Breaking News

Ramprahar News Team

आमदार महेश बालदी यांचा वाढदिवस सेवाभावी पद्घतीने साजरा

वावेघरमध्ये ज्येष्ठांना स्मार्ट कार्ड आणि ग्रामपंचायत हद्दीत हायमास्टचे लोकार्पण मोहोपाडा : प्रतिनिधी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून वावेघर भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी वावेघरमधील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रात कोठेही एसटीचा प्रवास निम्म्या खर्चात व्हावा ह्याकरिता स्मार्ट कार्ड नोंदणी व वाटप ह्या सेवेचा लाभ व्हावा याकरीता शिबिराचे आयोजन …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

पोयंजे विभागात ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन भारतीय जनता पक्ष पोयंजे विभागाच्या वतीने भाताण, भाताणपाडा, कसळखंड, आष्टे, अरिवली व शिवाजीनगर गावातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी स्मार्ट कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास अर्ध्या दराने करण्याकरिता मंडळाचे …

Read More »

रानसई धरणातील पाणीपातळी वाढली

उरण : प्रतिनिधी तालुक्याच्या पूर्व दिशेला डोंगर कुशीत वसलेल्या उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या रानसई धरण क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काही प्रमाणात उरणवासीयांचे पुरते पाणीसंकट दूर झाले आहे. उरण तालुक्यातील उरण शहर आणि औद्योगिक क्षेत्रांना रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मे …

Read More »

जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कंत्राटी कामगारांसाठी पगारवाढीचा ऐतिहासिक करार

पनवेल : रामप्रहर वृत्त जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असेल्या डाऊ केमिकल्स इंटरनॅशनल प्रा. लिमिटेड कंपनीमधील कंत्राटी भरघोस वेतनवाढीचा करार शनिवारी (दि. 17) येथे झाला. जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर, संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा करार विशेष म्हणजे कंत्राटी …

Read More »

लोणावळ्यात जमावबंदी लागू

लोणावळा ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील पर्यटनस्थळी 144 कलम लागू करण्यात आले असून पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्याचबरोबर धबधब्यापासून एक किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यातील पर्यटनस्थळी नागरिक गर्दी करीत असल्याचे निदर्शनास आले होते. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनदेखील …

Read More »

कसळखंड रस्त्यालगत अनधिकृत बांधकाम; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटिसीला केराची टोपली

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कसळखंड गावाच्या प्रवेशद्वाराजवळ अनधिकृतपणे सुरू असलेले बांधकाम थांबविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने शिवसेनेचे पोयंजे विभागीय अध्यक्ष नितीन पाटील आणि आरती पाटील यांना नोटीस बजावली आहे. असे असतानाही राजरोसपणे बांधकाम सुरूच असून पाटील दाम्पत्याने शासनाच्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे. कोन-सावळे मार्गावर कसळखंड गावाच्या बसथांब्याजवळ असलेल्या …

Read More »

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली काळजी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढती कोरोना रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी शुक्रवारी (दि. 16) संवाद साधला. या वेळी त्यांनी महाराष्ट्रासह केरळच्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली तसेच राज्यांना कोरोनाशी लढण्याचा कानमंत्रही दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या …

Read More »

अनिल देशमुखांना ईडीचा दणका; मुंबई, उरणमधील चार कोटी 20 लाखांची संपत्ती जप्त

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशमुख यांची चार कोटी 20 लाख रुपये किमतीची संपत्ती जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये अनिल देशमुख यांच्यासोबतच पत्नी आरती …

Read More »

दहावीचा निकाल 99.95 टक्के; यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल

मुंबई ः प्रतिनिधी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी (दि. 16) जाहीर करण्यात आला. कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे. राज्याचा एकूण निकाल 99.95 टक्के लागला असून राज्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली, तर एकूण निकालात …

Read More »

वाढदिवसाच्या प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा नकोत; आमदार महेश बालदी यांचे आवाहन

उरण : उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांचा शनिवारी (दि. 17) वाढदिवस आहे. सध्या सुरू असलेला वैश्विक महामारी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येऊ नये, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी केले आहे. आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की, दरवर्षी जनसंपर्क कार्यालय …

Read More »