चार बोटी आणि इतर सामान जप्त पनवेल ः वार्ताहर अनधिकृत रेती उत्खनन करणार्या माफियांवर आज पनवेल पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या निर्देशानुसार पथकाने कारवाई करून चार बोटीसह इतर सामान जप्त केले आहे. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत रेती उत्खनन सुरू असून, याची गंभीर दखल घेत पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या …
Read More »तांत्रिक बिघाडामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित
वाशी, कोपरखैरणे परिसरात जनित्र जळाल्याने अडचण; पनवेलकरही हैराण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशी, कोपरखैरणे परिसरात जनित्र जळाल्याने गुरुवारी (दि. 5) सकाळपासून पनवेल व नेरुळ परिसरात महापारेषणच्या मुख्य वीजवाहिनीत बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. दुपापर्यंत हळूहळू वीजपुरवठा पूर्ववत झाला. वीज नसल्याने लघुउद्योजकांनाही फटका बसला तर आधीच उष्णतेने हैराण झालेल्या …
Read More »पुन्हा न्यायालयीन चपराक
महाविकास आघाडी सरकारचा मनमानी कारभार धुडकावून लावत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा या तीन चाकी सरकारला सणसणीत चपराक लगावली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय महापालिका, जिल्हा परिषदा आदींच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु राज्य सरकारने केलेला कायदा फेटाळून लावत, 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करा असा स्पष्ट …
Read More »पांगळोली येथे गोठ्याला आग, चार जनावरे होरपळली, एकाचा मृत्यू
पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील पांगळोली गावातील भूमिहीन शेतकर्याच्या गोठ्याला बुधवारी (दि. 4) दुपारनंतर अचानक आग लागून चार गुरे होरपळली. त्यापैकी एका बैलाचा मृत्यू झाला. पोलादपूर तहसीलदार दिप्ती देसाई यांच्या आदेशानुसार तातडीने पंचनामा करण्यात आला आहे. पोलादपूर तालुक्यातील पांगळोली येथील लोकांची शेतजमिन तोंडी भाड्याने घेऊन कसणारे परशुराम दाजी उपाळे यांच्या कुटूंबियांची …
Read More »वडखळजवळ तिहेरी अपघात, दोन दुचाकीस्वार ठार
पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ गावच्या हद्दीत गुरुवारी (दि. 5) सकाळी तीन वाहनांत अपघात होऊन दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. अभय अर्जुन पाटील (वय 36, रा. हाशिवरे, अलिबाग) याने दिलेल्या फिर्यादीनुसार टेम्पो (एमएच- 46,बीबी-6939) वरील चालकाने (नाव माहित नाही) त्याचा बंद पडलेला आयशर टेम्पो मुबई-गोवा महामार्गावर वाहतुकीस अडथळा होईल, या …
Read More »महाडजवळील भुयारी मार्गात कायम वाहतूक कोंडी
महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही तरच महाड शहराजवळ असलेल्या भुयारी मार्गातील फुटपाथवर विक्रेते आणि खाजगी वाहनांनी तळ ठोकला असल्याने तेथे कायम वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीकडे स्थानिक पोलीस प्रशासन व महामार्ग बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा मनस्ताप सहन …
Read More »ऑनलाइन व्यवहारात सावधानता गरजेची -विपिनकुमार पांडे
पेण येथील ग्राहक मेळाव्यातून एसबीआयची जनजागृती पेण : प्रतिनिधी ग्राहकांनी ऑनलाइन खरेदी व्यवहार करताना सावध रहावे, असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक विपिनकुमार पांडे यांनी पेण येथे केले. आझादी महोत्सवानिमित्त स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) तर्फे पेण येथे ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विपिनकुमार पांडे उपस्थितांना मार्गदर्शनकरीत …
Read More »अफकॉन कंपनी अधिकार्यांवर गुन्हा दाखल करा
घरांचे नुकसान झाल्याने ढेकू ग्रामस्थांची मागणी खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात डोंगर पोखरण्यासाठी भूसुरुंग लावल्याने ढेकू गावात मोठे दगड गोटे पडल्याने, अनेक घरांचे नुकसान झाले. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी गुरुवारी (दि. 5) ठेकेदार अफकॉन कंपनीच्या अधिकार्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्याकडे …
Read More »भडवळ टाकाचीवाडीमधील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण
कर्जत : बातमीदार तालुक्यातील दामत-भडवळ ग्रामपंचायत हद्दीमधील टाकाचीवाडी येथील आदिवासी लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरु आहे. ग्रामपंचायतीकडून येणारी जलवाहिनी वारंवार तोडून टाकण्यात येत असल्याने येथील ग्रामस्थांना सव्वा किलोमीटर अंतरावर जाऊन डोक्यावर पाण्याने भरलेले हांडे आणावे लागत आहेत. दामत-भडवळ ग्रामपंचायत हद्दीतील भडवळ टाकाचीवाडीमध्ये 85 घरांची वस्ती असून तेथे तीन विहिरी आहेत, …
Read More »रायगडच्या विकासाला गती
ज्या भागत दळण-वळणाच्या सुविधा चांगल्या आहेत तेथील विकास वेगाने होतो. रायगड हा झपाट्याने औद्योगिक विकास होत असलेला जिल्हा आहे, परंतु रायगड जिल्ह्यात रस्ते चांगले नसल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला म्हणावी तशी गती मिळालेली नव्हती. आता रायगड जिल्ह्यातील रस्ते विकासाला केंद्र सरकारने गती दिली आहे. जिल्ह्यात दहा हजार कोटींच्या रस्त्यांची कामे सध्या प्रगती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper