भाजपकडून महावितरणकडे आंदोलनाचा इशारा खारघर : रामप्रहर वृत्त उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच गेल्या काही दिवसांपासून खारघर-तळोजा शहरामध्ये वेळीअवेळी वीजपुरवठा कोणत्याही पूर्वसूचना न देता खंडित केला जात आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी तसेच व्यावसायिकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कारभार उन्हाळ्यामध्ये नियोजन शून्य झालेला असून आठवड्यात अनेक …
Read More »महिलेचा विनयभंग करणार्यावर गुन्हा दाखल
पनवेल : वार्ताहर मेंढ्या चारण्यासाठी घेऊन जात असलेल्या एका महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्त्य करून तिचा विनयभंग केला. या वेळी महिलेने आरोपीस धक्का दिला असता झालेल्या झटापटी मध्ये महिलेच्या गळ्यातील डोरली तुटून नुकसान झाले. त्याबद्दल संबंधित व्यक्तीविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत महिला …
Read More »आंब्याच्या दुकानाला आग
जिवीतहानी नाही, मात्र मोठे नुकसान पनवेल : वार्ताहर शहरातील एका आंब्याच्या दुकानाला अचानकपणे लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या जवळील जय भारत नाक्यावरील एका आंब्याच्या दुकानाला सोमवारी (दि. 9) रात्री आग लागली. या आगीची माहिती मिळताच पनवेल महानगर पालिकेच्या अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी आली व जवानांनी …
Read More »आपले कर्तव्य बजावताना सतर्क राहा
पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांचे पोलीस पाटलांना आवाहन पनवेल : वार्ताहर पोलीस पाटील हे खर्या अर्थाने त्या गावाचे पोलिसच असतात त्यामुळे त्यांनी आपले कर्तव्य बजावताना सतर्क राहणे गरजेचे आहे. गावात काय चाललेय याची माहिती वेळोवेळी घेऊन काही गोष्टी समाज विघातक असल्यास त्याची माहिती नजीकच्या पोलिसांना द्यावी, असे आवाहन परिमंडळ 2 …
Read More »…तर चौदा वर्षे जेलमध्ये राहण्यास तयार -नवनीत राणा
मुंबई : प्रतिनिधी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा आणि त्यानंतरच्या नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या खासदार नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. समर्थकांनी भगवी शाल, हनुमान चालिसेची प्रत आणि हनुमानाची प्रतिमादेखील नवनीत राणा यांना भेट देण्यात आली आणि औक्षणही करण्यात आले. …
Read More »‘त्याचा‘ निर्णय जनतेने करावा
भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेवर पलटवार जालना:प्रतिनिधी आम्ही त्यांना युतीतून बाहेर काढलं की ते पळून गेले, याचा निर्णय जनतेने करावा. लग्न आमच्याशी ठरलं होतं. मात्र ते दुसर्यांसोबत पळून गेले.असा घणाघाती आरोप भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलाआहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र …
Read More »योगयात्री ग्रंथाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
पनवेल ः रामप्रहर वृत्त इन्स्टिट्यूट ऑफ योग अॅण्ड आयुर्वेद व पनवेल आरोग्य सेवा समितीच्या वतीने योगयात्री या आत्मकथनपर ग्रंथाचा प्रकाश सोहला रविवारी शहरातील चिंतामणी सभागृहात झाला. या सोहळ्यामध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि श्री धूतपापेश्वरचे मॅनेजिंग डायरेक्टर रणजित पुराणिक यांच्या हस्ते योगयात्री या आत्मकथनपर ग्रंथाचे प्रकाशन झाले. …
Read More »खांदा कॉलनीमध्ये रक्दान शिबिर व ई-श्रम महानोंदणी अभियान
उपमहापौर सीताताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्यसाधून खांदा कॉलनीमध्ये रक्तदान शिबिर आणि नगरसेवक निधीमधून करण्यात आलेल्या कामांचे लोकार्पण आणि ई-श्रम महानोंदणी अभियानाचे आयोजन रविवारी (दि. …
Read More »ओएलएक्सवरुन फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
पाच दुचाकी जप्त करण्यात गुन्हे शाखेला यश पनवेल ः वार्ताहर ओएलएक्सच्या माध्यमातून महागडी दुचाकी वाहने विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या ग्राहकांची फसवणूक करणार्या आंतरराज्यीय टोळीतील त्रिकुटाला गुन्हे शाखा युनिट-2च्या पथकाने अटक केली आहे. या त्रिकुटाने अशाच पद्धतीने फसवणूक करुन मिळविलेली पाच लाख 50 हजार रुपये किंमतीची पाच दुचाकी गुन्हे शाखेने हस्तगत …
Read More »खारघरमधील बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई सुरू
भाजप नेते प्रभाकर घरत यांच्या पाठपुराव्याला यश खारघर : रामप्रहर वृत्त येथील सेक्टर 3मध्ये मुख्य रस्त्यावर स्कायवॉकच्या खाली काही नागरिक बेकायदेशीर पार्किंग करून कामाला जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते व अपघातही होतात. म्हणून या बेकायदा पार्किंगवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भाजप नेते प्रभाकर घरत यांनी खारघर पोलीस ठाण्याचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper