Breaking News

Ramprahar Team

रायगडातील एसटी कर्मचारी आर्थिक विवंचनेत

ना वेळेवर पगार, ना वैद्यकीय बिलांचा परतावा पेण : प्रतिनिधी कोरोना काळात एसटीची आर्थिक संकटात रुतलेली चाके आता काही प्रमाणात बाहेर येऊन पूर्वपदावर येत   असताना कर्मचार्‍यांपुढे मात्र पगार तसेच वैद्यकीय बिलांच्या अभावी जगायचे कसा प्रश्न निर्माण झाला आहे. वेतनाअभावी एसटी कर्मचार्‍यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. कोरोना काळातील निर्बंधाचा फटका …

Read More »

एक्सप्रेस वेवर वायुगळती

तत्काळ उपाययोजना झाल्याने संभाव्य दुर्घटना टळली खोपोली, खालापूर : प्रतिनिधी एक्सप्रेस वे वरील आडोशी गावाजवळ मंगळवारी (दि. 14) सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास प्रोपोलिन गॅस भरलेल्या टँकरला कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर टँकरमधील अतिज्वलनशील प्रोपोलिन वायुची गळती सुरू झाली. मात्र तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्याने संभाव्य दुर्घटना टळली. मुंबई- पुणे …

Read More »

रोह्यात हातभट्टीची दारू जप्त

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई रोहे : प्रतिनिधी तालुक्यातील गोपाळवठ धनगरवाडी, कारवीने धनगरवाडी व कारवीने ठाकूरवाडी येथील अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रायगड व ठाणे येथील अधिकारी, कर्मचार्‍यांनी 11 व 12 सप्टेंबर  रोजी केलेल्या संयुक्त कारवाईत हातभट्टीची दारू आणि रसायन मिळून एकूण दोन लाख सहा हजार 500 रुपयांचा …

Read More »

पिंगळसई गावातील देशमुख परिवाराचा एक कुटुंब एक गणपती

रोहे ः प्रतिनिधी तालुक्यातील पिंगळसई गावातील देशमुख तरुण मंडळाने एक गाव एक गणपती हा शिरस्ता 12 पिढ्या म्हणजेच 350 वर्षापासून अधिक काळ पारंपरिक पद्धतीने जोपसला आहे. रोहे शहरापासून दीड ते दोन किमी अंतरावर पिंगळसई हे गाव आहे. या गावात मोठ्या संख्येने देशमुख कुटुंब आहेत. त्यातील काही सदस्य नोकरी व्यवसायासाठी परगावीही …

Read More »

मिठाई दुकानदारांना बाप्पा पावला

गणेशोत्सवात मिठाई खरेदी वाढली खोपोली : प्रतिनिधी यंदाचा गणेशोत्सव जरी निर्बंधात साजरा होत असला, तरी कोरोनाच्या ओसरलेल्या दुसर्‍या लाटेमुळे खालापूर तालुक्यात बाप्पांचे आगमन उत्साहात झाले असून, या वेळी मिठाई विक्री चांगली होत असल्याने मिठाई दुकानदारांना बाप्पा पावला आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादूर्भाव मोठा असल्याने नियमात शिथिलता देण्यात आली नव्हती. सणासुदीलादेखील दुकाने …

Read More »

अभियांत्रिकी क्षेत्रातील अमूल्य रत्न : सर विश्वेश्वरैय्या

‘15 सप्टेंबर’ हा दिवस संपूर्ण भारतभरात ‘अभियंता दिन’ म्हणजेच ‘इंजिनियर्स डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. या विशेष दिनी अभियांत्रिकी प्रगतीचा आढावा घेत असताना एक बाब विशेषत्वाने जाणवली की आपल्या अभियंत्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगाच्या पाठीवर सर्वत्र आपल्या कार्याद्वारे विशेष मोहर उमटवली आहे आणि तीदेखील सर्व क्षेत्रात. फार विरळा क्षेत्र …

Read More »

आता निवडणुकीचे पडघम

कोरोना महासाथीच्या तिसर्‍या लाटेची प्रतीक्षा करत असतानाच अखेर राज्यातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम ओबीसी आरक्षणाविनाच जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीने जंग जंग पछाडले होते. तसेच अन्य राजकीय पक्षांनी देखील ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत निवडणुका होऊ न देण्याचा चंग बांधला होता. तथापि राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या …

Read More »

नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेने विद्युत पुरवठा सुरळीत

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील मनिष मार्केट ते बापटा वाडा परिसर काही तासांकरिता विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. याबाबत स्थानिक रहिवाशांसह पत्रकार गणेश कोळी यांनी नगरसेवक राजू सोनी यांच्याशी संपर्क साधून या असुविधेबाबत माहिती दिली. सोनी यांनी तत्परतेने वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांच्या साथीने अथक प्रयत्न करून या भागातील विद्युत पुरवठा …

Read More »

दिलासा! देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णसंख्येत घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात सोमवारी (दि. 13) सकाळी संपलेल्या 24 तासांत 28,591 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3,32,36,921वर पोहचली. याचवेळी, उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती 3,84,921 इतकी झाली. याच काळात 338 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे, कोरोनामृत्यूंचा एकूण आकडा 4,42,655 वर पोहचला, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत …

Read More »

‘मविआ’कडून ओबीसी समाजाची दिशाभूल

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात नागपूर : प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप निकाली निघालेला नाही. अशावेळी राज्य निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका, तसेच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर …

Read More »