Breaking News

Ramprahar News Team

एनएमएमटीच्या तोट्यात आणखी भर; चिंता वाढली

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त अगोदरच तोट्यात सुरू असलेली नवी मंबई परिवहन उपक्रमाची बससेवा आणखी अडचणीत आली आहे. टाळेबंदीपूर्वी महिन्याला सहा कोटींपर्यंत सहन करीत असलेल्या तोट्यात आणखी दोन कोटींची भर पडली आहे. त्यामुळे उपक्रमाची चिंता वाढली आहे.एनएमएमटीची बससेवा सध्या पूर्ण क्षमतेने सुरू आहे. दिवसाला 384 बस विविध मार्गावर प्रवासी वाहतूक …

Read More »

दुर्गम भागात मिठाईचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी विभागानजीकच्या सारसई या दुर्गम भागातील आदिवासी, धनगर तसेच इतर बांधवांना दीपावलीनिमित्त काहीतरी मदत व्हावी यासाठी जनसेवा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष शिंगाडे यांनी मिठाईचे वाटप केले. या वेळी दुर्गम भागातील लहानग्यांना मिठाईचे विविध पदार्थ चाखायला मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसले. दरम्यान, …

Read More »

उरणच्या आदिवासी बांधवांना सहकार्य

उरण : वार्ताहर आदिवासी कातकरी समाज हा नेहमीच शासकीय योजनांपासून वंचित राहिला आहे. म्हणूनच शासनाने वेळोवेळी काढलेल्या शासन निर्णयानुसार आदिवासी समाजातील कातकरी आणि माडी या गोंड ह्या अनुसूचित प्रवर्गातील जाती प्रामुख्याने विकसित होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेले वर्षभर उरण तालुक्यातील आदिवासी बांधवांसाठी बहुतांश वाड्यांवर …

Read More »

आर्थिक नफ्याचे प्रलोभन दाखवून गंडा नवी मुंबई, मुंबईतील अनेकांची फसवणूक; नऊ आरोपींना बेड्या

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त आर्थिक गुंतवणुकीच्या माध्यमातून नागरिकांना मोठ्या प्रमाणात नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाऊनच्या बहाण्याने कंपनी बंद करून त्यांनी कोट्यवधींचा अपहार केला आहे, मात्र त्याच व्यक्ती नवी कंपनी स्थापन करून पुन्हा नागरिकांची लूट करीत असल्याचे समजताच सुरू असलेल्या सेमिनारवर छापा टाकून …

Read More »

शिवाजीनगर (ता. पनवेल) : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्या वेळी बहिणींसोबत टिपलेली त्यांची प्रसन्न छबी.

Read More »

मुरूड बाजारपेठेत आग

मुरुड : प्रतिनिधी    येथील महाराष्ट्र बँकेच्याशेजारी असलेल्या एका इमारतीला सोमवारी (दि. 16) रात्री आग लागली. या आगीत भाजी व फळांचे दुकान भस्मसात झाले. या इमारतीत कोणीही वास्तव करीत नसल्याने जीवितहानी झाली नाही. फटाक्याच्या ठिणगीमुळे ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. मुरूड बाजारपेठेतील बँक ऑफ महाराष्ट्र आणि साई मेडीकल यांच्यामध्ये असलेल्या इमारतीत …

Read More »

हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या बलिदानस्थळी दीपोत्सव साजरा

कर्जत : बातमीदार चलेजाव चळवळीत सिद्धगड येथील जंगलात कर्जत तालुक्यातील दोन क्रांतिकारकांना वीरमरण प्राप्त झाले होते. त्या बलिदान भूमीत क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानने सोमवारी (दि. 16) मध्यरात्री दीपोत्सव साजरा करून हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेली ही भूमी शेकडो दिव्यांच्या उजेडात उजळून गेली होती. कर्जत तालुक्यातील क्रांतिकारक भाई …

Read More »

ढिसाळ आरोग्य यंत्रणेने घेतला महिलेचा बळी; संतप्त कुटुंबीयांची पाली प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक; कारवाईची मागणी

पाली : प्रतिनिधी रुग्णवाहिका व त्यातील डॉक्टर वेळीच उपलब्ध न झाल्याने सर्पदंश झालेल्या महिलेचा मंगळवारी पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या मयत महिलेच्या कुटुंबियांनी मंगळवारी (दि. 17) या आरोग्य केंद्रावर धडक दिली आणि याप्रकरणी दोषी असणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी केली. सुधागड तालुक्यातील उद्धर येथील …

Read More »

रायगडात 43 नवे कोरोना रुग्ण; दोन जणांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 43 नव्या कोरोना रुग्णांची आणि दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 15) झाली, तर दिवसभरात 61 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 28 व ग्रामीण 5) तालुक्यातील 33, अलिबाग पाच, पेण दोन आणि खालापूर, कर्जत व रोहा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश …

Read More »

पर्यटक निघाले फिरायला…!; खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या लागल्या रांगा

खालापूर ः प्रतिनिधी दिवाळीचा सण आणि सलग सुट्यांमुळे पर्यटक फिरायला निघाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह सर्व प्रमुख रस्ते रविवारी (दि. 15) जाम झाले होते. एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्यावर तर सकाळी 10 ते दुपारी 12च्या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार काही काळ टोल …

Read More »