Breaking News

Ramprahar Team

रविचंद्रन अश्विनचे काय चुकले?

सध्या सुरू असलेल्या भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने जोस बटलरला ज्या पद्धतीने बाद केले त्यावरून सध्या वादळ उठले आहे. त्याच्यावर टीका होत आहे, परंतु अश्विनचे काही चुकलेच नाही. त्याने जे काही केले ते क्रिकेट नियामानुसारच केले. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात रविचंद्रन अश्विन गोलंदाजी करण्यासाठी धाव …

Read More »

मोदींचा झंझावात

देशात प्रचाराला आता चांगलाच रंग चढू लागलायं. भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकहाती प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या प्रचाराच्या झंझावातापुढे विरोधी काँग्रेस आणि मित्रपक्ष निष्प्रभ ठरत आहेत. महिनाभर चालणार्‍या या प्रचाराच्या गदारोळात मतदार आपल्या देशाची सूत्रे कोणाच्या हाती सुपूर्द करतोय याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागून राहिलेले आहे. लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम चढत्या …

Read More »

बेलवली सरपंच भरत पाटील यांचा वाढदिवस

पनवेल ः भाजपचे बेलवली ग्रामपंचायत सरपंच भरत पाटील यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी ग्रामपंचायतीचे माजी समिती सदस्य निलेश पाटील, बेलवली भाजप अध्यक्ष सतीश पाटील, कार्यकर्ते संतोष पाटील आदी उपस्थित होते.

Read More »

सीकेटीतील ग्रॅज्युएशन डे उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त नवीन पनवेलमधील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर विद्यालयात प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत इंग्लिश मीडियमच्या ज्युनिअर केेजी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. या कार्यक्रमाला चांगू काना ठाकूर …

Read More »

कळंबोलीतील एनएमएमटी बस डेपो ओसाड

कंटेनर पार्किंगसाठी होतोय वापर; परिसरातील नागरिकांसाठी झाले मैदान पनवेल ः बातमीदार पनवेलमधील कळंबोली येथील रोडपालीजवळ नव्याने बांधण्यात आलेले एनएमएमटी बसस्थानक अद्याप सुरू न झाल्याने ते ओस पडले असून या ठिकाणी खासगी वाहने पार्किंग करण्यासाठी या बस डेपोचा वापर करण्यात येत आहे, तसेच परिसरातील नागरिकांनी बस डेपोचा परिसर विरंगुळा केंद्र म्हणून …

Read More »

पोदी क्रमांक 2 व 3 मधील शौचालयांचे काम पूर्ण

माजी उपमहापौर चारुशीला घरत यांचे यशस्वी प्रयत्न पनवेल ः वार्ताहर पनवेल महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल येथील पोदी क्रमांक 3, सेकटर 15  व 2 नंबर पोदी येथील सार्वजनिक शौचालय गेले कित्येक महिने दुरवस्थेत होते. यामुळे परिसरातील नागरिक व रस्त्याने ये-जा करणारे ग्रामस्थ दुर्गंधीने त्रस्त झाले होते. परिसरात लहान मुलेदेखील खेळत असल्याने …

Read More »

पनवेलमध्ये पार्थ पवार यांची स्टंटबाजी

पनवेल ः प्रतिनिधी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षांत झी मराठी वाहिनीवरील ’रात्रीस खेळ चाले’च्या धर्तीवर ’निवडणुकीत खेळ चाले हा’ सुरू झाले असून, राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे सभेसाठी धावत पळत जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  शरद पवारांचे नातू तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे मावळमधील उमेदवार पार्थ पवार बुधवारी …

Read More »

नांदेड-पनवेल एक्स्प्रेस : दुपारच्या वेळी शटल करण्यास मेन्टेनन्सचा अडसर

कर्जत : प्रतिनिधी नांदेडहून पनवेलला सकाळी 9 वाजता येणारी एक्स्प्रेस गाडी संध्याकाळी 4च्या सुमारास पुन्हा नांदेडकडे निघते. या मधल्या 7 तासांत या गाडीची पनवेल-कर्जत-पनवेल अशी शटल सेवा सुरू करावी, अशी मागणी केली असता या गाडीच्या रेग्युलर मेन्टेनन्ससाठी तीन तास लागतात, असे कारण देऊन मध्य रेल्वे प्रशासनाने नकार घंटा सुरू केल्याने …

Read More »

कर्जतच्या धाबेवाडीमधील आदिवासी महिलांचा

अशुद्ध पाण्यासाठी विहिरीवर रात्रीचा मुक्काम कर्जत : बातमीदार तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीमधील धाबेवाडीमध्ये आदिवासी ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विहिरींनी तळ गाठल्याने दगडातून झिरपणारे पाणी साठवून ते आपल्या हंड्यात पडावे, यासाठी या आदिवासी महिला रात्र विहिरीवर काढतात. तर शेजारी असलेल्या बांगरवाडीमधील महिला घुटेवाडीत असलेल्या बंधार्‍यामधील विहीरीवर  जाऊन गढूळ …

Read More »

ग्रा.पं. निवडणुकीनिमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी-शेकापमध्ये जुंपली

कर्जत : बातमीदार तालुक्यातील शिरसे आणि पाथरज या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच झाल्या. या निवडणुकांचा निकाल हा त्या त्या भागात वर्चस्व राखून असलेल्या पक्षांनी कायम राखला आहे, मात्र या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी आणि शेकाप या मित्रपक्षांमध्ये पुन्हा एकदा वाजले आहे. त्यामुळे जुळवून घेण्याची मानसिकता निर्माण झालेल्या शेकाप कार्यकर्त्यांनी …

Read More »