लोणावळा ः प्रतिनिधी लोणावळा येथील सुनील वॅक्स म्युझियममध्ये गल्ल्यामधील दोन लाख रुपये, दोन संगणकाचे मॉनिटर व एक एलइडी टीव्ही असा दोन लाख 45 हजारांचा मुद्देमाल चोरून राजस्थान येथे पोबारा केलेल्या तीन जणांना लोणावळा पोलिसांनी अटक केली आहे. वॅक्स म्युझियमचे व्यवस्थापक अनिलकुमार तामराशन यांनी या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार …
Read More »रेडलाइट एरियात कोम्बिंग ऑपरेशन; 18 मुलींची सुटका
पुणे ः प्रतिनिधी बुधवार पेठेतील रेड लाइट एरियात काही घरांत मुलींच्या इच्छेविरुद्ध डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून परिमंडळ एकमधील अधिकारी व कर्मचार्यांनी कोम्बिंग ऑपरेशन करून 18 मुलींची सुटका केली़. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी 9 घरमालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. जहाना मोहंमद, रजा शेख, रुपा …
Read More »काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता विखे-पाटलांची पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी
मुंबई ः प्रतिनिधी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर काँग्रेसच्या प्रचारापासून लांब राहिलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. माझी भूमिका मी पक्षाकडे पत्राद्वारे स्पष्ट केली आहे. निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचे जे वास्तव आहे ते पक्षश्रेष्ठींकडे मांडले आहे. कार्यकर्ते काँगेसवर नाराज आहेत. …
Read More »मिस टीन युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धा अलिबागची अपूर्वा जगात तिसरी
अलिबाग : प्रतिनिधी पनामा येथे आयोजित मिस टीन युनिव्हर्स 2019 या जागतिक सौंदर्य स्पर्धेत अलिबागची अपूर्वा ठाकूर हिने भारताचे प्रतिनिधित्व करताना तिसरा क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक ब्राझील, तर द्वितीय मेक्सिकोच्या सौंदर्यवतीने प्राप्त केला. संपूर्ण जगभरातून भारताचे नाव पहिल्या तीन क्रमांकामध्ये आणल्याबद्दल अपूर्वावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमेरिकेत झालेल्या …
Read More »अनंत गीते यांचा गनिमी कावा काँग्रेस, शेकाप नेत्यांची घेतली अलिबागेत भेट
अलिबाग : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप व मित्रपक्ष युतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी गनिमी काव्याने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी अलिबाग तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंत गोंधळी आणि शेकापचे नेते बाळ तेलंगे यांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे. गीते यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे …
Read More »राहुल गांधींना पराभूत करणार; डाव्यांचा निर्धार
तिरुवनंतपुरम : वृत्तसंस्था काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याबाबत काँग्रेसकडून घोषणा झाल्यानंतर डाव्या पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राहुल यांनी वायनाड येथून निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे केरळमध्ये काँग्रेसने डाव्या पक्षांशी पुकारलेली थेट लढाई असून, येथे त्यांना पराभूत करू, असे डाव्या नेत्यांनी …
Read More »खासदार श्रीरंग बारणेंचा झंझावात ; प्रचार दौरे, बैठकांना महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद
पनवेल : वार्ताहर मावळ मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांनी रविवारी (दि. 31) पनवेल मतदारसंघात विभागवार प्रचार दौरा केला, तसेच बैठका घेतल्या. त्यास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मतदारांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे पाहावयास मिळाले. या वेळी सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनचे सुयश
पनवेल : वार्ताहर राष्ट्रीय किकबॉक्सिंग फेडरेशन चषक स्पर्धा नुकतीच पुण्यातील बालेवाडी येथे घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी सुयश संपादन केले आहे. या स्पर्धेत रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी स्पर्धेत दमदार कामगिरी करून आपली छाप पाडली. यात प्रद्युम्न म्हात्रे व प्रणय टोपले याने (पॉइंट फाईट व किक …
Read More »किकबॉक्सिंगमध्ये हर्षदा, पंक्तीला पदक
पनवेल : वार्ताहर पुणे बालेवाडी वाको इंडिया किकबॉक्सिंग असोसिएशनने आयोजित राष्ट्रीय किकबॉक्सिंग फेडरेशन चषक स्पर्धेत रायगड जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडू हर्षदा मोकल हिने पॉईंट फाईट या प्रकारात रौप्यपदक व लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात कांस्यपदक; तर पंक्ती पाठक हिने पॉईंट फाईट या प्रकारात कांस्यपदक पटकावून रायगडसह महाराष्ट्राचे नाव उंचावले. हर्षदा व पंक्ती …
Read More »पृथ्वी शॉ नर्व्हस 90 चा शिकार
मुंबई : प्रतिनिधी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातीला सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आला आणि यात दिल्लीने 3 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ नर्व्हस 90चा शिकार ठरला. त्याला 99 धावांवर माघारी जावे लागले. पृथ्वीने 55 चेंडूंत 12 चौकार व 3 षटकारांनिशी 99 धावा केल्या, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper