Breaking News

Ramprahar News Team

भाजपचे शंखनाद अभियान; सोशल मीडिया पदाधिकार्‍यांची पनवेलमध्ये कार्यशाळा, नियुक्तीपत्रांचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने शंखनाद 2024 अभियान सुरू केले आहे. भाजप यंदाही सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीला टक्कर देणार आहे. शंखनाद अभियानांतर्गत पनवेलमध्ये सोशल मीडिया पदाधिकार्‍यांची कार्यशाळा रविवारी (दि.4) सोशल मीडिया सेलचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक प्रकाश गाडे आणि भाजप मावळ लोकसभा …

Read More »

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीचे उद्घाटन भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांच्या हस्ते रविवारी (दि.4) झाले. या अकॅडमीसाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी दिली. क्रिकेटमध्येही गावातील तरुणांनी पुढे जावे या उद्देशाने उलवे रोड …

Read More »

अखेरचे अधिवेशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अधिवेशनाच्या प्रारंभी ज्या भावना व्यक्त केल्या, त्यामध्ये भारताच्या नारीशक्तीबाबतचा अभिमान स्पष्टपणे दिसून आला. शेवटच्या अधिवेशनात तरी विरोधी खासदारांनी गैरवर्तन थांबवून संसदेच्या कामकाजात विधायक सहभाग घ्यावा अशा शब्दांत त्यांनी खासदारांचे कानही टोचले. पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात विरोधकांना संसदेमध्ये सूरच सापडला …

Read More »

बहुजनांचा भरवसा

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत. मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आणि अन्य सर्व समाजांचाही विचार केला जाईल याची खात्री बाळगावी, असा शब्द मुख्यमंत्र्यांनीही दिला आहे. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. सरकारच्या …

Read More »

गव्हाण विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात

विद्यार्थ्यांनी अत्युच्च स्थानाचे ध्येय ठेवावे -लोकनेते रामशेठ ठाकूर पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील गव्हाण कोपर येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी संचलित अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (दि.29) उत्साहात झाला. या वेळी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे …

Read More »

अक्षय जाधव आणि मिताली पुरालकर यांनी जिंकला नमो चषक गीत गायन स्पर्धेचा किताब

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा क्षेत्रासाठी आयोजित करण्यात आलेल्या नमो चषक गीत गायन स्पर्धेचा किताब अक्षय जाधव आणि मिताली पुरालकर यांनी पटकाविला. देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Read More »

मराठा समाज नेते मनोज जरांगे-पाटील शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक

महाड ः प्रतिनिधी किल्ले रायगडावर ऊर्जा मिळते, ती इतरत्र कुठे मिळत नाही. येथील ऊर्जा घेऊन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन पुढे लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे मराठा समाज नेते मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी (दि.30) स्पष्ट केले. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मोर्चेकर्‍यांसह मुंबईच्या दिशेने निघालेले …

Read More »

भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्‍यांच्या मागण्यांसंदर्भात शासनाची सकारात्मक भूमिका

न्हावाशेवा टप्पा 3मधील पाईपलाईन बदलण्याच्या कामाला गती देणार -मंत्री गुलाबराव पाटील मुंबई ः रामप्रहर वृत्त भोकरपाडास्थित असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्‍यांच्या मागण्यांसंदर्भात बोर्ड मिटिंगमध्ये विषय घेणार असून कामगारांना न्याय देण्याचे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत न्हावाशेवा टप्पा 3 …

Read More »

हवा संवादाचा पूल

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने सुरू केलेले सर्वेक्षण आणि विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत दिलेले आश्वासन लक्षात घेऊन मनोज जरांगे-पाटील यांनी दोन पावले माघार घ्यायला हवी होती. अशा प्रकारची माघार पराभव मानण्याचे कारण नसते, परंतु या सार्‍याचा कुठलाही विचार न करता जरांगे यांनी मराठा समाजाचा विशाल मोर्चा मुंबईच्या दारापर्यंत आणला आहे. मराठा …

Read More »

पनवेल तालुक्यात विकासाची गंगा

शिवकरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे मतदारसंघात अनेक विकासाची कामे सातत्याने सुरू आहेत. या अंतर्गत शिवकर ग्रामपंचायतीमध्ये आमदार निधी, महारष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग 25/15 आणि ग्रामपंचायत 15व्या वित्त आयोग अंतर्गत रविवारी (दि. 21) …

Read More »