Breaking News

Ramprahar Team

खांदा कॉलनी भाजप महिला मोर्चातर्फे खाऊवाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त  गुरुवारी (दि. 2) खांदा कॉलनी भाजप महिला मोर्चा यांच्यातर्फे सुकर्मा चॅरिटेबल ट्रस्टमधील मुलांना मोफत खाऊवाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष राखी पिंपळे यांच्या नेतृत्वखाली करण्यात आले. कार्यक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली, …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांचा कुटुंबवत्सल सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्त कोणत्याही क्षेत्रात ज्येष्ठांच्या अनुभवी मार्गदर्शनाशिवाय यशस्वी वाटचाल करणे शक्य नाही आणि त्यांच्या अनुभवाची शिदोरी समाजाला दिशा देणारी आहे. त्यामुळे ज्येष्ठांचा सन्मान व त्यांच्याप्रती आदर व्यक्त करीत गुरुवारी (दि. 2) सायंकाळी न्हावाखाडी येथे उत्तर रायगड जिल्हा भाजप व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा …

Read More »

मुलखावेगळा लोकनेता

राजकारणाचा स्तर सध्या कुठल्या दिशेने जात आहे हे आपण सारे रोजच पाहात-ऐकत असतो. एकमेकांच्या चारित्र्यावर चिखलफेक करण्याची चढाओढ लागलेल्या आजच्या काळामध्ये शिवराळ नेतेच प्रसिद्धीच्या झोतात दिसतात. राजकारणामध्ये आपण नेमके कशासाठी आलो आहोत याचा जणू या तथाकथित नेत्यांना विसरच पडला आहे. अशा परिस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वेगळेपण झगझगीतपणे उठून दिसते. …

Read More »

माणुसकीचे नाते लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब!

माणुसकी म्हणजे प्रेम, माणुसकी म्हणजे जाणीव, माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, माणुसकी म्हणजे निःस्वार्थपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात आणि हेच माणुसकीचे नाते म्हणजेच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब! नावाप्रमाणेच नितीज्ञ, धर्मज्ञ, ध्येयसक्त, ज्ञानी, पराक्रमी असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर. गरिबीची जाण असणारे …

Read More »

बहुतजनांशी आधारू..!

शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पण्डितः। वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वानवा॥ शंभरात एक माणूस शूर निपजतो, हजारात एक पंडित, दहा हजारांत एखादा वक्ता जन्मतो, तर दानशूर क्वचितच जन्माला येतो, असा उपरोक्त संस्कृत वचनाचा अर्थ आहे. अनेकांजवळ खूप काही असूनही त्यांच्यात दातृत्वाचा अभाव असतो, पण काही व्यक्तिमत्त्व अशी असतात की ती …

Read More »

कळंबोलीमध्ये आरोग्य व डोळे तपासणी शिबिर

नगरसेवक बबन मुकादम यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त महानगरपालिकेचे नगरसेवक बबन मुकादम यांचा वाढदिवस बुधवारी (दि. 1) सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त कळंबोलीमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईच्या माध्यमातून मोफत आरोग्य व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी …

Read More »

सचिन वाझेचा अर्ज न्यायालयाने स्वीकारला

अनिल देशमुखांच्या अडचणींत वाढ मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माफीचा साक्षीदार होणार आहेत. याबाबत सचिन वाझे यांनी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे. यापूर्वीच केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यासाठी मंजुरी …

Read More »

मुलगी शिकली, प्रगती झाली

युपीएससीच्या परीक्षेत एखाद्या मुलीने प्रथम क्रमांक पटकावला असे यापूर्वी अनेकदा घडले आहे. परंतु पहिले तीनही क्रमांक मुलींनीच पटकावले आहेत असे गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच घडले आहे. 2021 च्या युपीएससी परीक्षेत पहिला क्रमांक उत्तर प्रदेशच्या श्रुती शर्माने पटकावला तर कोलकात्याच्या अंकिता अगरवालने दुसरा व चंदीगडच्या गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावला. …

Read More »

काश्मीरचे खोरे हळूहळू बदलतेय…

काश्मीर म्हटले की, तेथील दहशतवादी, त्यांचे हल्ले एवढेच आपल्या डोळ्यासमोर येते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे  सरकार आल्यापासून  तेथील परिस्थिती बदलत आहे. तेथील महिलांच्यात ही आत्मविश्वास निर्माण होत आहे, हा बदल निश्चितच चांगला आहे. काश्मीरमध्ये नसबंदीची शस्त्रक्रिया जवळ जवळ कोणीच करीतच नाही. त्यांना धर्म परवानगी देत नाही असे सांगितले जाते. अशा …

Read More »

दिपाली सय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

खोपोली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात अक्षेपार्ह विधान करणार्‍या शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी खोपोली शहर भाजप महिला मोर्चाच्या वतीने पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीसुद्धा गाडी शिवसैनिकांनी तोडली असती, असे विधान पंधरा दिवसापूर्वी शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांनी प्रसार …

Read More »