कर्जत ः प्रतिनिधी एक वर्ष कोरोनाशी सामना करता करता जनतेच्या नाकीनऊ आले. गेल्या महिन्यात कर्जत तालुका कोरोनामुक्तही झाला होता. त्यामुळे कोरोना जाईल असे वाटत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे सर्वच कार्यक्रमांवर पुन्हा निर्बंध आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचा फायदा घेऊन साखरपुडा, लग्न तसेच अन्य सोहळे, समारंभांची रेलचेल सुरू झाली. …
Read More »नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; पेण भाजपची मागणी
पेण ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेखी पत्राद्वारे दरमहा 100 कोटी रुपये वसूल करून देण्याबाबतचे आरोप केले आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांवर एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याने असे आरोप करणे पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात, जनमानसात राज्य सरकारची बदनामी सुरू आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख …
Read More »राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपचा हल्लाबोल
कर्जतमध्ये निषेध आंदोलन कर्जत ः बातमीदार, प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यात माजी आयुक्तांनी अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटींची मागणी केल्याचा आरोप केला आहे. एवढा मोठा पुरावा …
Read More »रिलायन्स प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीची हमी द्यावी; सुरेश कोकाटे यांची मागणी
नागोठणे ः प्रतिनिधी खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 31 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात रिलायन्स प्रकल्पग्रस्तांसंदर्भात घेण्यात आलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. रिलायन्स प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीची हमी दिल्याबाबतचे पत्र प्रकल्पग्रस्तांना द्यावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष सुरेश कोकाटे यांच्यासह इतर प्रकल्पग्रस्तांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. येथील रिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करण्याच्या …
Read More »पर्यावरणपूरक होळी साजरी करा; पर्यावरणप्रेमी प्रा. उदय मानकावळे यांचे आवाहन
पेण : प्रतिनिधी निसर्गाचे संतुलन राखून वृक्षसंपदेचे जतन करण्यासाठी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी, असे आवाहन होळीच्या पार्श्वभूमीवर पेण एज्युकेशन सोसायटीतील प्रा. उदय मानकवळे यांनी नागरिकांना केले आहे. ते म्हणाले की, होळी हा अवगुणांची होळी करणारा सण आहे. हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे. पुराणात भक्त प्रल्हादापासून अनेक कथांचा …
Read More »नेमेचि येते पाणीटंचाई!
कर्जत तालुक्यात पंचायत समितीवर अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. तरीही कर्जतमधील पाणीटंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. गतवर्षी कर्जत तालुक्यातील 57 आदिवासीवाड्या आणि 14 गावे पाणीटंचाईग्रस्त होती. या वर्षी तालुक्यातील 59 आदिवासीवाड्या आणि 17 गावे पाणीटंचाईग्रस्त असून यंदा पाणीटंचाई जास्त असल्याचे दिसून येत आहे. कर्जत तालुका आदिवासीबहुल …
Read More »परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब
पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यूनंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व शिवसेना नेते संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. आता अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास सुरू असताना गृहखात्यात बदली झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे अनिल देशमुख यांचे गृहमंत्रिपद धोक्यात आले आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून हटविण्यात …
Read More »खोपोली बसची वेळ बदला -भाजपची मागणी; एसी बससाठीही आग्रह
खोपोली ः प्रतिनिधी खोपोली शहर तसेच खालापूर तालुक्यातील बहुतांश विद्यार्थी तसेच कामानिमित्त नोकरदार, अधिकारीवर्गाच्या सोयीसाठी खोपोली भाजपने पुढाकार घेतला आहे. नवी मुंबई येथील सकाळची पहिली बस 6 वा. तसेच दुपारदरम्यान एसी बस सुरू करण्याचे निवेदन पत्र भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी व शहर सरचिटणीस इश्वर शिंपी यांनी आमदार गणेश नाईक, …
Read More »कर्जतमध्ये चवदार तळे सत्याग्रह दिन साजरा
कर्जत ः बातमीदार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावर्जनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना घेता यावे म्हणून सत्याग्रह केला होता. त्या अनुषंगाने 20 मार्च हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. त्या अंतर्गत कर्जत तालुक्यात असंख्य भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर कौन्सिलिंग उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या वतीने करिअर कौन्सिलिंग उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. 20) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper