आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नांना यश माणगाव : प्रतिनिधी राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत माणगाव तालुक्यात अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना मंजूरी मिळाली असून, लवकरच ही कामे मार्गी लावू, अशी आमदार भरत गोगावले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. आमदार भरत गोगावले यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने …
Read More »सरसगडाच्या पायर्यांवरून घसरून तरुण पडला
स्थानिक व रेस्क्यू टीमच्या मदतीने आणले खाली पाली, खोपोली : प्रतिनिधी सुधागड पालीतील सरसगड किल्ल्याच्या पायर्यांवरून घसरून रविवारी (दि. 21) सायंकाळच्या सुमारास एक तरुण खाली पडला. त्याचा डावा हात फॅक्चर झाला असून खांदा निखळला आहे व कमरेला मुका मार लागला आहे. स्थानिक तरुण व खोपोली येथील यशवंती हायकर्स टीमने या …
Read More »बाळगंगा नदी प्रदूषणप्रकरणी उत्तम स्टीलला बंदची नोटीस
कामगारांच्या नोकरीवर गदा; तीव्र संताप खोपोली : प्रतिनिधी जलप्रदूषण केल्याप्रकरणी खालापूर तालुक्यातील उत्तम स्टील कारखाना व्यवस्थापनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाना बंद करण्याची नोटीस दिली नोटीस दिली आहे. त्यामुळे या कारखान्यातील कामगारांच्या नोकरीवर गदा आली आहे. कारखाना व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे नोकरी धोक्यात आल्याने कामगार वर्गातून व्यवस्थापनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. …
Read More »खारघरमध्ये फुटबॉल स्पर्धा : परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर ः रामप्रहर वृत्त भाजप कार्यकर्ते व समाजसेवेत योगदान देणारे समीर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर सेक्टर 16 येथील केपीसी शाळेचे टर्फ मैदानात फुटबॉल स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 21) करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजप खारघर मंडल …
Read More »नवीन पनवेलमध्ये मंगळागौर कार्यक्रम रंगला
महिलांसाठी रक्त तपासणी शिबिराचाही स्तुत्य उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त श्रावण महिन्यानिमित्त मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी नवीन पनवेल सेक्टर 13 येथील कालिमाता मंदिरात केले होते. त्याचबरोबर डायबेटीस हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून वीर वूमन फाउंडेशनच्या …
Read More »हरिहरेश्वर येथे आढळलेल्या बोटीचा दहशतवादाशी संबंध नाही; रायगड पोलिसांनी केले स्पष्ट
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्वर समुद्रकिनारी आढळून आलेल्या बोटीचा दहशतवादाशी कोणताही संबंध नाही, असे रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सागर किनार्यावरील रेतीमध्ये ही बोट अडकलेली असल्यामुळे प्रयत्न करूनही बोट किनार्यावर घेणे अथवा समुद्रामध्ये नेणे शक्य झालेले नाही. बोटीवरील सर्व साहित्याची डॉग स्कॉड आणि बीडीडीएसमार्फत …
Read More »मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव
पनवेल ः शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाचा शुभारंभ भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाला, तर या उत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि माजी महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी भाजप …
Read More »50 थर लावून सर्वांत मोठी राजकीय हंडी फोडली -मुख्यमंत्री
ठाणे ः प्रतिनिधी गोपाळकाला उत्सवात गोविंदा थर लावून हंडी फोडतात. आम्ही 50 थर लावून सर्वांत मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. हे सर्व बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले आहे तसेच यापुढे हे थर वाढत जाणार …
Read More »मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई ः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भ्रष्टाचारी हंडी फोडण्याचा क्रम सुरू झाला आहे. आम्हीसुद्धा मुंबई महापालिकेतील दहीहंडी फोडणार, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 19) येथे केला. वरळीतील जांबोरी मैदानात भाजपच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, …
Read More »गोऽऽविंदा रे गोऽऽपाळा!
दहीहंडीचा उत्सव सर्वत्र दणक्यात साजरा अलिबाग, पनवेल ः प्रतिनिधी ढाक्कुमाकूम… ढाक्कुमाकूम…, बोल बजरंग बली की जय…, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा…. गोऽऽविंदा रे गोऽऽपाळाच्या तालावर फेर धरून नाचणारे गोविंदा आणि बाळगोपाळांपासून वयोवृद्धांपर्यंत संचारलेला उत्साह अशा आनंदी वातावरणात व हर्षोल्हासात शुक्रवारी (दि. 19) दहीहंडीचा उत्सव रायगड जिल्ह्यात साजरा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper