Breaking News

Ramprahar News Team

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर येथील पदवीधर, तर अमरावती व पुणे येथील शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी ही निवडणूक होत आहे. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, नागपूर पदवीधरचे आमदार अनिल सोले, …

Read More »

जंजिरा किल्ला बंद असल्याने स्थानिकांच्या रोजगारावर गदा

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील राजपुरी येथील सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ला कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे या किल्ल्यावर उपजीविका अवलंबून असलेले सुमारे 250 स्थानिक व त्यांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी पाच लाखांपेक्षा जास्त लोक येत असतात. समुद्रात असणारा 22 एकरवरील हा दुर्ग पर्यटकांना आकर्षित करतो. …

Read More »

अनधिकृत वाळू व्यवसायावर महाड पोलिसांची कारवाई; वाळूसह पोकलेन व अन्य तीन वाहने जप्त; पाच जणांना अटक

महाड : प्रतिनिधी महाड पोलिसांनी खाडीपट्टा विभागात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उत्खनन आणि विक्रीवर कारवाई करीत वाळूसह पोकलेन आणि अन्य तीन वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत सुमारे 47 लाख 97 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले …

Read More »

…तर मराठ्यांचे दुसरे सामाजिक पानिपत होईल : शिवेंद्रराजे

सातारा : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यामुळे मराठा तरुणांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढला पाहिजे नाही तर इतिहासात मराठ्यांचे पानिपत झाले असे बोलले जाते. आता आपण एकत्र आलो नाही तर आपले दुसरे सामाजिक पानिपत होईल, असे शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे. सातार्‍यात …

Read More »

पक्षवाढीसाठी मेहनत घ्या : अश्विनी पाटील; भाजप महिला मोर्चा पनवेल ग्रामीण मंडलच्या पदाधिकार्यांना नियुक्तिपत्रे प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप महिला मोर्चाच्या पनवेल ग्रामीण मंडलची कार्यकारिणी बैठक सोमवारी (दि. 2) उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत महिला पदाधिकार्‍यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी बोलताना पाटील यांनी पक्षवाढीसाठी मेहनत घ्या, असे आवाहन केले. पनवेल मार्केट यार्ड येथील …

Read More »

बांगलादेशी घुसखोरांना मदत? मालेगावातील ’ते’ दोन आमदार संशयाच्या भोवर्‍यात; विघातक षडयंत्राची कसून चौकशी करा -भातखळकर

मुंबई : प्रतिनिधी बांगलादेशी घुसखोरांना बेकायदेशीररित्या भारताचे नागरिकत्व मिळवून देणार्‍या एका टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला असून, त्यांच्याकडे महाराष्ट्रातील एमआयएम व काँग्रेसच्या आमदारासह एकूण सात आमदारांची स्वाक्षरी असलेली लेटरहेड मिळाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा प्रकार धक्कादायक असून, देशविघातक कृत्यासाठी या आमदारांना 24 तासांच्या आत अटक करावी, अशी मागणी भाजप …

Read More »

रायगडात 123 नवे कोरोना रुग्ण; दोन जणांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात नव्या 123 कोरोना रुग्णांची आणि दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद रविवारी (दि. 1) झाली, तर दिवसभरात 124 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 83 व ग्रामीण 17) तालुक्यातील 100, पेण सात, अलिबाग सहा, कर्जत, खालापूर, रोहा व महाड प्रत्येकी दोन आणि माणगाव …

Read More »

आत्मनिर्भर भारताच्या वाटेत अडथळा बनणार्‍यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा

चंपारण्य : वृत्तसंस्था स्वातंत्र्य लढ्यावेळी जो निर्धार केला गेला होता, चंपारण्यला पुन्हा एकदा तसाच निर्धार करायचा आहे. जे आत्मनिर्भर बिहार व आत्मनिर्भर भारताच्या वाटेत जे अडथळा बनत आहेत, त्यांना लोकशाही मार्गाने धडा शिकवायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी …

Read More »

तोतरेपणाचा फायदा घेत तरुणीवर बलात्कार; महाड तालुक्यातील घटना

महाड : प्रतिनिधी घरकामाला ठेवलेल्या तरुणीच्या तोतरेपणाचा फायदा उठवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना महाड तालुक्यातील कुंभार्डे मोहल्यात घडली आहे. पीडित तरुणी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पीडितेने महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, आरोपी अद्यापही मोकाट आहे. याबाबत महाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुक्तार इस्माईल …

Read More »

अर्थव्यवस्था रूळावर येतेय..!; ऑक्टोबरमध्ये जीएसटीच्या माध्यमातून एक लाख कोटींपेक्षा अधिक महसूल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारला जीएसटीच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. गेल्या आठ महिन्यांत प्रथमच केंद्राला जीएसटीच्या माध्यमातून एवढा महसूल प्राप्त झाला. यामध्ये सीजीएसटीमधून 19 हजार 193 कोटी, एसजीसीटीमधून 52 हजार 540 कोटी आणि आयजीएसटीमधून मिळालेल्या 23 हजार 375 कोटी रुपयांचा समावेश आहे, तर …

Read More »