Breaking News

Ramprahar News Team

महाडमधील बगिच्यांची दुरवस्था ऐन सुट्टीच्या काळात बागेतील खेळणी नादुरुस्त, नगर पालिकेचा अनाठायी खर्च

महाड : प्रतिनिधी परीक्षा संपताच महाडमधील मुलांची पावले बगीच्याकडे वळली मात्र बगिच्यांची झालेली दुरवस्था पाहून बच्चेकंपनी चांगलीच नाराज झाली आहे. महाडमध्ये असलेल्या बागांची दुरावस्था झाली आहे. शहरात छत्रपती शिवाजी चौकातील एकमेव बाग सध्या सुरु असते मात्र या बागेतील खेळणी मोडली आहेत. शहरातील इतर बगीचे तर ओस पडले आहेत. विविध ठेक्याच्या …

Read More »

जंगलात पक्षांसाठी पाणवठे, रोह्यातील स्वामीराज फाउंडेशनचा उपक्रम

रोहे : प्रतिनिधी उन्हाळ्यात जंगलातील पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी   रोह्यातील स्वामीराज फाउंडेशनच्या वतिने अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यात्रेत टाकलेल्या प्लास्टिक बाटल्या एकत्र  करुन फांउडेशनच्या कार्यकर्त्यानी त्या जंगलात टांगून ठेवल्या आहेत. त्यात पाणी साठवण करण्यात येत असल्याने जंगलातील पक्षांची तहान भागत आहे. या उपक्रमाबद्दल स्वामीराज फांउडेशनचे सर्वत्र कौतुक …

Read More »

म्हसळ्यामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, कुंभारवाड्यातील मुलांना घेतला चावा

म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा नगरपंचायत हद्दीत मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, शुक्रवारी (दि. 3) कुंभारवाडा परिसरांतील योगेश देऊळकर यांच्या घरी आलेल्या अर्जुन, आरोही यांच्यासह छोट्या 2-3 मुलांना कुत्रा चावल्याची घटना घडली. त्यांच्यावर येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार करण्यात आले. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीबरोबरच म्हसळा शहरांत मोकाट गुरांचे प्रमाण वाढले …

Read More »

जादूगार अवधूतने नेरळकरांना हसवले…. जयदीप मंडळाच्या कार्यक्रमात जादूचे प्रयोग

कर्जत : बातमीदार नेरळ येथील जयदीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बुधवारी महाराष्ट्र राज्य स्थापना दिन साजरा केला. रात्री जादूगार अवधूत यांनी जादूचे प्रयोग सादर केले. त्यावेळी शेकडो बालगोपाळ आणि महिलांनी जादूचे प्रयोग पाहण्यासाठी गर्दी केली होती. नेरळ पूर्वेचा राजा समजल्या जाणार्‍या जयदीप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने बुधवारी महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

विद्यार्थ्यांचे नुकसान करणार नाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा कर्जत इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांना दिलासा, उपोषण स्थगित

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे नुकसान करणार नाही, असे आश्वासन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे दिल्याने कर्जत एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थी आणि पालकांनी सुरू केलेले उपोषण गुरुवारी (दि, 2) रात्री दहा वाजता स्थगित करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांचे वाढीव गुण मुंबई बोर्डाला वेळेत न कळविणार्‍या मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, …

Read More »

माणगावात वनखात्याच्या धाडीत 111 पोती कोळसा जप्त

माणगाव : प्रतिनिधी वणवे, वृक्षतोड आणि कोळशांच्या भट्ट्या यामुळे कोकणची वनसंपत्ती नष्ट करणार्‍या गुन्हेगारांवर जरब बसविण्याच्या दृष्टीने वनखात्याच्या फिरत्या पथकाने आता जोरदार पावले उचलली आहेत. रोहा येथील वनखात्याच्या संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज सकाळी रातवड गावातील विलास सुर्वे यांच्या मालकीच्या जागेत धाड टाकून कोळशाच्या 111 पोती जप्त करण्यात आल्या …

Read More »

निसर्ग मित्र संघटनेतर्फे गाढी नदी स्वच्छता अभियान

पनवेल : बातमीदार तालुक्यातील गाढी नदी कचर्‍याच्या समस्येमुळे प्रदूषित झाली आहे. ठिकठिकाणी नदीत टाकत असलेल्या कचर्‍यामुळे गाढी नदी कचरामय झाली आहे. गाढी नदीच्या परिसरात निसर्ग मित्र संघटनेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी (ता. 1) चिपळे पुलाखालील मोठ्या प्रमाणातील कचरा काढून टाकण्यात आला. पनवेल तालुक्यात नागरिकीकरण मोठ्या …

Read More »

दगडाच्या सहाय्याने मारहाण, गुन्हा दाखल

पनवेल : कलंबोली येथे एका 40 वर्षीय इसमाला शिवीगाळी व दमदाटी करून दगडाच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष मारुती चौधरी हे रिक्षा परमीटसाठी सोसायटीतर्फे रहिवासी दाखला पाहिजे म्हणून सोसायटीचे अध्यक्ष महादेव किसन कोकरे यांच्या घरी गेले होते. त्यानंतर कोकरे व योगेश आबाजी …

Read More »

सत्याग्रह महाविद्यालयात करिअर आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या 16 ते 20 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यासाठी, शांताबाई रामराव सभागृह सत्याग्रह महाविद्यालय, खारघर, नवी मुंबई येथे रविवार दि. 5 मे 2019 रोजी सकाळी 10.30 ते 04.30 वेळात करिअर आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन संस्थेच्यावतीने केले आहे. संस्थेच्या माजी अध्यक्षा दिवंगत शांताबाई …

Read More »

ज्येष्ठ नागरिक संघात चैत्रगौरी पूजन व महाराष्ट्र दिन साजरा

पनवेल ः रामप्रहर वृत्त मराठी कालगणनेनुसार चैत्र महिना हा मराठी वर्षाचा पहिला महिना. वसंत ऋतूची सुरुवात. त्याचेच औचित्य साधून पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघाने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त बुधवारी (दि. 1) चैत्र गौरी पूजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रथम सचिव जयवंत गुर्जर यांनी़ कुरखेडा (गडचिरोली) येथे झालेल्या नक्षलवाद्यांच्या भ्याड …

Read More »