Breaking News

Ramprahar Team

रायगड जिल्ह्यातील करोना रुग्णवाढ झपाट्याने

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढ झपाट्याने  होत आहे. जिल्ह्यात सहा दिवसात साडे तीन हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची वाढ वेगात होत असली तरी लसीकरण झाले असल्यामुळे परिस्थिती गंभीर होणार नाही, असा प्रशासनाला विश्वास आहे. जिल्ह्यात 1 जानेवारी 2022 रोजी 196 नवीन रुग्ण आढळले होते. त्यावेळी …

Read More »

सुधागडात गावठी दारू निर्मिती व विक्री करणार्यांवर कारवाई

तिघांवर पाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पेंढारमाळ हद्दीत अवैधरीत्या गावठी दारू निर्मिती व विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पाली पोलीस ठाण्यात तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पेंढारमाळ परिसरातील जंगल भागात अवैधरीत्या गावठी दारू निर्मिती व विक्री करण्यात येत असल्याची खबर मिळाल्यानंतर …

Read More »

कर्जतच्या शारदा मंदिरामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

कर्जत : प्रतिनिधी येथील शारदा मंदिर इंग्लिश मिडीयम स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम सादर केला. कर्जत शहरातील शाळा मागील एक ते दिड वर्षांपासून कोरोना महामारीमुळ ऑनलाइन पद्धतीने सुरू होत्या. काही महिन्यांपूर्वी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आणि मुलांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबविणार्‍या …

Read More »

पेणमध्ये आदिवासींना वनहक्क दस्तऐवजाचे वाटप

पेण : प्रतिनिधी स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त कातकरी उत्थान अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पेण नगर परिषदेच्या सभागृहात आदिवासींना वनहक्क दस्तऐवजाचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 16 आदिवासी, कातकरी लाभार्थ्यांना वनहक्क दस्तऐवजाचे वाटप करण्यात आले. आज खर्‍या अर्थाने लाभार्थी आदिवासी बांधव जमीनीचे मालक झाले असून त्याचा लाभ त्यांनी …

Read More »

पाली शहरात खड्डे, धुरळ्याचा त्रास

महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक क्षेत्र आणि सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. डम्परमधून उडणार्‍या व खड्ड्यांतून निघणार्‍या धुरळ्याचा खूप त्रास होत आहे. यामुळे येथे येणारे भाविक व स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. पालीतून होणार्‍या अवजड वाहतुकीमुळे खड्ड्यांनी डोकं वर काढले आहे. शिवाय खड्ड्यात टाकलेली खडी व …

Read More »

नफरतीचा कळस

पंतप्रधान नरेंद्र मोदी या नावाची काँग्रेस नेत्यांना इतकी प्रचंड अ‍ॅलर्जी आहे की मोदी हे नाव उच्चारताच त्यांचे माथे फिरते. याचेच प्रत्यंतर बुधवारी पंजाबमध्ये आले असे खेदाने म्हणावे लागेल. पंजाबमधील फिरोजपूर येथील सभेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधानांचा ताफा निघाला असताना हुसैनीवाला येथे तथाकथित किसान आंदोलकांनी रास्तारोको केला. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही एक …

Read More »

फणसाड अभयारण्यात पक्षीगणना

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील फणसाड अभयारण्यात ग्रीन वर्क्स ट्रस्ट व वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ते 9 जानेवारी या कालावधीत पक्षीगणना करण्यात येणार असल्याची माहिती अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी दिली. फणसाड अभयारण्याचे क्षेत्र मोठे असून समुद्र सपाटीजवळ असल्याने येथे विविध पक्षी वस्ती करावयास येतात. या अभयारण्यातील पक्षांच्या …

Read More »

मुरूड तालुक्यात 54 वीजचोरट्यांवर कारवाई

20 लाख रुपयांची दंडवसुली मुरूड : प्रतिनिधी वीजबिल जास्त येऊ नये म्हणून काही ग्राहक विविध क्लृप्त्या वापरून मीटरमध्ये हेराफेरी करून वीजचोरी करीत असतात. मुरूड तालुक्यातील वीजचोरी करणार्‍या 54 ग्राहकांवर महावितरणने धडक कारवाई करून सुमारे 20 लाख तीन हजार 461 रुपयांचा दंड वसूल केला आहे. एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत …

Read More »

कर्जत-माथेरान मिनीबस सुरू करावी

भाजपची मागणी, एसटी आगारप्रमुखांना निवेदन माथेरान : प्रतिनिधी कर्जत-माथेरान मिनी बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी भाजप माथेरान मंडलातर्फे कर्जत एसटी आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे कर्जत-माथेरान मिनी बससेवा बंद आहे. त्यामुळे माथेरानमधील विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात, तर नोकरदारांना कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्यास अडचण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर माथेरानचे …

Read More »

सुडकोळी येथील बांधबंदिस्ती उद्ध्वस्त

खाडीलगतच्या भातशेतीचे नुकसान रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील सुडकोळी ग्रामपंचायत हद्दीत नवखार येथील समुद्रखाडीलगतची बांधबंदिस्ती डागडुजी नसल्याने उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे समुद्रखाडीचे पाणी घुसून भातशेतीचे अतोनात नुकसान आहे. दरवर्षीच अशा प्रकारे येथील शेतकर्‍यांना नुकसानीस सामोरे जावे लागत असल्याने याबाबत ठोस भूमिका घेऊन बंधार्‍याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी …

Read More »