Breaking News

Ramprahar Team

सह्याद्री प्रतिष्ठानची किल्ले बिरवाडीवर संवर्धन मोहीम

पाली : प्रतिनिधी सह्याद्री प्रतिष्ठानच्या मुरूड विभागातर्फे ऐतिहासिक बिरवाडी किल्ल्यावर नुकतीच दुर्गसंवर्धन मोहीम राबविण्यात आली. यावेळी गडावरील अनेक वास्तूंचे संवर्धन व स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत गडावरील जोते आणि सदरेच्या दगडांचा ढिग मोकळा करण्यात आला. या विस्कळीत भिंतीचे दगड मुळ बांधणीला न हलवता व्यवस्थित बसविण्यात आले. किल्ल्यावरील बुरुज, पायर्‍या व …

Read More »

दिवीवाडीमध्ये शिक्षणाची वाडी अभियान

अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील महाजने येथील दिवीवाडीमधील आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची वाडी अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व शिक्षक संदीप वारगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दिवीवाडीमधील प्रत्येक घराच्या भिंतीला गणित, उजळणी, इंग्रजी शब्दांचे फलक …

Read More »

म्हसळा नगरपंचायतीत 4978पैकी 3410 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

म्हसळा : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीच्या 12 प्रभागातील 4978पैकी 3410 मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 1765 महिला तर 1645 पुरुष मतदारांचा समावेश आहे. सर्वात कमी मतदान प्रभाग क्र. 5मध्ये (59.1 टक्के) झाले. तेथे 509पैकी 301 मतदारांनी मतदान केले. तर सर्वात जास्त मतदान प्रभाग क्र.17मध्ये (81.2 टक्के) झाले. तेथे 392 मतदारांनी …

Read More »

पोलादपूर नगरपंचायतीसाठी 71.09 टक्के मतदान

पोलादपूर : प्रतिनिधी पोलादपूर नगरपंचायतीच्या 13 प्रभागात मंगळवारी (दि. 21) निवडणूक घेण्यात आली. तेथे एकूण 71.09 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. दरम्यान, माजी सभापती दिलीप भागवत यांच्यासह माजी नगराध्यक्ष नागेश पवार, सुनीता पार्टे यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून उर्वरित चार प्रभागांच्या निवडणुकीनंतर मतमोजणी होणार आहे. पोलादपूर …

Read More »

योगव्रती ‘बाबा’!

गेली बत्तीस वर्षे पनवेलकरांना निरामय आरोग्याचा ‘योगमंत्र’ देत, त्यांना फिट अँड फाइन ठेवण्याचा वसा घेतलेले योगकेंद्राचे संस्थापक, संचालक पु. ल. भारद्वाज अर्थातच समस्त पनवेलकरांना बाळासाहेब भारद्वाज आणि तमाम योगप्रेमींना ‘बाबा’ या नावाने सुपरिचित असलेल्या बाबांचे मंगळवारी (दि. 21) अल्पशा आजाराने पनवेल येथे निधन झाले. वय वर्षे अवघे 96 असलेले बाबा …

Read More »

भाजपच्या ई-श्रम कार्ड शिबिराला प्रतिसाद

नवी मुंबई : बातमीदार भाजप उत्तर भारतीय मोर्चाचे नवी मुंबई अध्यक्ष राजेश राय यांनी ई-श्रम कार्ड शिबिराचे आयोजन सानपाडा येथे केले होते. जवळपास 50 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत कार्ड काढून घेतले. मोदी सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी आणलेल्या ई-श्रम कार्ड योजनेविषयी या वेळी जागृती करण्यात आली व माहिती देण्यात आली. …

Read More »

शिवसेनेच्या रवींद्र वायकरांची ईडीकडून चौकशी

मुंबई :प्रतिनिधी शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची आठ तास सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात आली आहे. तब्बल आठ तास रवींद्र वायकर ईडीच्या प्रश्नांना सामोरे गेले. नेमक्या कोणत्या प्रकरणी त्यांनी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. रवींद्र वायकर …

Read More »

खारघरमध्ये आढळल्या फुलपाखरांच्या 48 जमाती

खारघर : प्रतिनिधी खारघर शहर हे नवी मुंबई मधील निसर्ग विविधतेने नटलेले अस शहर आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, विस्तीर्ण खाडीकिनारा लाभलेल्या या शहरात झपाट्याने विकास होत आहे, मात्र नैसर्गिक विविधतेने नटलेल्या या शहराचा आणखी एक रूप एका निसर्गप्रेमी छायाचित्रकाराने समोर आणला आहे. मागील तीन वर्षांपासुन केलेल्या छायाचित्रणात खारघरमध्ये 48 जमातीचे वेगवेगळे …

Read More »

‘रोटरी’तर्फे रसायनी परिसरात स्वच्छता अभियान

मोहोपाडा : प्रतिनिधी रोटरी क्लब पाताळगंगा तर्फे एमआयडीसी टेकडीवर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. प्लास्टिक पिशव्या, काचेच्या बाटल्या कचरा गोळा करण्यात आला. पर्यावरण डायरेक्टर सुनील भोसले यांच्या संकल्पनेतून व सर्विस डायरेक्टर वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट राबवण्यात आला. आपल्या सर्व आजूबाजूच्या परिसरात एमआयडीसी टेकडीवरील जलशुद्धीकरण …

Read More »

नवीन पनवेलमधील आरोग्य शिबिरास प्रतिसाद

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त मोरे हेल्थकेअर आणि शिवतेज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नवीन पनवेल येथे रविवारी (दि. 19)नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. नवीन पनवेल सेक्टर 14 येथील शिवतेज वृत्तपत्र वाचनालयात झालेल्या या आरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवतेज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष …

Read More »