आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे नोडमध्ये उभारण्यात आलेल्या भूमिपूत्र भवनाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …
Read More »नैना परिक्षेत्रात युडीसीपीआर लागू करण्याबाबत शासन सकारात्मक -मंत्री उदय सामंत
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त सिडको नैना परिक्षेत्रातील गावांना एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन विनियमावली (युडीसीपीआर) लागू करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (दि.12) दिले. कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. त्या …
Read More »‘सीएए’ आणि गैरसमज
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीएए अर्थात नागरिकत्व दुरूस्ती कायदा देशात लागू करण्याबाबत घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा कायदा लागू करण्याची अधिसूचना जारी करून कायदा लागू करण्यात येईल, असे शाहांनी स्पष्ट केले. दरम्यान, हा कायदा म्हणजे अल्पसंख्याकांना विशेषतः मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न असल्याचा विरोधकांचा आरोप आहे, मात्र …
Read More »पनवेल खानावलेतील ठाकरे गटाचे कार्यक्रर्ते भाजपत
आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत उरण ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल तालुक्यातील खानावले ग्रामपंचायतीचे ठाकरे गटाचे विद्यमान सरपंच जयश्री सुभाष नाईक यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. या पक्षप्रवेश …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये स्नेहसंमेलन
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती कामोठे ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या दुसर्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि.10) झाला. निखरता भारत या शीर्षकाखाली हा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग …
Read More »ब्रेक फेल झाल्याने ट्रक 20 फुट दरीत कोसळला
एक ठार, एक जखमी; काही काळ वाहतूक ठप्प खालापूर ः प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील खोपोली बायपासजवळ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट 20 फूट दरीत कोसळला. या अपघातात ट्रकचालकाने उडी मारल्याने तो बचावला असला, तरी गंभीर जखमी झाला आहे, तर क्लिनर ट्रकमध्येच अडकल्याने त्याचा मृत्यू झाला. ट्रकचालक श्रीमंत नवणे …
Read More »इनकमिंगचा ओघ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर राज्यातील राजकारणाचे चित्र वेगाने बदलताना दिसते आहे. भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीमधील तिन्ही पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाबरहुकुम राज्याचा कारभार चालू ठेवण्याचा संकल्प केला …
Read More »ध्येय्य गाठण्यासाठी जिद्द पक्की पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर
भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्त आपले ध्येय्य गाठायचे असेल तर आपली जिद्द ही पक्की पाहिजे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रमावेळी केले. तसेच भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी ही महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी विद्यालयाचे दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी (दि.3) उत्साहात साजरे झाले. या वेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गौरविले. ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या स्नेहसंमेलनाला कामगार नेते महेंद्र घरत, आरटीओचे अधिकारी अनिल पाटील, …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शिवाजीनगर येथील जलकुंभाचे लोकार्पण
पनवेल ः रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शिवाजीनगर गावासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अर्थसहाय्यातून जलकुंभ उभारण्यात आले आहे. या जलकुंभाचे उद्घाटन रविवारी (दि.4) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला शिवाजीनगर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper