Breaking News

Ramprahar News Team

पनवेल : महापालिका प्रभाग क्रमांक 19 ’ब’च्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या वेळी कार्यकर्ते बूथवर सज्ज होते.

Read More »

पनवेल : करंजाडे येथे ग्लोरी अ‍ॅण्ड शाईन हा फूट थेरेपी उद्योग गीता म्हात्रे यांनी नव्याने सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. सोबत राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, समीर म्हात्रे, योगिता म्हात्रे व इतर.

Read More »

भाजपच्या खालापूर तालुका मंडल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोरेश्वर घारे यांचे अभिनंदन करताना आमदार महेश बालदी. सोबत युवा नेते सचिन तांडेल, नंदू सोनवणे, मंदार गोपाळे, प्रथमेश मालुसरे.

Read More »

डॉ. श्रुणाल जाधव यांची सौंदर्य स्पर्धेसाठी निवड

पनवेल : बातमीदार पुण्याच्या आनंदी ऊर्जा संस्थेमार्फत आयोजित महिलांचे आरोग्य हे सोशल कारण ठेवून फक्त डॉक्टरांसाठी एक सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (दि. 11) पुणे येथे होणार असून यात कामोठे येथील डॉ. श्रुणाल जाधव यांची अंतिम 65मध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना अंतिम …

Read More »

महात्मा फुले महाविद्यालयात एकदिवसीय चर्चासत्र

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये शनिवारी (दि. 11)  रिसेन्ट ट्रेंड इन आयपीआर, कॉपीराइट्स व प्लाग्यारीझ्म या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रासाठी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे, मुंबई विद्यापीठातील जवाहरलाल नेहरू नॉलेज रिसोर्स सेंटरचे डायरेक्टर प्रा. भुजंगराव अहिरे …

Read More »

महिलांवरील अन्यायाची माहिती तातडीने द्या, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुदळे यांचे प्रतिपादन

पनवेल : वार्ताहर शालेय विद्यार्थिनींसह महिलावर्गाने त्यांच्यावर कोठेही अन्याय होत असेल असे त्यांना वाटल्यास तातडीने त्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्याची माहिती द्यावी. कोणत्याही परिस्थितीत महिलांनी अन्याय सहन करू नये, असे आवाहन पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कुदळे यांनी तालुक्यातील मोर्बे गावातील महिलावर्गाला व नागरिकांना मार्गदर्शन …

Read More »

एटीएम फोडण्याचा प्रयत्न

पनवेल : बातमीदार कळंबोलीतील सेंट्रल फॅसिलिटीज इमारतीत असलेल्या सिंडिकेट बँकेच्या एटीएममध्ये मंगळवारी पहाटे घुसलेल्या एका लुटारूने लोखंडी पहारीच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या चोराविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.  चोराने लोखंडी पहारीच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र …

Read More »

विविध मागण्यांसाठी आयुक्तांना साद, सभापती कुसूम म्हात्रे यांच्याकडून निवेदने सादर; स्मार्ट सिटीसाठी प्रयत्नशील

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कुसूम रवींद्र म्हात्रे यांनी कामोठे गाव स्मार्ट सिटी बनविण्याबाबत कामोठे सेक्टर 20मधील गार्डनला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत व दिव्यांगांना अर्थसहाय्य मदत मिळण्याबाबत अशा विविध मागण्यांसंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदने दिली आहेत. कुसूम म्हात्रे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे …

Read More »

देव निघाले पारधीला; ग्रामीण अनिष्ट प्रथा

महाशिवरात्रीच्या कथांमध्ये व्याधाने म्हणजेच पारध्याने हरिणीवर नेम धरण्यासाठी ज्या झाडाची पाने तोडली ते बेलाचे झाड होते आणि झाडाखाली महादेवाची पिंड असते. हरिणीवर दया करून शेवटी शिकार न करताच पारधी परततो. त्याला उपवासही घडतो आणि पाने तोडताना ’ॐ नम: शिवाय’चा जपही घडतो आणि सोबतच त्याच्या हातून हरिणीची हत्या टळते, अशी पौराणिक …

Read More »

सिनेतारकांचे देशप्रेम

कुणी कुणाचे समर्थन करावे यावर लोकशाहीत निर्बंध असण्याचे कारणच नाही. किंबहुना, घटनेने तसे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला दिलेले आहे. त्यात फिल्मी सितारे देखील आलेच. परंतु आपला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असताना वादग्रस्त विधाने करून पूर्वप्रसिद्धी बटोरण्याचे उद्योग अनेक फिल्मी कलावंत करत असतात. त्याची अनेक उदाहरणे नजीकच्या भूतकाळात आपण पाहिलेली आहेत. …

Read More »