारी जहीर पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. …

Read More »

महेश बालदी विरोधकांची शिटी वाजविणार -सरपंच पूनम महेश कडू

उरण ः रामप्रहर वृत्त कार्याशी तत्पर असणार्‍या भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी महेश बालदी यांनी 190 उरण विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी विरोधकांनी देव पाण्यात ठेवण्याचे काम केले होते.परंतु विरोधकांचे हे मनसुबे उधळून लावत आपला उमेदवारी अर्ज महेश बालदी यांनी कार्यर्कत्यांच्या आग्रह खातर व जनता …

Read More »

बाल्मर लॉरी कामगारांना पगारवाढ

सल्लागार रामशेठ ठाकूर यांचे मानले आभार पनवेल : रामप्रहर वृत्त जय भारतीय कामगार संघटनेच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक क्षेत्रातील बाल्मर लॉरी कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढ झाली. त्याबद्दल कामगारांनी संघटनेचे सल्लागार लोकनेते रामशेठ ठाकूर व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. या वेळी जय संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, …

Read More »

खारघरमध्ये भाजपचा झंझावात

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. त्या अनुषंगाने खारघर विभागात सोमवारी (दि. 7) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी पनवेल महापालिकेचे …

Read More »

भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात रास गरबा स्पर्धेचा जल्लोष

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात रास गरबा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेकरिता अर्चना परेश ठाकूर आणि भाग्यश्री देशमुख यांनी या स्पर्धेत परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्त्री शक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाच्या, …

Read More »

फसवे हितचिंतक

कृषी क्षेत्रासमोर अशी आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यादृष्टीने विचारमंथनास हातभार लावण्याऐवजी, त्यादृष्टीने शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्याऐवजी राज्यातील विरोधीपक्षांनी सत्तेच्या लालसेने पुन्हा एकदा शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफीचे गाजर दाखवले आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यास शेतकर्‍यांसाठी सरसकट कर्जमाफी देण्याच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन हे पक्ष देत आहेत. गेली काही वर्षे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी …

Read More »

प्लास्टिकमुक्त वसुंधरा अभियानाला झोकात सुरुवात

भारत विकास परिषदेचा एक अभिनव उपक्रम आमदार प्रशांत ठाकूर, महापौरांकडून कौतुक खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेने पर्यावरण संरक्षणाबद्दल जनजागरण करण्यासाठी एक अभियान हाती घेतले आहे. 2 ऑक्टोबर रोजी या प्लास्टिकमुक्त वसुंधरा मोहिमेचा आरंभ झाला. पनवेल, …

Read More »

गव्हाण विद्यालयात गरबा नृत्याविष्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेस 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शताब्दी महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त विविध कार्यक्रम होत असून, संस्थेच्या श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी खास गरबा नृत्याविष्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुला-मुलींनी दांडिया नृत्य अर्थात गरबा …

Read More »

गुरुकुल स्कूलचे स्केटिंग स्पर्धेत यश

मोहोपाडा ः वार्ताहर जिल्हास्तरीय स्केटिंग प्रतियोगिता 2019चे आयोजन याक पब्लिक स्कूल येथे करण्यात आले होते. यामध्ये श्री स्वामी-नारायण गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून आपल्या विशेष प्रावीण्याच्या जोरावर विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळविला. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा गटातून आपापल्या नैपुण्याचे प्रदर्शन केले. ही स्केटिंग स्पर्धा 11 वर्षे, 14 वर्षे व 17 वर्षे …

Read More »