कर्जत : प्रतिनिधी विश्व हिंदू परिषद कर्जत प्रखंडच्या कार्यकर्त्यांनी दीपावलीनिमित्त तालुक्यातील कर्जत व नेरळ पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांना फराळ देऊन शुभेच्छा दिल्या. कर्जत पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुवर्णा पत्की, प्रशांत देशमुख, कुलाबा जिल्हा बजरंग दल संयोजक साईनाथ श्रीखंडे, विहिंप कर्जत प्रखंड मंत्री विशाल जोशी, प्रखंड अध्यक्ष विनायक उपाध्ये, जिल्हा धर्मप्रसार सहप्रमुख दिनेश …
Read More »कर्जतमध्ये पावसाच्या सरी
वाहतूक कोंडी, भाऊरायांचा हिरमोड कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार परतीच्या पावसाचा तडाखा शनिवारी (दि. 6) कर्जतला बसला. संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने सुरुवात केली. भाऊबीजेचा दिवस असल्याने बहिणीकडे जाणार्या बंधुरायांची एकच त्रेधातिरपीट उडाली. कर्जत चारफाटा परिसरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. चौक बाजूकडे सुमारे …
Read More »कळंबमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का
समर्थकांसह शाखाप्रमुखाचा ‘जय महाराष्ट्र’ कर्जत : बातमीदार तालुक्यातील कळंब गावातील शिवसेनेचे संस्थापक असलेल्या मिरकुटे कुटुंबातील कार्यकर्त्यांनी शिवसेनाला जय महाराष्ट्र केला. शाखाप्रमुखासह शिवसैनिकांनी पक्ष सोडल्याने शिवसेनेसाठी हा मोठा धक्का समाजाला जात आहे. कळंब ग्रामपंचायत हद्दीमध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून खर्या अर्थाने पक्षाची पाळेमुळे रुजविणारे प्रमोद मिरकुटे यांचे पुतणे उमेश प्रवीण मिरकुटे, त्यांचे सहकारी …
Read More »निष्क्रियतेचे किती बळी?
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेतील बहुतेक तपशील यापूर्वीच्या अशा दुर्दैवी घटनांमध्येही अस्तित्वात होते. त्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनच राज्यभरातील हॉस्पिटलांचे फायर ऑडिट करण्यात आले. परंतु ऑडिटनंतर अग्निशमन दलाकडून आलेल्या सूचनांची अंमलबजावणीच केली गेली नाही तर निव्वळ ऑडिटमधून काय साधणार? मागील दुर्दैवी घटनांमधून संबंधितांनी काहीच बोध घेतला नाही एवढेच यातून …
Read More »हेरिटेज वारसा : मिनीट्रेन
युनोस्कोच्या हेरिटेजसाठी माथेरानची राणी देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे. पर्यटनाला चालना देणारी माथेरानची राणी म्हणजेच मिनिट्रेनने हेरिटेजसाठी युनोस्कोच्या पहिल्या फेरीमध्ये यश संपादन केले असून, दुसर्या फेरीकडे योग्य वाटचाल सुरू आहे. यापूर्वीदेखील 2002 साली युनेस्कोकडून माथेरानच्या मिनिट्रेनला हेरिटेज दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. आताही युनोस्कोच्या हेरिटेज दर्जाचे स्थान मिळविण्यासाठी मिनिट्रेन …
Read More »पनवेलमध्ये प्रथमच ‘अग्रज’ची उत्पादने
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील शिवाजी रोडवरील सिल्हर अपार्टमेंटमध्ये प्रथमच पुण्याचे प्रसिद्ध अग्रज फुड प्रोसेसर्सची उत्पादने रोहिणी लिमये आणि शीतल लिमये यांनी पनवेलकरांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या दुकानाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 5) पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल भूषण डॉ. संजीवनी गुणे यांच्या हस्ते झाले. संपूर्ण नवी मुंबईत पनवेल …
Read More »‘मिसिंग लिंक’च्या ठेकेदाराला मारहाण; दोन जण गंभीर जखमी
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत नवीन मिसिंग लिंक मार्गाचे काम सुरू आहे. चावणी येथे पुलाचे काम सुरू असल्याने सध्या या परिसरात काही तरुण गुंडगिरी करीत असल्याचे समोर येत आहे. मागील दोन दिवसांत येथे शिवीगाळ, मारहाण व धमकावणे, तसेच काम करणार्या कंपनीच्या व्यवस्थापक व ठेकेदारांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहे. …
Read More »दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी
महाड ः प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड शहरानजीक गांधारपाले गाव हद्दीत शनिवारी (दि. 6) दुपारी एक दुचाकी रस्त्यावर घसरली. या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ज्ञानेश्वर रामचंद्र पाथरटकर आणि हरिश्चंद्र बाळू देवळे (दोघे रा. देहगाव, दापोली) हे दोघे दुचाकी (एमएच 4-जेझेड 5968)वरून दापोली …
Read More »अवकाळी पावसाचा तडाखा; भातपिकांचे अतोनात नुकसान
अलिबाग : प्रतिनिधी मागील दोन पडलेल्या अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान झाले. उभी पिके कोलमडली असून कापलेली पिके व भाताचे भारे पावसाच्या पाण्यात पसरले आहेत. हाती आलेले भातपीक हातचे गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गुरुवार संध्याकाळपासून पावसाने सुरुवात केल्याने भातपिकाची पुरती वाताहत झाली असून शेतकरीवर्गास मोठ्या नुकसानीस सामोरे जावे …
Read More »केंद्राच्या घोषणेनंतर भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घट
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्राच्या इंधन दरकपातीच्या घोषणेनंतर भाजपाशासित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 8.7 आणि 9.52 रुपये प्रतिलीटरने कमी करण्यात आले आहे. केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये, तर डिझेलवरील शुल्कात दहा रुपये कपात केली असून ती गुरुवार (दि. 4)पासून लागू करण्यात आली आहे. ज्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper