पोलादपूर : प्रतिनिधी राज्यात तापमानाचा पारा सातत्याने वर चढत असताना कोकणातही उष्मा वाढत असून, पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथे रविवारी (दि. 28) 44 अंश एवढ्या तापमानाची नोंद मोबाईलमध्ये दिसून आली. सर्वसाधारणपणे राज्यात विदर्भात उष्णतेचा भडका उडालेला पाहावयास मिळतो, पण रखरखीत उन्हाच्या झळा आता कोकणातही जाणवू लागल्या आहेत. रविवारी दुपारी दोन ते …
Read More »शेकापच्या कार्यकर्त्याला पुन्हा पैसे वाटताना पकडले; सुकापूरमधील घटना; पोलिसांत गुन्हा दाखल
पनवेल : बातमीदार कामोठ्यात मतदारांना पैसे वाटप करताना शेकाप कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी (दि. 28) सुकापूरमध्येही असाच प्रकार घडला. याप्रकरणी प्रताप रामचंद्र आरेकर या शेकाप कार्यकर्त्याला अटक करून त्याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मतदान …
Read More »चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान ; मावळमध्ये 12,659 अधिकारी-कर्मचारी सज्ज
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि. 29) नऊ राज्यांतील 71 जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 17 जागांचा समावेश असून, सर्वांचे लक्ष मावळ मतदारसंघाकडे लागले आहे. मावळमधील सहा विधानसभा मतदारसंघांसाठी 12 हजार 659 अधिकारी व कर्मचार्यांची मतदान प्रक्रियेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या मावळ …
Read More »आता राष्ट्रवादीच्या नेत्याने उधळली मुक्ताफळे; म्हणे स्वातंत्र्यलढ्यात जिनांचे मोठे योगदान!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिनांवर स्तुतिसुमने उधळल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते माजीद मेनन यांनीही जिनांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. भारताच्या स्वातंत्र्यात आणि प्रगतीत काँग्रेसमधील जवाहरलाल नेहरूंपासून मोहम्मद अली जिना यांचे योगदान असल्यामुळे …
Read More »बंगळुरुला हरवून दिल्ली ‘प्ले-ऑफ’मध्ये
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएलच्या बाराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाने ‘प्ले-ऑफ’च्या गटात दाखल होण्याचा बहुमान मिळवला आहे. घरच्या मैदानावर खेळत असताना दिल्लीने बंगळुरुवर 16 धावांनी मात केली. बंगळुरुच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांना टक्कर दिली, मात्र मोक्याच्या क्षणी दिल्लीने भेदक गोलंदाजी करून बाजी मारली. बंगळुरु संघ 171 धावांपर्यंत मजल मारू शकला. विराट …
Read More »राजस्थानची हैदराबादवर मात
जयपूर : वृत्तसंस्था आयपीएलच्या बाराव्या हंगामातील घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळणार्या राजस्थानने शेवट गोड करीत हैदराबादवर सात गडी राखून विजय मिळवला. मनीष पांडेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने राजस्थानला 161 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने 5 चेंडू राखून सहज पूर्ण केले. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे आणि …
Read More »‘भारत-पाक सामन्याला युद्ध म्हणून पाहून नका’
लाहोर : वृत्तसंस्था इंग्लंड आणि वेल्स येथे होऊ घातलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेला अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. 30 मे ते 14 जुलै या कालावधीत रंगणार्या या महासंग्रमात 10 अव्वल संघ जेतेपदासाठी भिडतील, पण भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धींच्या लढतीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत उभय संघांमधील …
Read More »नवी मुंबईतील 14 कराटेपटूंची मलेशिया ओपनसाठी निवड
नवी मुंबई : प्रतिनिधी मलेशिया येथे होत असलेल्या मलेशिया ओपन कराटे चॅम्पियनशीप 2019 या स्पर्धेसाठी नेरूळ येथील साई स्पोर्ट्स अकादमीच्या 14 खेळाडूंची निवड झाली असल्याची माहिती प्रशिक्षक मनीषा पाटणे व अमर पाटणे यांनी दिली. या स्पर्धेत काता व कुमाते या प्रकारात स्पर्धा होणार आहेत. मलेशिया येथील सुबा कराटे अकॅडमी इंडो-मलेशया …
Read More »पंत भारतीय संघात हवा होता -सईद अजमल
मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात रिषभ पंतचे नाव नसल्याने अनेकांना धक्का बसला. महेंद्रसिंग धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून रिषभचे नाव आघाडीवर असताना निवड समितीने दिनेश कार्तिकच्या नावाची निवड केली. रिषभ हा 21 वर्षांचा आहे आणि त्याला भविष्यात वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्याची …
Read More »माझ्याकडून नियमांचे उल्लंघन झालेले नाही -सचिन तेंडुलकर
मुंबई : वृत्तसंस्था ‘माझ्याकडून बीसीसीआयच्या हितसंबंधांबाबतच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही, तसेच मी मुंबई इंडियन्स आयपीएल संघाकडून कोणताही मोबदला घेत नाही,’ असे स्पष्टीकरण देतानाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. बीसीसीआयचे चौकशी अधिकारी डी. के. जैन यांनी पाठवलेल्या नोटीशीला दिलेल्या 14 मुद्द्यांचा अंतर्भाव असलेल्या उत्तरात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper