Breaking News

Ramprahar Team

प्लास्टिक पिशव्यांबाबत प्रशासनाचा हलगर्जीपणा

नवी मुंबई ः बातमीदार राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला नवी मुंबई एपीएमसी प्रशासन व महानगरपालिकेकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. एपीएमसीत येणारा भाजीपाला नेहमीप्रमाणे प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक गोण्यांतच येताना दिसतो. प्लास्टिकबंदीच्या घोषणेनंतर काही कालावधीपर्यंतच प्लास्टिकबंदीचा इफेक्ट मार्केटमध्ये जाणवला, मात्र दोन-तीन महिन्यांनंतर प्लास्टिक पिशव्यांबाबत जैसे थे परिस्थिती आहे. महानगरपालिका व …

Read More »

चिमुकल्याचे अपहरण करणार्या दाम्पत्यास चार तासांत अटक

पनवेल ः वार्ताहर उलवे भागात राहणार्‍या हसिना अब्दुल हमिद शेख (25) या महिलेच्या अडीच वर्षांच्या मुलाचे अपहरण करणार्‍या दाम्पत्यास एनआरआय सागरी पोलिसांनी अवघ्या चार तासांच्या आत पकडून अपह्रत मुलाची सुखरूप सुटका केली. सरोज जिनत राव (27) आणि जिन्नत बचरसिंग राव (28) असे अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव असून त्यांनी आर्थिक …

Read More »

जेएनपीटीची स्मार्ट टेक्नॉलॉजी

नवीन तंत्रज्ञान निवडीच्या कार्यशाळेस प्रतिसाद नवी मुंबई ः प्रतिनिधी मेरीटाइम क्षेत्रातील आणि इतर पोर्ट्समध्ये जागतिक पातळीवर लागू असलेल्या नवीनतम तंत्रज्ञानाच्या ट्रेंडसंदर्भात प्रतिनिधींना माहिती मिळावी यासाठी जेएनपीटी-एंटवर्प पोर्ट ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी फाऊंडेशनने पोर्ट्ससाठी स्मार्ट टेक्नॉलॉजी या विषयावर आठवडाभराची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. या अभ्यासक्रमात  प्रतिनिधींनी त्यांची धोरणे आणि ग्राहकांच्या गरजा …

Read More »

पोलादपुरातील रस्ते-पूल दळणवळण सुविधा असुविधाजनक!

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, असे तंतोतंत वर्णन शोभू शकेल, असा दुर्गम, डोंगराळ, पोलादपूर तालुका. तालुक्यात रस्ते-पूल अशी दळणवळण सुविधा उपलब्ध असली, तरी त्यांची अवस्था पाहता असुविधाच अधिक असल्याचे सकृतदर्शनी जाणवते. येथे ब्रिटिशकाळात गोव्याकडे आणि महाबळेश्वरकडे जाणारे दोन रस्ते आणि त्यावरील पूल अस्तित्वात आले. हे रस्ते अरूंद असले, तरी …

Read More »

उपोषणाच्या इशार्यानंतर जिल्हा परिषदेला जाग

नांदगाव प्राथमिक शाळेच्या इमारत दुरुस्तीसाठी निधीची तरतूद मुरुड : प्रतिनिधी इमारत नादुरुस्त झाल्यामुळे मुरुड तालुक्यातील नांदगाव प्राथमिक शाळा गेल्या तीन वर्षांपासून बंद असून, या शाळेतील सुमारे 150 विद्यार्थ्यांना दुसर्‍या ठिकाणी बसवून शिकविले जात आहे. अनेकांनी मागणी, पत्रव्यवहार करुनही रायगड जिल्हा परिषद या शाळा इमारतीची दुरुस्ती करण्याकडे लक्ष देत नव्हती. मात्र …

Read More »

किरकोळ कारणावरून दोन गटांत हाणामारी

वडखळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल पेण : प्रतिनिधी कचरा टाकण्यावरुन झालेल्या वादावादीतून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना वडखळ येथील एल अ‍ॅण्ड टी कॉलनी घडली असून, या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.  फिर्यादी (रा. एल अ‍ॅण्ड टी कॉलनी, ब्लॉक पी, वडखळ) हे …

Read More »

खोपोलीतील नाट्यगृह भाडेवाढ जैसे थे

सहा महिन्यांत एकही प्रयोग झाला नाही खोपोली : प्रतिनिधी शहरात कला संस्कृती जोपासनासाठी खोपोली नगर परिषदेकडून छत्रपती शाहू महाराज सामाजिक सभागृह  व नाट्यगृह संकुलाची निर्मिती करण्यात आली.  या नाट्यगृहाचे तीन तासाठीचे भाडे दहा हजार होते. मात्र ऑगस्ट 2018 पासून  दुपटीने भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येथील नाट्यकर्मी आणि नाटक व …

Read More »

भारत अवकाश सत्ता!

एका अर्थाने भारत 27 मार्च 2019 या दिवशी ‘जागतिक अवकाश महासत्ता’ ठरला आहे. अशी ऐतिहासिक कामगिरी घडवण्यासाठी जे समर्थ नेतृत्व हवे, ते मोदी यांच्या ठायी आहे. त्यामुळेच की काय विरोधकांना ही घडामोड फारशी सुखावणारी ठरलेली नसावी. शांततेसाठीच भारत या क्षमतेचा वापर करील, असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदी यांनी जगाला दिला …

Read More »

शिवराज प्रतिष्ठानतर्फे भक्ती-शक्ती महोत्सव

नागोठणे : प्रतिनिधी विभागातील आमडोशी येथील शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच भक्ती-शक्ती महोत्सव घेण्यात आला. त्यात संत तुकाराम महाराज पुरस्कार ह.भ.प. मधुकरमहाराज जवके आणि राजमाता जिजाऊ पुरस्कार  पुष्पाताई शेलार यांना, तर शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कार प्राप्त संदीप प्रल्हाद गुरव यांना शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच सोनल रवींद्र पाटील (कोलाड) …

Read More »

तोंडसुरे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना ठप्प

8 गावे 4 वाड्या टंचाईग्रस्त; टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी म्हसळा : प्रतिनिधी दुरूस्तीचे काम करण्यासाठी पाभरे (ता. म्हसळा) धरणातील बहुतांश पाण्याचा विसर्ग केल्याने या धरणावर अवलंबून असलेल्या नळ पाणीपुरवठा योजना आता पाण्याअभावी ठप्प झाल्या आहेत. त्याचा मोठा फटका तोंडसुरे नळ पाणीपुरवठा योजनेला बसला आहे. या योजनेवर अवलंबून असलेली आठ गावे …

Read More »