रेवदंडा : प्रतिनिधी अलिबागची बाल गिर्यारोहक शर्विका म्हात्रे हिने चढाईस अतिकठीण समजला जाणारा भैरवगड (ता. मुरबाड) रविवारी (दि. 29) सर केला. नाशिक येथील पॉईट ब्रेक अडवेंचर या गिर्यारोहक संस्थेने प्रसिध्द गिर्यारोहक जॉकी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ‘मोरोशीचा भैरवगड’ गिर्यारोहण मोहीम आयोजित केली होती. माळशेज घाटातील भैरवगड किल्ला सर करण्यासाठी अतिकठीण …
Read More »पेणमध्ये उन्हाळी भातपिक कापणीची लगबग
पेण : प्रतिनिधी हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या ओलिताखाली असलेली पेण तालुक्यातील रब्बी हंगामातील भातपिके तयार झाली असून, सध्या त्यांच्या कापणीची लगबग सुरू झाली आहे. मान्सूनपूर्व पाऊस दाखल होण्याआधीच परिपक्व झालेल्या भातपिकांची कापणी करण्यासाठी हेटवणे परिसरातील आधरणे, कामार्ली, वरवणे, सापोली बोरगांव, काश्मीरे गावातील शेतकर्यांची धावपळ सुरू झाली आहे. या सिंचन क्षेत्रातील शेतकरी …
Read More »बोरघाट प्रवास नको रे बाबा
वाहतुकीच्या कोंडीने वाहन चालक वैतागले खालापूर : अरूण नलावडे मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग सध्या वाहतूक कोंडीचा सामना करीत आहे. द्रुतगती मार्गाने मुंबई-पुण्यामधील अंतर कमी झाले असले तरी बोरघाटातील सावरोली टोलनाका ते अमृतांजन ब्रिजदरम्यान दोन दोन तीन तीन तास वाहनांचा खोळंबा होत असल्याने वाहन चालकांना द्रुतगती मार्गावरील प्रवास नको रे बाबा अशी म्हणण्याची …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालयात प्रत्येक शुक्रवारी दिव्यांगांना मिळणार दाखले
पनवेल : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य् विभागास मिळालेल्या सूचनांनूसार रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रूग्णालय पनवेल येथे अपंग व दिव्यांगांच्या दाखल्यांसाठी महिन्याच्या चारही शुक्रवारी सेवा सुरू करण्यात आली आहे. अपंग व दिव्यांगांच्या तपासणीसाठी जिल्हा शल्य् चिकित्सक डॉ. सुहास माने यांच्याकडून …
Read More »पनवेलमध्ये सावरकरांना अभिवादन
पनवेल : रामप्रहर वृत्त महान क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंत्ती शनिवारी (दि. 28) साजरी झाली. जयंत्तीनिमित्त पनवेल शहरातील सावरकर चौक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिवादन केले. पनवेल शहरातील सावरकर चौकाजवळ सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अॅड. …
Read More »जासई येथे आरोग्य शिबिराला प्रतिसाद
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वसामान्यांचे आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या 2 जूनला 71वा वाढदिवस आहे. त्या अनुषंगाने पनवेल तालुक्यातील जासई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून 100 हून अधिका …
Read More »पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेत पनवेलच्या लाभार्थ्यांचा प्रतिसाद
पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना रायगड जिल्ह्यात प्रभावीप्रणे राबविण्यात आली आहे. यामध्ये पनवेल महापालिका क्षेत्रात आतापर्यंत बँकेकडून एकूण एक हजार 769 लाभार्थ्यांना प्रथम कर्ज (10 हजार रुपये) वितरीत करण्यात आले आहे व एकूण 117 लाभार्थ्यांना द्वितीय कर्ज (20 हजार रुपये) वितरीत करण्यात आले …
Read More »जेएनपीए-एसईझेड गुंतवणूकदारांना भविष्यात उत्तम संधी
इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह 2022 उत्साहात उरण : प्रतिनिधी, वार्ताहर जेएनपीएने मुंबईत भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्याने जेएनपीए-एसईझेड इन्व्हेस्टर कॉन्क्लेव्ह 2022चे आयोजन शुक्रवारी (दि. 27) केले होते. गुंतवणूकदारांना भविष्यातील विकासामध्ये गुंतवणुक करण्यासाठी व देशाच्या वाढत्या बंदर-उद्योग आधारित अर्थव्यवस्थेचा एक भाग होण्यासाठी गुंतवणूकदारांना भरपूर संधी उपलब्ध देण्याच्या उद्देशाने या कॉन्क्लेव्होचे आयोजन करण्यात आले होते. …
Read More »फ्लेमिंगोंच्या मुक्कामाने मच्छीमार अडचणीत
किनार्यावर सहज सापडणार्या छोट्या मासळीची टंचाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त थव्यांच्या रूपात खाडीमध्ये श्वेत-गुलाबी रंगाची चादर पसरवणार्या फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांच्या दर्शनासाठी नवी मुंबई हे महत्त्वाचे ठिकाण बनत आहे. पुरेसे खाद्य आणि जैवविविधता मिळत असल्याने फ्लेमिंगोंचा यंदा मुक्कामही वाढला आहे, मात्र हा लांबलेला अधिवास नवी मुंबईतील मच्छीमारांच्या खिशाला कात्री …
Read More »घोडदौडीतील आठ वर्षे
बरोबर आठ वर्षांपूर्वी याच सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात स्थानापन्न झाले होते. गेल्या आठ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. परंतु पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेचा ओघ पवित्र गंगेप्रमाणे वाढत गेलेला दिसला. मोदी सरकारच्या आठव्या वाढदिवशी देशभरात फार काही उत्सव वा समारंभ झाले नाहीत. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper