Breaking News

Ramprahar News Team

भाजप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी अ‍ॅड. मनोज भुजबळ

पनवेल ः प्रतिनिधी  पनवेल महापालिकेचे माजी बांधकाम सभापती अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर आणि प्रभारी सरचिटणीस आमदार देवयांनी फरांदे यांनी सोमवारी (दि. 24) जाहीर केले. पनवेल महापालिका झाल्यावर प्रभाग क्र. 17मधून अ‍ॅड. मनोज …

Read More »

भिवंडी, औरंगाबाद येथे छापे; हातमोजे फेरवापर प्रकरण; अटक आरोपींची संख्या चारवर

पनवेल ः बातमीदार कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी वापरण्यात येणार्‍या निळ्या रंगाच्या रबरी हातमोज्यांच्या फेरवापरास परवानगी नसताना ते धुवून पुन्हा बाजारात विकणार्‍या टोळीचे धागेदोरे बंगळूरू, हरियाणापर्यंत गेले आहेत. या प्रकरणाचे पितळ उघडे पडल्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखेने भिवंडी आणि औरंगाबाद येथेही छापे टाकून मोठ्या प्रमाणात माल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांना …

Read More »

दीड दिवसाच्या गणपतींना भावपूर्ण निरोप

अलिबाग ः प्रतिनिधी आपल्या लाडक्या बाप्पाची भक्तांनी मनोभावे सेवा केल्यानंतर जिल्हाभरातील दीड दिवसाच्या गणपतींना रविवारी (दि. 23) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शनिवारी सकाळी घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशाची शोडषोपचारे पूजाअर्चा करण्यात आली. दुपारी टाळमृदुंगाच्या नादात आरती पार पडली. जगावरील कोरोनाचे संकट दूर कर, असे साकडे सर्वांनीच आपल्या लाडक्या …

Read More »

अमेरिकी निवडणुकीत नरेंद्र मोदींची झलक; ट्रम्प यांच्या व्हिडीओत पंतप्रधानांचा समावेश

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अमेरिकेतील 20 लाखांहून अधिक प्रभावी भारतीय-अमेरिकन मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार अभियानाच्या व्यवस्थापकांनी व्हिडीओच्या रूपात आपली पहिली जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे आणि ट्रम्प यांच्या अहमदाबाद येथील ऐतिहासिक संबोधनाचे संक्षिप्त भाग अंतर्भूत करण्यात आले आहेत. …

Read More »

टीव्ही-चित्रपटांच्या शूटिंगसाठी केंद्राची नवी नियमावली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था टीव्ही व चित्रपटांच्या शूटिंगसाठी केंद्र सरकारने विस्तृत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करीत याबाबतची माहिती दिली. या मार्गदर्शक सूचनांमुळे शूटिंगमधील कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्यास मदत मिळेल, असे जावडेकर यांनी म्हटले आहे. या सूचनांत सर्व ठिकाणी फेस …

Read More »

ऐन सणासुदीत माथेरानमध्ये पाणीटंचाई; पावसाळ्यातही नागरिक तहानलेले

कर्जत ः बातमीदार रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये गणेश चतुर्थीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने माथेरानकरांना पाणीपुरवठा केला नसल्याने ऐन सणासुदीत माथेरानकर तहानलेले राहिल्याने माथेरानमधील अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कोविडच्या भयंकर संकटात गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय माथेरानकरांनी घेतला, पण सण साजरा करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या घरात सजावट करून बाप्पाच्या आगमनाची …

Read More »

कृषी खाते झोपले आहे का? राज्यमंत्री बच्चू कडूंचा सरकारला घरचा अहेर

अमरावती ः प्रतिनिधी शेतकर्‍यांसंदर्भात कृषी विभाग गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघाले, आता पिकांवर रोग येत आहेत. या भयंकर परिस्थितीत राज्यातील कृषी खाते झोपले आहे की काय, असा सवाल करीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर दिला आहे.विदर्भात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अमरावती जिल्ह्यातील  सोयाबीन …

Read More »

बिहार निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस सज्ज; देशातील पहिली डिजिटल निवडणूक

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी पक्षातर्फे फडणवीस यांना तसे कळविण्यात आले आहे. बिहारमध्ये चालू वर्षाअखेर निवडणूक होत आहे. फडणवीस यांनी या निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामात सहभाग …

Read More »

ठाकरे सरकारसमोर नवे विघ्न; 11 आमदार बसणार उपोषणाला; निधी वाटपाबाबत नाराजी

मुंबई ः प्रतिनिधी ठाकरे सरकारमधील मानापमान नाट्य काही थांबताना दिसत नाही. निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नाही, हा काँग्रेसने घेतलेला आक्षेप ताजा असतानाच आता निधी वाटपातही भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या काही आमदारांनी केला. परिणामी या आमदारांनी सरकारविरोधात उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला आहे. काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल ठाकरे …

Read More »

रायगडात 298 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 10 रुग्णांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 23) 298 नव्या कोरोना रुग्णांंची नोंद झाली, तर 10 रुग्णांंचा मृत्यू झाला. त्याचबरोबर 381 जण दिवसभरात बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 173, अलिबाग 35, महाड 27, रोहा 14, उरण 11, पेण 10, माणगाव नऊ, कर्जत चार, पोलादपूर दोन, तर सुधागड, श्रीवर्धन …

Read More »