ज्या विधानभवनामध्ये जनहिताचे कायदे केले जातात, त्या पवित्र सार्वभौम सभागृहाच्या पायर्यांवर लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांनी एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली ही बाब महाराष्ट्राला निश्चितच शोभादायक नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या प्रतिनिधींना विधिमंडळात लोकांनी निवडून पाठवलेले असते. त्यांच्याकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा असते. परंतु बुधवारी सकाळी विधान भवनाच्या पायर्यांवर वेगळेच चित्र पाहायला …
Read More »पोलादपूरच्या सावित्री नदीत रिव्हर राफ्टिंगची ट्रायल; नरवीर रेस्क्यू टीमचा उपक्रम
पोलादपूर : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कोलाड येथील रिव्हर राफ्टिंग बंद झाल्यानंतर नरवीर रेस्क्यू टिम तर्फे मंगळवारी (दि. 23) पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरणापासून लोहारे-तुर्भे पुलापर्यंत रिव्हर राफ्टिंगची चाचणी घेण्यात आली. या वेळी कोलाडचे महेश सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर रेस्क्यू आणि अॅडव्हेंचरचे अध्यक्ष रामदास कळंबे, जयेश जगताप, विक्रम भिलारे, दीपक उतेकर, सुमित …
Read More »माणगावमध्ये श्री सांप्रदायाने राबविले स्वच्छता अभियान
माणगाव : रामप्रहर वृत्त जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व परमपुज्य कानिफनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने माणगाव तालुका सेवाकेंद्राच्या वतीने सामाजिक उपक्रम सेवेअंतर्गत जुने माणगाव येथील श्री स्वयंभू संगमेश्वर देवस्थान परिसरमध्ये नुकताच स्वच्छता अभियान राबविण्यात आले. श्री स्वामींच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून सकाळी स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली. या अभियानाकरिता …
Read More »शाळेत मीटर नाही, वीज बिल मात्र भरमसाठ
महावितरणच्या पाली विभागाचा भोंगळ कारभार नागोठणे : प्रतिनिधी महावितरणच्या पाली विभागाअंतर्गत येणार्या बाहेरशिव (ता. रोहा) येथील प्राथमिक शाळेत वीज मीटर नाही, मात्र विजेचे बील येत असल्याने महावितरणच्या पाली विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. रायगड जिल्हा परिषद शाळा रोहा तालुक्यातील बाहेरशिव येथील रायगड जिल्हा परिषद शाळा कोरोना कालावधीत एप्रिल 2021पासून …
Read More »नाते ग्रामपंचायत सदस्यांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील महत्वाच्या नाते ग्रामपंचायतीचे दोन सदस्य आणि अनेक महिला व तरुणींनी अॅड. सुरज जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशाने नाते जिल्हा परिषद विभागात भाजपची ताकद वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …
Read More »दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केंद्र सरकारने केले -केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल
पेण : प्रतिनिधी विविध विकास योजना राबवून समाजातील वंचित, दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपच्या लोकसभा प्रवासातून ग्रामस्थ संवाद साधून त्या त्या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अन्नप्रक्रिया, उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल …
Read More »मुरूडमधील शिबिरात 56 जणांचे रक्तदान
मुरूड : प्रतिनिधी समाजसेवक डॉ. सनाउल्लाह घरटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुरूडमधील संजीवनी आरोग्य सेवा संस्था आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढी-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 24) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 56 जणांचे रक्तदान केले. मुरूड नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे व रक्तपेढी प्रमुख डॉ. दीपक गोसावी …
Read More »खालापुरातील अन्य प्रदूषणकारी कारखान्यांचे काय?
प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका गुलदस्त्यात खोपोली : प्रतिनिधी जलप्रदूषण केल्यामुळे खालापूर तालुक्यातील ‘उत्तम स्टील‘च्या व्यवस्थापनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाना बंद करण्याची नोटीस दिली आहे. ही नोटीस स्वागतार्ह असली तरी या कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दोन वर्षाचा कालावधी का लागला, याचे उत्तर मिळणे अपेक्षित असून, भू, जल, वायू प्रदुषण करणार्या तालुक्यातील …
Read More »पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईनचा तुटवडा
महाड : प्रतिनिधी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसांपासून काही औषधे आणि सलाईनचा तुटवडा भासत आहे. यामुळे परिसरातील रुग्णांना पैसे खर्च करून खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधपुरवठा विभागाकडून अल्प प्रमाणात सलाईनपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. …
Read More »संततधार पावसामुळे बाजारात शुकशुकाट
कर्जत : बातमीदार गणेशोत्सव तोंडावर आला असताना कर्जत तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी होणार्या खरेदीवर विरजण पडले आहे. पावसाच्या सततच्या रिपरिपीमुळे बाजारात शुकशुकाट दिसत असून, व्यापारीदेखील संकटात आले आहेत. गणेशोत्सवाची तयारी किमान 15दिवस आधी सुरु होते. यंदा शासनाने सण, उत्सव साजरे करण्यावरील निर्बंध हटवले आहेत. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper