कर्जत : बातमीदार सतत पाच दिवस पडत असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे माथेरानचे जनजीवन पूर्णतः ठप्प होऊन, जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होते. येथे आलेल्या पर्यटकांना अनेक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले. जोरदार पावसामुळे रात्रीच्या वेळेस घरात पाणी शिरल्याने एक महिला जखमी झाली आहे. आता माथेरान पूर्वपदावर येत असून पावसाचा जोर कायम असल्याने …
Read More »खालापूर महावितरणची पावसाने घेतली परीक्षा
खोपोली : प्रतिनिधी आठवडाभरापासून कोपलेल्या वरुणराजाने खालापूर वीज वितरण कंपनी (महावितरण) लादेखील हिसका दाखवला असून, ठिकठिकाणचा खंडित वीजपुरवठा सुरळीत करताना महावितरणला तारेवरची कसरत करावी लागत आहे. खालापूर तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला. बुधवारी रात्री कमी वेळात पडलेला प्रचंड पावसाचा अंदाज अनेकांना आला नव्हता. त्यामध्ये महावितरणदेखील होते. खालापूर परिसरातील अनेक भाग पाण्याखाली …
Read More »उल्हास नदीवर नवीन पुलाची प्रतीक्षा
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यात तीन दिवस सतत झालेल्या संततधार पावसामुळे अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. उल्हास नदीवरील दहिवली पूल दरवर्षी महापुराच्या पाण्याखाली जात असून 45 वर्षे वयोमान असलेल्या या पुलाच्या जागी नवीन पूल कधी होणार? असा प्रश्न स्थानिक लोक विचारत आहेत. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अभियंते …
Read More »उद्ध्वस्त कोकण!
निसर्गसंपन्न कोकण सध्या याच निसर्गाची अवकृपा झेलत आहे. महापूर तसेच दरडी कोसळून कोकणात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. विविध दुर्घटनांत अनेकांचा मृत्यू झाला असून शेकडो संसार उद्ध्वस्त झाले आहेत. राज्यातील सरकारने आता या आपद्ग्रस्तांना भरीव मदत करून त्यांना पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. जुलै महिन्याच्या सुुरुवातीला गायब …
Read More »भविष्यात कर्जत विळख्यातच…
कर्जत तालुक्यात दोन मोठी धरणे भविष्यात बांधली जाणार आहेत. सिडको आणि ठाणे जिल्ह्यातील नागरी वस्तीची तहान भागविण्यासाठी कर्जत तालुक्यातील जमिनीवर धरणे बांधली जाणार आहेत. लोणावळा भागातील धरणाचे पाणी कातळदरामध्ये सोडल्यानंतर 25 टक्के कर्जत तालुका पाण्याखाली जातो. मग कोंढाणा आणि पोशिर या मध्यम धरण प्रकल्पांची निर्मिती झाल्यानंतर कर्जत तालुक्यात दरवर्षी येथील …
Read More »समर्थ बूथ अभियानांतर्गत खालापूर भाजपची बैठक
मोहोपाडा : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खालापुर तालुक्याची समर्थ बूथ अभियान अंतर्गत मोहोपाडा येथील पक्ष कार्यालयात शक्ती केंद्र प्रमुख व बूथ अध्यक्ष यांची बैठक झाली. या वेळी महाराष्ट्र राज्यातील व रायगड जिल्ह्यातील दरड संकटामध्ये बळी पडलेल्या बांधवाना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानतंर सभा सुरू झाली. या वेळी खालापूर तालुका …
Read More »जनतेला पाठ दाखवणारे हे कसले पालकमंत्री
चित्रा वाघ अनिल परब यांच्यावर संतापल्या मुंबई : प्रतिनिधी गुरुवारची पहाट कोकणासाठी दहशतीची ठरली. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने कोकणातील जनजीवन कोलमडून गेले. अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. दरम्यान चिपळूणचे नागरिक संकटात असतांना पालकमंत्री अनिल परब पळ काढतात, अशी टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी …
Read More »‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’
मुंबई : प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. तसेच रायगड, रत्नागिरी, सातार्यात दरड कोसळून दुर्घटना सुद्धा घडल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील तळीये येथे दरड दुर्घटनेत तब्बल 44 जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही काही नागरिक बेपत्ता आहेत. राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीनंतर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा …
Read More »मुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वरातीमागून घोडे -प्रवीण दरेकर
मुंबई : प्रतिनिधी महाडच्या तळीये गावात दरड कोसळून तब्बल 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेला दोन दिवस उलटल्यानंतर शनिवारी (दि. 24) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तळीयेमध्ये आले होते. मुख्यमंत्र्यांच्या या दौर्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वराती मागून घोडे आहेत, अशी खोचक टीका केली …
Read More »खरेदी आपण गरज म्हणून करतो, की ती आपल्याकडून करून घेतली जाते आहे?
काय खरेदी करावे आणि काय नाही, हे ठरविणारे सर्वस्वी आपण असलो पाहिजे. पण आपल्या खरेदीवर बाह्य गोष्टींचा परिणाम होत असेल, तर सावध होण्याची गरज आहे. अशा कोणत्या बाह्य गोष्टी आपल्या खरेदीवर परिणाम करतात, ते आपण पाहूयात. जर आपण काही ऑनलाईन खरेदी करावयाचे ठरविले आणि सहज त्या वस्तूचा शोध घेतला, तर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper